वजन कमी करण्यासाठी कसा फायदेशीर आहे ब्रेकफास्ट, जाणून घ्या ब्रेकफास्ट करण्याचे फायदे

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2021 03:16 PM2021-06-09T15:16:43+5:302021-06-09T15:17:27+5:30

बऱ्याच जणांना असा गैरसमज असतो की वाढलेले वजन कमी करण्यासाठी सकाळीची न्याहारी घेऊ नये. त्यामुळे ते ब्रेकफास्ट करणे टाळतात. उलट ब्रेकफास्ट न केल्याने वजन कमी होण्याऐवजी वाढतं.

Learn how breakfast is beneficial for weight loss, the benefits of having breakfast | वजन कमी करण्यासाठी कसा फायदेशीर आहे ब्रेकफास्ट, जाणून घ्या ब्रेकफास्ट करण्याचे फायदे

वजन कमी करण्यासाठी कसा फायदेशीर आहे ब्रेकफास्ट, जाणून घ्या ब्रेकफास्ट करण्याचे फायदे

googlenewsNext

सकाळचा नाश्ता म्हणजेच ब्रेकफास्ट (Breakfast) हा आपल्या रोजच्या जीवनशैलाी मधील महत्वाचा घटक आहे. सकाळी ब्रेकफास्ट केल्याने अनेक फायदे होतात. ब्रेकफास्ट आपल्या आरोग्यासाठी खूप महत्वाचा असतो. बऱ्याच जणांना असा गैरसमज असतो की वाढलेले वजन कमी करण्यासाठी सकाळीची न्याहारी घेऊ नये. त्यामुळे ते ब्रेकफास्ट करणे टाळतात. उलट ब्रेकफास्ट न केल्याने वजन कमी होण्याऐवजी वाढतं. 

चयापचय सुरळीत करते
रात्री आपल्या शरीरातील सर्व क्रिया रात्रीच्यावेळी संथ गतीने सुरु असतात. त्यामुळे चयापचय संथ असते. सकाळी ब्रेकफास्ट न केल्यास हे चयापचय वेगाने होत नाही. तसेच त्यामुळे आपली फॅट बर्निंग प्रक्रियाही मंद होते. म्हणूनच सकाळी जागे झाल्यानंतर तासाभरात काहीतरी खाणे महत्वाचे आहे. चयापचय दर वाढवण्यासाठी, दररोज सकाळी न्याहारी करा. या ब्रेकफास्टमध्ये आपण ओट्स, उपमा, इडली इत्यादी पौष्टिक पदार्थ खाणे उत्तम.

‘नाईट क्रेविंग’ कमी करते
पौष्टिक आणि फायबरने भरपूर नाश्ता केल्याने रात्रीची भूक कमी होते. जे लोक सकाळी पुरेसा नाश्ता करत नाहीत त्यांना दिवसभर कार्ब खाण्याची तीव्र इच्छा होत असते. न्याहरीत उच्च कार्बोहायड्रेट आहार खाणे आवश्यक आहे, यामुळे साखरेची पातळी संतुलित राखली जाते आणि क्रेविंगही देखील कमी होते. तथापि, जे लोक सकाळच्या नाश्त्यात कमी कार्ब खातात, ते संध्याकाळी अधिक कार्ब सेवन करतात.

पोट बराच काळ भरलेले राहते
सकाळी फायबर समृद्ध पदार्थ खाल्ल्याने तुमचे पोट बर्‍याच वेळेस पूर्ण दिवस भरलेले राहते. यामुळे, अरबट-चरबट आणि चटपटीत तेलकट पदार्थ खाणे टाळले जाते. असे पदार्थ खाल्ल्याने तुमचे वजन झपाट्याने वाढू लागते. जेव्हा, आपण आपला सकाळचा नाश्ता वगळता, तेव्हा आपण आपली क्रेविंग वाढवण्याचे काम करता आणि आपले वजन वाढते.

प्रथिनांची कमतरता भरुन काढते
सकाळी नाश्ता न केल्याने प्रथिनांची शरीरातील कमतरता तशीच राहते. जर आपल्याला दीर्घकाळापर्यंत वजन नियंत्रित किंवा कमी करायचे असेल, तर आहारात पुरेशी प्रथिने सेवन करणे गरजेचे आहे. प्रथिने आपल्या रक्त पेशी आणि स्नायूंच्या दुरुस्तीचे कार्य करते. न्याहारी खाल्ल्याने शरीराला भरपूर प्रमाणात प्रथिने मिळतात आणि परिणामी वजन कमी होण्यास मदत होते.

Read in English

Web Title: Learn how breakfast is beneficial for weight loss, the benefits of having breakfast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.