दिवसभरात 1 तास खळखळून हसा आणि 400 कॅलरीज् बर्न करा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2018 05:31 PM2018-12-07T17:31:48+5:302018-12-07T17:33:55+5:30

स्पर्धात्मक युगात 'या गोष्टीचं  टेन्शन, त्या गोष्टीचं टेन्शन' यामुळे प्रत्येक जण हल्ली हसणंच विसरला आहे जणू. तुम्ही  शेवटंच प्रचंड खळखळून हसल्याचं तुम्हाला तरी आठवतंय का?.

laughing every day for one hour burns 400 calories keeps diseases away | दिवसभरात 1 तास खळखळून हसा आणि 400 कॅलरीज् बर्न करा

दिवसभरात 1 तास खळखळून हसा आणि 400 कॅलरीज् बर्न करा

Next

स्पर्धात्मक युगात 'या गोष्टीचं  टेन्शन, त्या गोष्टीचं टेन्शन' यामुळे प्रत्येक जण हल्ली हसणंच विसरला आहे जणू. तुम्ही  शेवटंच प्रचंड खळखळून हसल्याचं तुम्हाला तरी आठवतंय का?. आठवत नाहीय ना. कारण सततच्या दगदगीत निवांतपणाच हरवल्यानं ताणतणाव वाढत आहे. शारीरिक-मानसिक तणावासहीत इतर आजारांनाही दूर पळवायचं असेल तर यावर एकमेव स्वस्त आणि मस्त उपाय म्हणजे 'खळखळून हसणं'. मनापासून हसण्यानं आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते. हसणं हा अनेक आजारांवरील रामबाण उपाय आहे. खळखळून हसण्यानं शरीरातील स्नायू, डोळे, जबडा आणि हृदय यांच्या स्नायूंना आराम मिळतो. युनिव्हर्सिटी ऑफ मेरीलँडमधील एका संशोधनानुसार, मोकळेपणानं हसणाऱ्यांच्या शरीरात रक्ताभिसरणाची प्रक्रिया उत्तम प्रकारे कार्य करते.  
10 मिनिटांपर्यंत खळखळून हसण्यानं आपल्याला वेदनादायी त्रासापासून 2 तास मुक्ती मिळते. हसरी माणसं दीर्घ काळापर्यंत तरुण राहतात, असे तज्ज्ञांचं म्हणणं आहे. त्यामुळे आजारांना दूर ठेवायचं असेल तर मनमुराद हसा. 

जाणून घेऊन मनमुराद हसण्याचे आरोग्यदायी फायदे - 
1. उत्साही दिवस:
सकाळच्या वेळेस हास्य ध्यान योग केल्यास तुमचा संपूर्ण दिवस प्रसन्न आणि उत्साही राहतो. या योगमुळे शरीरात काही हार्मोन्सचा प्रवाह सुरू  होतो. मधुमेह, पाठदुखी आणि तणावानं त्रस्त असलेल्यांना याचा अधिक फायदा होतो. 
2. हृदय निरोगी राहते :
हसण्यामुळे हृदयाचाही उत्तम व्यायाम होतो. यामुळे रक्ताभिसरणाचीही प्रक्रिया अधिक चांगल्या पद्धतीनं होते. हसण्यामुळे शरीरातून एंडोर्फिन नावाचे रसायन उत्सर्जित होते, हे रसायन हृदयाला मजबूत ठेवण्याचे कार्य करते. हसण्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याचाही धोका कमी होतो. ज्यांना हृदयाविकार आहेत, अशांसाठी हसणे हे फार उपयुक्त आहे. 10 मिनिटे व्यायाम केल्याने जेवढी हृदयाच्या ठोक्यांची गती तीव्र होते. त्या गतीसाठी एक मिनिट हसणे पुरेसे आहे. हे एका संशोधनातून समोर आले आहे.
3.कॅलरीज् घटतात :
तणावापासून मुक्ती मिळण्यासोबत 10 मिनिटांपर्यंत सलग हसण्यानं 20 ते 30 कॅलरीज् बर्न होतात. तुम्हीदेखील वजन नियंत्रणात आणण्यासाठी आटोक्यात प्रयत्न करत असाल तर जिममध्ये हजारो रुपये खर्च न करता केवळ मनमोकळेपणानं हसा. यामुळे तुमच्या कॅलरीज् नैसर्गिकरित्या बर्न होतील आणि अनावश्यक खर्चही टाळला जाईल.
4.स्पॉन्डेलायटिसवर हसणं फायदेशीर : 
स्पॉन्डेलायटिस, कंबरदुखी यांसारख्या वेदनादायी समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी हसणं हा एक प्रभावी पर्याय आहे. लाफिंग थेरपीच्या मदतीनं डॉक्टर रुग्णांना आराम देण्याचं काम करतात. 
5. रोगप्रतिकारकशक्ती वाढते :
हसण्यामुळे शरीराला अधिक प्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठा होतो. यामुळे कर्करोगाच्या पेशी आणि अन्य प्रकाराचे हानिकारक जीवाणू आणि व्हायरस नष्ट होतात. एकूणच हसण्यामुळे शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती वाढते. हसण्याच्या प्रक्रियेदरम्यान आपण खोलवर दीर्घ श्वास घेत असतो, यामुळे संपूर्ण शरीराला ऑक्सिजनचा पुरवठा अधिक चांगल्या प्रकारे होतो. परिणामी आपण दीर्घ काळापर्यंत ताजेतवाने राहतो.
6. तणावातून मिळते मुक्तता :
ताणतणाव, वेदना इत्यादी त्रासदायक बाबींचा खात्मा करण्याची शक्ती हसण्यामध्ये आहे. मोकळेपणाने हसण्यामुळे सर्व तणाव दूर होतो. खळखळून हसल्यास तणावामुळे होणाऱ्या मानसिक आणि शारीरिक समस्यांपासून बचाव होतो. 

Web Title: laughing every day for one hour burns 400 calories keeps diseases away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.