लिंबाच्या पानांमध्ये लपला आहे आरोग्याचा खजिना, किडनी स्टोनची समस्या होईल दूर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2022 10:18 AM2022-11-28T10:18:08+5:302022-11-28T10:19:18+5:30
Lemon Leaves Water: लिंबाच्या पानांमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन बी1 भरपूर प्रमाणात असतात. या पोषक तत्वांमुळे अनेक आजार दूर करण्यास मदत मिळते.
Lemon Leaves Water: लिंबाच्या फायद्यांबाबत तर सगळ्यांनाच माहीत आहे. पण फक्त लिंबूच नाही तर लिंबाची पानेही आरोग्यासाठी फायदेशीर असतात. ज्याबाबत फारसं कुणाला माहीत नसतं. लिंबाच्या पानांच्या पाण्याचं सेवन केलं तर आरोग्यासंबंधी अनेक समस्या दूर होऊ शकतात. लिंबाच्या पानांमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन बी1 भरपूर प्रमाणात असतात. या पोषक तत्वांमुळे अनेक आजार दूर करण्यास मदत मिळते.
कसं कराल सेवन?
पाणी गरम करून त्यात काही लिंबाची पाने उकडून घ्या. जेव्हा पाने चांगली उकडतील तेव्हा त्यांचा रंग बदलेल. हे पाणी गाळून घ्या. आता या पाण्यात थोडं मध टाका. हे लिंबाच्या पानांचं पाणी कोमट प्यावं.
किडनी स्टोनमध्ये फायदेशीर
लिंबाच्या पानांचं पाणी हे किडनी स्टोनमध्ये फायदेशीर आहे. यात साइट्रिक अॅसिड भरपूर प्रमाणात असतं. जे किडनी स्टोनमध्ये आराम देतं. लिंबाच्या पानांचं रस किडनी स्टोनचा धोका कमी करू शकतात.
डोकेदुखीत फायदेशीर
लिंबाच्या पानांमध्ये अॅंटी-ऑक्सिडेंट असतं. जे डोकेदुखी आणि तणाव कमी करण्यासाठी फायदेशीर असतं. जर डोकेदुखीची समस्या असेल तर लिंबाच्या पानांचं पाणी फायदेशीर ठरू शकतं. या पाण्याने मायग्रेनच्या समस्येत आराम मिळतो.
स्ट्रेस दूर करा
लिंबाच्या पानांमध्ये असलेले गुण स्ट्रेस दूर करण्यात फायदेशीर असतात. एनसीबीआयच्या एका रिपोर्टनुसार, लिंबाचं पाणी स्ट्रेस दूर करण्यासाठी फायदेशीर असतं. याने नर्वसनेस दूर होतो. लिंबाच्या पानांमुळे मानसिक आरोग्यही चांगलं राहतं.
झोपेची समस्या दूर होते
जर कुणाला झोपेशी संबंधित समस्या असेल तर लिंबाच्या पानांचं पाणी प्यायल्याने फायदा मिळू शकतो. याने झोपेची गुणवत्ता सुधारते. याने झोप कमी येण्याची समस्या दूर होईल. या पानांमुळे शरीराचा थकवा दूर होतो.