लिंबू पाण्यात हे खास पावडर टाकून करा सेवन, लघवीव्दारे निघून जातील सगळे विषारी पदार्थ

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2023 11:51 AM2023-12-06T11:51:40+5:302023-12-06T11:52:01+5:30

Body Detox Drink : जर आजारी पडायचं नसेल तर शरीरातून हे टॉक्सिन बाहेर काढावे लागतील. यासाठी तुम्ही आयुर्वेदिक ड्रिंक्सची मदत घेऊ शकता.

Lemon water with black pepper powder benefits for body detoxification | लिंबू पाण्यात हे खास पावडर टाकून करा सेवन, लघवीव्दारे निघून जातील सगळे विषारी पदार्थ

लिंबू पाण्यात हे खास पावडर टाकून करा सेवन, लघवीव्दारे निघून जातील सगळे विषारी पदार्थ

Body Detox Drink : जर आपल्या आजारांबाबत आपण काही रिसर्च केला तर असं आढळून येईल की, प्रत्येक आजाराची सुरूवात दुसऱ्या कशाने नाहीतर टॉक्सिनमुळे होते. हे विषारी पदार्थ असतात, जे विषासारखं काम करतात. यामुळे शरीरातील कोशिका नष्ट होऊ लागतात आणि हळूहळू शरीर आतून डॅमेज होऊ लागतं.

जर आजारी पडायचं नसेल तर शरीरातून हे टॉक्सिन बाहेर काढावे लागतील. यासाठी तुम्ही आयुर्वेदिक ड्रिंक्सची मदत घेऊ शकता. सकाळी यांचं सेवन केल्याने शरीरातील सगळे विषारी पदार्थ लघवी आणि विष्ठेद्वारे शरीरातून बाहेर पडतात. चला जाणून घेऊ काही घरगुती ड्रिंक्सबाबत...

लिंबू पाणी आणि काळ्या मिऱ्याचं पावडर

बॉडी डिटॉक्स करण्यासाठी लिंबू पाणी एक बेस्ट ड्रिंक आहे. जर यात काळ्या मिऱ्यांची पूड मिक्स करून सेवन कराल तर याचा खूप फायदा मिळतो. याने पचनतंत्र निरोगी राहतं आणि मेटाबॉलिज्मही बूस्ट होतं. स्टडीनुसार, यात व्हिटॅमिन सी असतं, ज्याचा विषारी पदार्थ काढण्यासाठी वापर केला जातो. 

इतरही काही फायदेशीर ज्यूस

आवळा ज्यूस

जर तुम्हाला आवळा आवडत असेल तर याचा ज्यूस पिऊन तुम्ही हेल्दी बनू शकता. याने तुमचं लिव्हर, केस, त्वचा आणि डोळ्यांची समस्याही दूर होते. यात अॅंटी-इन्फ्लामेटरी, अॅंटी-डायबिटीक आणि अॅंटी-ऑक्सिडेंटही असतात.

भाज्यांचा ज्यूस

काकडी, पालक, गाजर, आल्यांमध्ये भरपूर प्रमाणात अॅंटी-ऑक्सिडेंट असतात. याने तुमचं पोट आणि आतड्या आतून साफ करण्यास मदत मिळते. याचा हृदयापासून ते मेंदूपर्यंत चांगला प्रभाव पडतो. तसेच यांमध्ये अनेक व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स असतात.

एलोवेरा ज्यूस

घरी एलोवेराचं जेल काढून त्याचा ज्यूस बनवा. हा ज्यूस सकाळी रिकाम्या पोटी सेवन केला तर शरीरातील सगळे विषारी पदार्थ बाहेर निघतात. या ज्यूसने घातक फ्री-रॅडिकल आणि ऑक्सीडेटिव स्ट्रेस नष्ट दूर होतो. तसेच अनेक आजारही दूर होतात.

कोमट पाणी

रोज सकाळी नुसतं एक ग्लास कोमट पाणी प्यायल्यानेही शरीराला अनेक फायदे मिळतात. अनेक आजारांपासून शरीराचा बचावही होतो. याने शरीरातील अनेक विषारी पदार्थ बाहेर निघतात आणि मेटाबॉलिज्मही वाढतं.

Web Title: Lemon water with black pepper powder benefits for body detoxification

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.