डायबिटीससह वजन कमी करण्यासाठी शेंगाचे सेवन कराल तर आजारांपासून लांब राहाल!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2020 10:13 AM2020-02-24T10:13:42+5:302020-02-24T10:14:38+5:30

शेंगांमध्ये नैसर्गीकरित्या  फॅट्स खूप कमी असतात. कॉलेस्ट्रॉल फ्री सुद्धा असतात.  रोज एक वाटी शेंगा खाल्याने अनेक फायदे मिळतात.

Legumes are good for weight loss diabetes, Experts says | डायबिटीससह वजन कमी करण्यासाठी शेंगाचे सेवन कराल तर आजारांपासून लांब राहाल!

डायबिटीससह वजन कमी करण्यासाठी शेंगाचे सेवन कराल तर आजारांपासून लांब राहाल!

googlenewsNext

जसजसं वय वाढत जातं तसतसं शरीरात वेगवेगळे बदल होत जातात. अनेक आजारांचा सुद्धा सामना  करावा लागतो. डायबिटीसचे दोन प्रकार असतात. टाईप-१ डायबिटिस हा साखरेच्या अतिप्रमाणात  सेवन केल्यामुळे होत असतो. अनेकदा अशा प्रकारचा डायबिटीस  जेनेटिकली होऊ शकतो. टाईप-२ डायबिटिस  हा जीवनशैलीतील बदलांमुळे होत असतो. तुम्ही कोणत्याही प्रकरच्या  टॅब्लेट्स किंवा औषध न घेता आहारात काही घटकांचा समावेश करून तुम्ही या आजारापासून स्वतःला लांब ठेवू शकता. 

तुम्हाला वाचून विश्वास बसणार नाही पण अनेक शेंगांचा आहारात समावेश केल्यामुळे तुम्हाला आजारांपासून लांब राहता येईल. फायबर, प्रोटीन, कार्बोहाइड्रेट, व्हिटामिन-B, आयरन, कॉपर, मॅग्नीशियम, मॅग्नीज, जिंक आणि फॉस्फरस सारखे शरीराला आवश्यक असणारे घटक असतात.  शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत राहून रक्तपातळ होण्याची प्रक्रीया  शेंगाच्या सेवनामुळे व्यवस्थित होते. 

शेंगांमध्ये नैसर्गीकरित्या  फॅट्स खूप कमी असतात.  शेंगा कॉलेस्ट्रॉल फ्री सुद्धा असतात.  रोज एक वाटी शेंगा खाल्याने अनेक फायदे मिळतात. तसचं त्यात ११५ कॅलरीज, २० ग्राम कार्बोहायड्रेट्स, ७ ते ८ ग्राम प्रोटीन्स आणि १ ग्राम फॅट्स असतात. 

हेल्थ एक्सपर्टसच्या म्हणण्यानुसार  फळ आणि भाज्या जास्तीत जास्त  खाल्यामुळे  हार्ट डिसीज, रक्तदाब आणि डायबिटीज टाइप-2 चा धोका कमी होतो.  त्यासाठी बेस्ट प्लांट डाएट असायला हवं. डायबिटील टाईप-२ ने ग्रासलेले पेशंट आपल्या आजारासाठी स्वतःचं जबाबदार असतात. याचे कारण फिजिकली एक्टिव्ह नसणे आणि  योग्य आहार न घेणं हे असू शकतं.  तुम्हाला जर या आजारांपासून स्वतःचा बचाव करायचा असेल तर आहारात वेगवेगळ्या शेंगाचा समावेश करा. ( हे पण वाचा-हातांची चरबी वाढल्यामुळे हवेतसे कपडे घालण्यासाठी विचार करत असाल ,तर 'असं' ठेवा स्वतःला मेंटेन!)

शेंगांमध्ये कमी फॅट्स आणि फायबर्सचे प्रमाण जास्त असल्यामुळे वजन कमी करण्यासाठी आहारात शेंगाचा समावेश करा.  त्यामुळे तुमच्या शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होईल. तसंच पोट साफ होण्यासाठी सुद्धा शेंगा फायदेशीर ठरत असतात. त्यामुळे पचनक्रिया चांगली राहते. खाल्लेल्या अन्नाचे पचन व्यवस्थित होण्यासाठी शेंगाचा आहार  लाभदायक ठरेल. तुम्ही  दोन जेवणाच्या मधल्या वेळेत सुद्धा शेंगा खाऊ शकता.  ( हे पण वाचा-लिहिण्याचे होणारे फायदे वाचाल तर कंटाळा येत असेल तरी कागद, पेन घेऊन बसाल!)

Web Title: Legumes are good for weight loss diabetes, Experts says

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य