वजन घटवण्यासाठी लिंबुपाणी भरपूर आहे फायदेशीर, पण 'या' विशिष्ट पद्धतीने तयार करा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2022 05:29 PM2022-05-29T17:29:54+5:302022-05-30T17:09:58+5:30

लिंबूमध्ये अँटीऑक्सिडन्ट गुणधर्म देखील आढळतात आणि ते वजन कमी करण्यासाठी मदत (Lemon water Benefits) करतात. तसेच यामुळे फ्री रॅडिकल्ससारख्या समस्या देखील दूर होण्यास मदत होते.

lemon water is extremely beneficial for weight loss but try in this way | वजन घटवण्यासाठी लिंबुपाणी भरपूर आहे फायदेशीर, पण 'या' विशिष्ट पद्धतीने तयार करा

वजन घटवण्यासाठी लिंबुपाणी भरपूर आहे फायदेशीर, पण 'या' विशिष्ट पद्धतीने तयार करा

googlenewsNext

सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात अनेकांना आहारावर (Diet) लक्ष देण्यास वेळ मिळत नाही. अनियमित आणि चूकीच्या आहारामुळे अनेकांना लठ्ठपणाचा (Obesity) सामना करावा लागत आहे. वजन वाढतं तर लवकर मात्र ते कमी करण्यासाठी (Weight Loss) अनेक प्रयत्न करावे लागतात. अनेक जण व्यायाम, यागा आणि सकाळी धावून वजन कमी करण्याचा प्रयत्न करतात. यासोबतच काही लोक वजन कमी करण्यासाठी आहारत (Weight Loss Diet) बदल करतात आणि काही पेये (Weight Loss Drink) देखील घेतात. तुम्हाला देखील वजन कमी करायचे असेल तर रोज सकाळी रिकाम्या पोटी लिंबू पाणी पिणे (Lemon water for Weight Loss) तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

लिंबू पाणी (Lemon water) आरोग्यासाठी अतिशय प्रभावी असते. याशिवाय तुम्हाला वजन कमी करण्यासाठी देखील याची महत होऊ शकते. लिंबूमध्ये सायट्रिक अॅसिडसह व्हिटॅमिनस सी, व्हिटॅमिन बी-6, पोटॅशियम आणि फायबरसारखे शरीराला आवश्यक असलेले घटक आढळतात. लिंबूमध्ये अँटीऑक्सिडन्ट गुणधर्म देखील आढळतात आणि ते वजन कमी करण्यासाठी मदत (Lemon water Benefits) करतात. तसेच यामुळे फ्री रॅडिकल्ससारख्या समस्या देखील दूर होण्यास मदत होते.

तीन पद्धतींनी पिऊ शकता लिंबू पाणी
1) वजन कमी करण्यासाठी तुम्ही लिंबू आणि पुदिन्याचे पाणी देखील पिऊ शकता. उन्हाळ्यात पुदिन्यामुळे शरीराला थंडावा जाणवतो. त्यामुळे हे पेय तुम्हाला उन्हाळ्यात अधिक उपयुक्त ठरू शकते. यासाठी एक ग्लास पाण्यात लिंबू आणि पुदिन्याच्या पाणांचा सर घाला. त्यात थोडं काळं मिठ घाला आणि सकाळी रिकाम्या पोटी हे पेय प्या. हे दोन्ही पदार्थ लो कॅलरी असतात. त्यामुळे तुमचे वजन वेगाने कमी होण्यास मदत होऊ शकते. या पेयामुळे तुम्हाला बराच वेळ भूक लागत नाही. तुम्ही हे पेय दिवसभर पिऊ शकता.

2) वजन कमी करण्यासाठी तुम्ही लिंबू आणि मधाचे पाणी पिऊ शकता. अनेक जण आपल्या आहारात या लिंबू पाण्याचा समावेश करतात. यासाठी सकाळी एक ग्लास कोमट पाण्यात लिंबूचा रस घाला. त्यात एक चमचा मध घाला आणि तयार झालेले पेय प्या. नियमतपणे हे पेय पिल्यास तुम्हाला वजन करण्यास मदत होऊ शकते.

3) आलं आणि लिंबूचं पेय देखील तुम्हाला वजन कमी करण्यास उपयुक्त ठरू शकते. आल्याचा उपयोग आरोग्यदायी पेय बनवण्यासाठी देखील केला जातो. हे पेय बनवण्यासाठी एक ग्लास पाण्यात लिबूचा आणि आल्याचा रस घाला. यात थोडं काळं मिठ घाला. सकाळी रिकाम्या पोटी हे पाणी प्या. हे पेय तुमचे शरीर डिटॉक्स करण्याचे काम करेल. हे पेय तुम्ही दिवसातून दोन ते तीन वेळा पिऊ शकता. यामुळे तुम्हाला पोट भरलेले वाटेल.

Web Title: lemon water is extremely beneficial for weight loss but try in this way

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.