जाणून घ्या corona virus'ची लक्षणे आणि खबरदारीचे उपाय 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2020 04:50 PM2020-01-24T16:50:36+5:302020-01-24T16:53:38+5:30

महाराष्ट्रात एकही करोनाचा रुग्ण आढळला नसून नागरिकांनी घाबरून जाऊ नये आवाहन  राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने केले आहे. 

Learn the symptoms and precautions for corona virus | जाणून घ्या corona virus'ची लक्षणे आणि खबरदारीचे उपाय 

जाणून घ्या corona virus'ची लक्षणे आणि खबरदारीचे उपाय 

googlenewsNext

पुणे : चीनमध्ये सुरुवात झालेला करोना व्हायरसचा भारतात प्रवेश होऊ नये याकरिता खबरदारीचा उपाय म्हणून देशभरातील सात विमानतळांवर चीन आणि आसपासच्या प्रदेशातून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी सुरु करण्यात आली आहे. मात्र महाराष्ट्रात एकही करोनाचा रुग्ण आढळला नसून नागरिकांनी घाबरून जाऊ नये आवाहन  राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने केले आहे. 

चीनमधील वुहान हा शहरात या आजाराचा उद्रेक झाला आहे. त्यानंतर चीनमधील इतर भागातही करोनाचे रुग्ण आढळले. चीनशिवाय जपान, थायलंड, दक्षिण कोरिया आणि अमेरिकेत या आजाराचे रुग्ण आढळले आहेत. 

करोनाची लक्षणे : हे एका विषाणूच्या समूहाचे नाव आहे. सध्या सर्दी-खोकल्यापासून ते  गंभीर आजारासाठी हे विषाणू कारणीभूत असतात. 

असा पसरतो आजार : सर्वसाधारणपणे हवेवाटे, शिकण्यातून, खोकल्यातून जे थेंब बाहेर पडतात त्यातून पसरतो. 

 

खबरदारीचे उपाय :

  • हात वारंवार धुणे 
  • शिंकताना, खोकताना नाकातोंडावर रुमाल किंवा टिश्यू पेपर धरणे 
  • अर्धवट शिजवलेले, कच्चे मांस खाऊ नये. 
  • श्वसनसंस्थेचे विकास असणाऱ्या व्यक्तीशी संपर्क ठेवताना संसर्ग न होण्याची काळजी 

 

या स्थितीत घ्या तात्काळ वैद्यकीय सल्ला :

  • श्वसनास त्रास होणाऱ्या व्यक्ती 
  • रोग प्रतिकार शक्ती कमी असलेल्या व्यक्तीने बाधीत देशातून प्रवास केल्यास 

 आत्तापर्यंत १हजार सातशे एकोणचाळीस प्रवाशांची तपासणी करण्यात आली आहे. यापैकी मुंबई येथे दोन रुग्णांना सौम्य सर्दी व ताप असल्याने त्यांना खबरदारीचा उपाय म्हणून कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यातही करोना संशयित रुग्णांना भरती कारण्यासाठी  पुण्यात नायडू रुग्णालय व मुंबईत कस्तुरबा रुग्णालयात आवश्यक ती उपचार सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

 पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेत निदानाची सुविधा उपलब्ध आहेत. संशयित रुग्णांचे नमुने या प्रयोगशाळेत पाठवावेत. रुग्णालय स्तरावर संसर्ग प्रतिबंध यंत्रणा कार्यरत करणे आवश्यक आहे. यादृष्टीने रुग्णालयांची तयारी आणि विलगीकरण कक्ष सुसज्ज ठेवावेत. गंभीर रुग्णांसाठी व्हेंटीलेटर, जीवनावश्यक प्रणाली सुविधा कार्यरत राहतील अशा सूचना करण्यात आल्या आहेत. 

Web Title: Learn the symptoms and precautions for corona virus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.