सेलिब्रिटी डाएटिशियन ऋजुता दिवेकरांच्या लहान मुलांसाठी 'हेल्‍दी इटिंग टिप्‍स'

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2019 03:55 PM2019-05-16T15:55:05+5:302019-05-16T15:57:05+5:30

ऋजुता दिवेकर सिलेब्रिटी डायटिशियन आहेत. सध्या दीक्षित डाएट वर्सेस दिवेकर डाएट अशा चर्चा रंगलेल्या असल्या तरिही अनेक सेलिब्रिटी दिवेकरांचाच डाएट प्लॅन गाठीशी बांधताना दिसत आहेत.

Learn from celebrity dietitians rujuta diwekar healthy eating tips for children | सेलिब्रिटी डाएटिशियन ऋजुता दिवेकरांच्या लहान मुलांसाठी 'हेल्‍दी इटिंग टिप्‍स'

सेलिब्रिटी डाएटिशियन ऋजुता दिवेकरांच्या लहान मुलांसाठी 'हेल्‍दी इटिंग टिप्‍स'

Next

(Image Credit : interestingmagazine.in)

ऋजुता दिवेकर सिलेब्रिटी डायटिशियन आहेत. सध्या दीक्षित डाएट वर्सेस दिवेकर डाएट अशा चर्चा रंगलेल्या असल्या तरिही अनेक सेलिब्रिटी दिवेकरांचाच डाएट प्लॅन गाठीशी बांधताना दिसत आहेत. दिवेकर बाईंची खासियत म्हणजे, त्या ट्रेडिशनल मेथड आणि डाएटलाच हेल्दी समजतात. यासाठीच त्या नेहमी आपल्या व्हिडीओमधून लोकांचं मार्गदर्शन करत असतात. ज्यामध्ये त्या मुलांना आणि मोठ्या माणसांनाही काही मोलाचे सल्ले आणि डाएट टिप्स देत असतात. अशातच एका व्हिडीओमार्फत त्या मुलांसाठी काही हेल्दी इटिंग टिप्स सांगत आहेत. जाणून घेऊयात दिवेकरबाईंनी मुलांसाठी दिलेला खास सल्ला...

हेल्दी इटिंग हॅबिट्स 

या व्हिडीओमध्ये ऋजुता दिवेकर स्वतः जमीनीवर बसल्या आहेत आणि सर्वांना सांगत आहेत की, आहारासोबतच त्याला ग्रहण करण्याची पद्धत, नियम आणि वेळही अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. तसेच त्या नेहमी जंक फूड आणि पॅकेज्ड फूडपासून दूर राहण्याचा सल्ला देतात. यावेळी त्या काही विदेशी परंपरांनाही सक्त मनाई करत आहेत, ज्याचं भारतीयांनी परदेशी संस्कृतीमधून अनुकरण केलं आहे. 

जमिनीवर बसून जेवणं 

ऋजुता दिवेकर मुलांच्या योग्य ग्रोथसाठी जमिनीवर बसून जेवण्याचा सल्ला देतात. त्यासाठी त्या सांगतात की, जे कोणी मुलांना जेवण भरवत असतील त्यांनीही स्वतः जमिनीवर बसूनच त्यांना भरवावं. जमिनीवर बसून जेवणं हे सर्वांचया पेल्विक हेल्थसाठी उत्तम मानलं जातं. त्यामुळ बद्धकोष्टासारख्या समस्या दूर राहतात. 

प्रोटीनच्या गोष्टी

अनेकदा आई मुलांना सतत प्रोटीन आणि व्हिटॅमिन्सच्या गोष्टी सांगून किंवा आग्रह करून वैतागवते. जर मुलांनी डाळ खाण्यासाठी नकार दिला तर, मुलांना सांगते की, जर डाश खाल्ली नाही तर प्रोटीन मिळणार नाही. असं करून तुम्ही त्यांना प्रोटीन असलेले पदार्थ खाण्यासाठी ग्राहक करत आहात. असं न करताही तुम्ही त्यांना या पदार्थांचं सेवन करण्याचा आग्रह करू शकता. 

90 मिनिटं खेळण्यासाठी 

बॉडीमध्ये प्रोटीन आणि कॅल्शिअम ग्रहण करण्यासाठी त्याचं विश्लेषण करणं गरजेचं आहे. जर तुम्ही खाल्यानंतर एकाच जागी बसून असाल तर हे अजिबात शक्य नाही. त्यामुळे त्या सल्ला देतात की, दिवसभरातील एकूण वेळातील 90 मिनिटांचा वेळ राखून ठेवा. पण हे सर्व खेळ मैदानी खेळ असावेत. 

दूध पिणं

अनेक पालकांची अशी तक्रार असते की, मुलं दूध पित नाही किंवा दूध पिताना नखरे करतात. त्यासाठी अनेकदा बाजारात मिळणाऱ्या पावडर एकत्र करून त्यानंतर ते दूध मुलांना पिण्यासाठी देण्यात येतं. ऋजूता ही सवय सोडण्याचा सल्ला देतात. जर त्याची दूध पिण्याची इच्छा असेल तरच त्याला दूध द्यावं. त्यामध्ये काही मिक्स करून पिण्यासाठी दिलं तर ते आरोग्यासाठी नुकसानदायी ठरू शकतं. तसेच टेट्रा पॅकमध्ये मिळणारं दूधही आरोग्यासाठी पोषक नसतं. तुम्ही फुल क्रिम दूध प्यायलात तरच दूधातील पूर्ण पोषण मिळू शकतं. 

हलवा आणि लाडू आहेत पौष्टिक 

दिवेकरबाई सांगतात की, बाजारात मिळणाऱ्या पदार्थांपेक्षा घरात मिळणाऱ्या पदार्थांना पौष्टिक मानलं जातं. मुलांना आपल्या शरीरासाठी आवश्यक प्रोटीन आणि व्हिटॅमिन घरामध्ये तयार करण्यात येणाऱ्या लाडू आणि हलव्यापासून मिळू शकतात. 

टिव्ही पाहताना मुलांना जेवण भरवू नका 

आता एक सवयचं झाली आहे की, लोक डिनर करताना टिव्ही ऑन करतात. परंतु ऋजुता सांगतात की, असं केल्याने आपल्याला जेवणाती संपूर्ण पोषण मिळत नाही. त्यामुळे मुलांनाही टिव्ही पाहताना जेवण भरवू नका. 

वेळेवर झोपणं गरजेचंच 

जी मुलं वेळेवर झपत नाहीत त्यांच्या लर्निंग, सोशल एबिलिटीवर परिणाम होतो. त्यामुळे झोपण्याची वेळ निश्चित करणं आवश्यक असतं. आठ ते दहा वर्षांपर्यंतच्या लोकांना साडे नऊ वाजेपर्यंत झोपणं गरजेचं आहे. तसेच टीनएजर्स मुलं साडे दहा वाजेपर्यंत आपलं काम करू शकतात. रात्री अकरा वाजल्यानंतर जागणंही आरोग्यासाठी घातक ठरतं. 

टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. 

Web Title: Learn from celebrity dietitians rujuta diwekar healthy eating tips for children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.