LEDच्या प्रकाशानं डोळ्यांचं नुकसान, स्वास्थ्य अधिकाऱ्यांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2019 08:22 PM2019-05-16T20:22:34+5:302019-05-16T20:26:30+5:30

अनेकदा उशिरापर्यंत काम केल्या कारणाने किंवा लागोपाठ अनेक तास वाचन केल्याने किंवा सतत कम्प्युटरवर काम करत राहिल्याने डोळ्यांना थकवा जाणवतो.

Led light damages eyes retina health officials give alert | LEDच्या प्रकाशानं डोळ्यांचं नुकसान, स्वास्थ्य अधिकाऱ्यांचा इशारा

LEDच्या प्रकाशानं डोळ्यांचं नुकसान, स्वास्थ्य अधिकाऱ्यांचा इशारा

googlenewsNext

(Image Credit : Dunya News)

फ्रान्स 

अनेकदा उशिरापर्यंत काम केल्या कारणाने किंवा लागोपाठ अनेक तास वाचन केल्याने किंवा सतत कम्प्युटरवर काम करत राहिल्याने डोळ्यांना थकवा जाणवतो. मोबाईल आणि कमी झोप यामुळेही समस्या होऊ शकते. या कारणांमुळे डोळे दुखणे, सूज येणे अशा समस्या होतात. हा त्रास जास्त वाढला तर अनेक गंभीर समस्यांनाही सामोरे जावे लागते. पण वीज वाचवण्यासाठी लावण्यात येणारा एलइडीही आरोग्यासाठी घातक ठरतो. 

फ्रान्समधील सरकारी आरोग्य देखरेख संस्थेने या आठवड्यात एक इशारा दिला असून त्यांनी सांगितल्यानुसार वीज वाचवण्यासाठी सर्रास वापरण्यात येणाऱ्या एलईडी लाइटमुळे डोळ्यांच्या रेटिन्याला नुकसान होऊ शकतं. एवढचं नाहीतर झोपण्याची प्रक्रियाही बाधित होऊ शकते. हे सर्व एलईडी लाइटच्या 'निळ्या प्रकाशा'मुळे होते असंही या संस्थेने स्पष्ट केले आहे. 

(Image Credit : France 24)

रेटिनाच्या पेशींना पोहोचते नुकसान 

फ्रान्समधील एजंसी खाद्य, पर्यावर आणि व्यावसायिक आरोग्य आणि सुरक्षा (ANSES) यांनी एका रिपोर्टमधून सांगितल्यानुसार, संशोधनातून सिद्ध झालेले निष्कर्षांमधून असं सिद्ध होतं की, एक तीव्र आणि शक्तीशाली LED प्रकाश 'फोटो-टॉक्सिक' असतो. हे डोळ्यांमधील रेटिनाच्या पेशींना हानि पोहोचवतात. एवढचं नाही तर एलईडी लाइटमुळे डोळ्यांना झालेले नुकसान बरे करता येऊ शकत नाही. त्याचबरोबर याचा परिणाम डोळ्यांच्या दृष्टीवरही होऊ शकतो. 

सखोल संशोधन करणं गरजेचं 

एजंसीने 400 पानांच्या एका रिपोर्टमध्ये अशी शिफारस केली आहे की, संशोधनतून सिद्ध झालेल्या बाबींमधून हे सिद्ध झालेले असले तरिही, आणखी खोलवर संशोधन करून याच्या सर्व बाबी तपासणे गरजेचे आहे. 

टिप : वरील सर्व गोष्टी या संशोधनातून सिद्ध झालेल्या असून यातून आम्ही कोणताही दाव करत नाही. 

Web Title: Led light damages eyes retina health officials give alert

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.