अल्ट्रा प्रोसेस्ड पदार्थांच्या सेवनाने लवकर होऊ शकतो मृत्यू - रिसर्च
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2019 04:35 PM2019-02-20T16:35:40+5:302019-02-20T16:37:35+5:30
आरोग्य उत्तम राखण्यासाठी किंवा योग्य आहारासाठी अनेक शोध करण्यात येत असतात. भारतामध्ये आधी सामान्य खाण्या-पिण्याच्या पद्धती होत्या, त्यांच्यामध्ये आता बदल होत असून सध्या लोक जास्तीत जास्त जंक फूडचं सेवन करू लागली आहेत.
(Image credit : livescience.com)
आरोग्य उत्तम राखण्यासाठी किंवा योग्य आहारासाठी अनेक शोध करण्यात येत असतात. भारतामध्ये आधी सामान्य खाण्या-पिण्याच्या पद्धती होत्या, त्यांच्यामध्ये आता बदल होत असून सध्या लोक जास्तीत जास्त जंक फूडचं सेवन करू लागली आहेत. जगातील इतर देशांच्या तुलनेत पश्चिमेकडील देशांमध्ये प्रोसेस्ड फूडचं सेवन जास्त प्रमाणात करण्यात येतं. सध्या अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडचं सेवन करण्यात येऊ लागलं आहे. संयुक्त राज्यांमध्ये जास्तीत जास्त लोक एका दिवसामध्ये 61 टक्क्यांपेक्षा अधिक अल्ट्राप्रोसेस्ड पदार्थांचे सेवन करतात.
अल्ट्राप्रोसेस्ड फूडच्या सेवनाने माणसाचं जीवन कमी होत असल्याचे फ्रान्समध्ये करण्यात आलेल्या एका संशोधनातून सिद्ध झालं आहे. संशोधनातून असं सिद्ध झालं की, जर तुम्ही तुमच्या जेवणात 10 टक्के अल्ट्राप्रोसेस्ड फूड वापरत असाल तर तुमचं जीवन 14 टक्क्यांनी कमी होतं.
अल्ट्राप्रोसेस्ड फूड कसं ठरतं नुकसानदायी?
अल्ट्राप्रोसेस्ड फूड तयार करण्यासाठी काही कॉस्मेटिक पद्धतीचा वापर करण्यात येतो. ज्यामुळे ते खूप काळापर्यंत उपयोगात आणता येतील. अल्ट्राप्रोसेस्ड फूडचं सेवन जास्तकरून स्नॅक्स, डेजर्ट किंवा रेडी-टू-ईट पदार्थांमध्ये करण्यात येतो.
संशोधकांनी या संशोधनातून 45,000 फ्रान्समध्ये राहणाऱ्या युवकांना या संशोधनात सहभागी करून घेतले. जे 24 तासांमध्ये आपल्या खाण्या-पिण्याच्या सवयींना 7 वर्षांपर्यंत तयार करण्यात आलं. या संशोधनात 45 वर्षांपेक्षा अधिक युवकांना सहभागी करण्यात आलं होतं. सात वर्षांपर्यंत चालणाऱ्या या संशोधना दरम्यान सहभागी लोकांपैकी 602 जणांचा मृत्यू झाला होता. हे संशोधन JAMA Internal Medicine मध्ये 11 फेब्रुवारीला प्रकाशित झाला आहे.
अल्ट्राप्रोसेस्ड फूड सामान्यतः रासायनिक तत्वांच्या उपयोगातून तयार करण्यात येतात. ज्यामुळे ते जास्तीत जास्त दिवस टिकण्यास मदत होईल. अल्ट्राप्रोसेस्ड फूडमध्ये साखर, मीठ, तेल आणि फॅट्सचा अधिक प्रमाणात उपयोग करण्यात येतो.
अल्ट्राप्रोसेस्ड फूड तयार करण्यासाठी अत्यंत सोयीस्कर असून स्वादिष्टही असतं. यांना रेडी-टू-ईटच्या कॉन्सप्टने तयार करण्यात येतं. परंतु हे तयार करताना आरोग्याचे मुद्दे लक्षात घेतले जात नाहीत.
अल्ट्राप्रोसेस्ड फूड आरोग्यासाठी मुख्य कारण :
- योग्य प्रमाणात फायबर नाही
- मीठाचे प्रमाण जास्त
- अधिक प्रमाणात ओमेगा - 6 फॅटी अॅसिड असतं.
- अधिक ओमेगा - 3 फॅटी अॅसिड असतं.
- अधिक ब्रांक्ड-चेन एमिनो अॅसिड आहे.
- नायट्रेड मोठ्या प्रमाणावर असतं.
- फ्रुक्टोजचे प्रमाणही अधिक असते.