पावसाळ्यात निरोगी राहायचंय? मग 'या' गोष्टी खाणं टाळा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2018 03:46 PM2018-07-05T15:46:23+5:302018-07-05T15:47:22+5:30
पावसाळ्यात निरोगी राहायचंय असेल तर खाण्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी टाळाव्यात हे जाणून घेऊया.
पावसाळ्यातलं धुंद वातावरण सर्वांनाच आवडतं. मात्र याच वातावरणात अनेकदा आजारी पडण्याचा धोका हा अधिक असतो. खाण्याच्या काही चुकीच्या सवयी या आजारपणाला आमंत्रण देत असतात. त्यामुळेच पावसाळ्यात निरोगी राहायचंय असेल तर खाण्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी टाळाव्यात हे जाणून घेऊया.
- पावसाळ्यात अनेकदा वाफाळलेल्या चहासोबत भजीचा बेत आखला जातो. मात्र मोकळ्या वातावरणात उघड्यावर तळले गेलेले अन्नपदार्थ खाणं शक्यतो टाळा. कारण हवेतील जंतू हे त्या पदार्थावर बसतात त्यामुळे पोटाचे अनेक विकार होण्याचा धोका संभवतो.
- हिरव्या पालेभाज्या या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत फायदेशीर असतात. तसेच डॉक्टरही त्या खाण्याचा सल्ला देतात. मात्र पावसाळ्यात शेतात किडे-जंतू असतात. ते पालेभाज्यांना चिकटतात. त्यामुळेच अशा भाज्यांचं सेवन शक्यतो टाळा.
- बाजारात उघड्यावर विकले जाणाऱे सरबत पिणं टाळा. बऱ्याचदा सरबत तयार करण्यासाठी वापरलेलं पाणी अशुद्ध असते. त्यामुळे पावसाळ्यात घरी फळं आणून त्याचा रस पिणे फायदेशीर ठरेल.
- पावसाळा हा माशांच्या प्रजननाचा काळ असतो. त्यामुळे माशाचे सेवन करणं शक्यतो टाळा.
- पावसाळ्यात शिळे अन्नपदार्थ खाऊ नका. अनेकदा रात्रीचे अन्न वाया जाऊ नये यासाठी ते सकाळी खाल्ले जाते. मात्र पावसाळ्यात वातावरणातील बदलामुळे ते खराब होण्याची शक्यता असते.