'या' सवयी तुमच्या मृत्यूलाही कारणीभूत ठरु शकतात कारण, यांच्यामुळे वाढतो ब्रेन स्ट्रोकचा धोका
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2021 12:39 PM2021-10-08T12:39:23+5:302021-10-08T12:42:58+5:30
नियमित व्यायाम न केल्याने तुमचे वजन झटपट वाढते. यामुळे स्ट्रोकचा धोका वाढतो आणि इतर अनेक आजार होण्याची शक्यता असते.
नियमित व्यायाम न केल्याने तुमचे वजन झटपट वाढते. यामुळे स्ट्रोकचा धोका वाढतो आणि इतर अनेक आजार होण्याची शक्यता असते. सिगारेट ओढणे आरोग्यासाठी हानिकारक आहे. तुमच्या हृदयाचे आरोग्य आणि श्वसनाचे कार्य बिघडवण्याव्यतिरिक्त, सिगारेट ओढणाऱ्या व्यक्तीला स्ट्रोकचा धोका देखील वाढतो.
शारीरिक हालचालींचा अभाव - नियमित व्यायाम न केल्याने तुमचे वजन झटपट वाढते. यामुळे स्ट्रोकचा धोका वाढतो आणि इतर अनेक आजार होण्याची शक्यता असते.
धूम्रपान - सिगारेट ओढणे आरोग्यासाठी हानिकारक आहे. तुमच्या हृदयाचे आरोग्य आणि श्वसनाचे कार्य बिघडवण्याव्यतिरिक्त, सिगारेट ओढणाऱ्या व्यक्तीला स्ट्रोकचा धोका देखील वाढतो.
अल्कोहोल - तज्ञांच्या मते, जास्त मद्यपान केल्याने स्ट्रोक होऊ शकतो. दररोज जास्त प्रमाणात मद्यपान केल्याने रक्तदाब वाढतो.
स्ट्रोकची इतर कारणे - ब्रेन स्ट्रोकचे इतरही अनेक कारणे आहेत. यामध्ये उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्टेरॉल, साखर, अनियमित हृदयाचे ठोके यासारख्या कारणामुळे देखील स्ट्रोकचा धोका वाढतो.