जास्त प्रमाणात लिंबू पाणी प्यायल्याने होतात या गंभीर समस्या, वेळीच व्हा सावध!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2022 11:11 AM2022-08-15T11:11:10+5:302022-08-15T11:11:25+5:30
Side Effects of Drinking Lemon Water: कोणत्याही गोष्टीचा अतिरेक केला तर नुकसानच होतं. प्रसिद्ध हेल्थ एक्सपर्ट निखिल वत्स यांनी सांगितलं की, जास्त प्रमाणात लिंबू पाणी पिणं आपल्या शरीरासाठी चांगलं नसतं.
Side Effects of Drinking Lemon Water: हे तर सर्वांनाच माहीत आहे की, लिंबू पाणी आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे. जर तुम्ही लिंबाचा रस सकाळी कोमट पाण्यात प्यायलात तर तुमचं वजन कमी होतं. सोबतच लिंबू आपल्या डायजेशनसाठीही चांगलं असतं. ज्यामुळे पोटासंबंधी समस्या लगेच गायब होतात. पण हेही लक्षात ठेवलं पाहिजे की, कोणत्याही गोष्टीचा अतिरेक केला तर नुकसानच होतं. प्रसिद्ध हेल्थ एक्सपर्ट निखिल वत्स यांनी सांगितलं की, जास्त प्रमाणात लिंबू पाणी पिणं आपल्या शरीरासाठी चांगलं नसतं.
अनेक अवयवांचं होईल नुकसान
लिंबात व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं. जर आपल्या शरीरात व्हिटॅमिन सी वाढलं तर याचा प्रभाव अनेक अवयवांवर पडतो. त्यामुळे अनेक डॉक्टर याचं कमी प्रमाणात सेवन करण्याचा सल्ला देतात.
पोटदुखी - व्हिटॅमिन सी जास्त वाढल्याने पोटात अॅसिडीक सिक्रीशन वाढण्याची भीती असते. कारण याने अॅसिडची शक्यता जास्त वाढते. हे समस्या इथेच थांबत नाही, उलट जास्त लिंबू पाणी प्यायल्याने उलटी, जुलाब आणि मळमळ होण्याची समस्याही होऊ शकते. अनेक लोक गॅस्ट्रोइसोफेगल रिफ्लक्सने पीडित असतात त्यांनी लिंबू पाणी कमी प्यायला हवं.
तोंडात फोडं - लिंबाच्या मदतीने अनेकदा तोंडाची दुर्गंधी दूर होते आणि दातांची स्वच्छताही केली जाते. पण जर लिंबू पाणी प्रमाणापेक्षा जास्त सेवन कराल तर यातील सायट्रिक अॅसिड ओरल टिश्यूजमध्ये सूज निर्माण करतं. ज्यामुळे तोंडात फोडं येतात आणि जळजळ होते.
कमजोर दात - प्रयत्न करा की, लिंबू पाणी पित असाल तर स्ट्रॉ चा वापर नक्की करा. कारण याने लिंबाच्या रसाचा संपर्क दातांशी येणार नाही. असं केल्याने दात कमजोर होणार नाहीत.