हाडे ठिसुळं होणं वाटतं तितक साधं नाही, असु शकतात गंभीर आजार, 'ही' आहेत ५ कारणं
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2021 01:12 PM2021-07-23T13:12:21+5:302021-07-23T13:24:09+5:30
आजकाल वयाच्या तिशीतच हाडे कमजोर होण्याची समस्या जाणवते. हे कशामुळे होत? तुमच्या जीवनशैलीतील या पाच गोष्टी यासाठी जबाबदार असतात...
हाडे बळकट करण्यासाठी शरीर कॅल्शियम व फॉस्फेटचा वापर करते. आहारात योग्य प्रमाणात कॅल्शियम नसल्यास हाडे ठिसूळ बनतात. वयाच्या ४० व्या वर्षानंतर जेवणात कॅल्शियम योग्य प्रमाणात असणे आवश्यक आहे कारण याच काळामध्ये हाडांची झीज मोठ्या प्रमाणात होत असते. मात्र आजकाल वयाच्या तिशीतच हाडे कमजोर होण्याची समस्या जाणवते. हे कशामुळे होत? तुमच्या जीवनशैलीतील या पाच गोष्टी यासाठी जबाबदार असतात...
धुम्रपान आहे घातक
धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींमध्येही हाडे पोकळ होण्याची क्रिया अधिक झपाट्याने होत असते. धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींमध्ये इस्ट्रोजेन तयार होण्यात अडथळा निर्माण होत असतो. तसेच धुप्रमान केल्यामुळे कॉर्टिसोलचे शरीरातील प्रमाण वाढते. त्यामुळे तुम्ही सतत तणावाखाली राहता.
मद्यपानाने हाडे होतात ठिसुळ
रोज मद्यपान करणाऱ्या व्यक्तीमध्ये हाडे झिजण्याची क्रिया झपाट्याने होत राहते. अधिक प्रमाणात मद्यसेवन करणाऱ्या व्यक्तीमध्ये सकस आणि संतुलित आहाराचा नेहमी अभावच दिसतो. अति मद्यपान केल्याने देखील कॉर्टिसोलचे शरीरातील प्रमाण वाढते. ज्यामुळे बोन स्टॉक लॉस व्हायला सुरुवात होते. तसेच शरीरात टेस्टेरॉन आणि अॅस्ट्रोजनचे उत्पादन होणेही कमी होते जे हाडांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे.
व्यायामाचा अभाव प्रमुख कारण
व्यायाम किंवा हालचालींचा अभाव असणे हे हाडे ठिसुळ होण्याचे प्रमुख कारण आहे. शारीरिक विश्रांतीच्या काळात हाड मजबुत होण्याची क्रिया मंदावते. त्यांच्या शरीरात बोन लॉस अधिक होतो. मसल्सचे कॉन्ट्रॅक्ट होणे तुमच्या शरीरासाठी फार महत्त्वाचे असते. त्यामुळे व्यायाम करा. दिवसभर अॅक्टीव्ह न राहिल्याने बोन डेन्सिटी कमी होण्याचा धोका असतो.
खारट गोष्टींचे अतिसेवन
जर तुम्ही खारट गोष्टी जास्त खात असाल तर तुमची बोन डेन्सिटी कमी होण्याची शक्यता असते. आहारात मीठाचे जास्त प्रमाण हाडांना अत्यंत मारक ठरतो हे सर्वानी लक्षात ठेवले पाहिजे. दरडोई मीठ १ चमचापर्यंत मर्यादित ठेवायला सांगतात; पण लोक दुप्पट मीठ वापरतात. १ चमचा मीठ वापरण्याने चाळीस मिलिग्रॅम कॅल्शियम बाहेर फेकले जाते.
सुर्यप्रकाशाचा अभाव
सतत घरातच राहिल्यामुळे हाडे ठिसुळ होतात. हाडांसाठी व्हिटॅमिन डी अत्यंत आवश्यक आहे. जर तुम्हाला पुरेसा सुर्यप्रकाश मिळत नसेल तर त्यामुळे तुमची हाडं ठिसुळ होतात. तुम्ही दिवसातून जवळपास १५ मिनिटे तरी सुर्यप्रकाशात गेले पाहिजे.