गाणे ऐका, स्मृतिभ्रंश टाळा !

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2017 04:09 PM2017-01-10T16:09:05+5:302017-01-10T16:09:05+5:30

आज प्रत्येकाचे आयुष्य धकाधकीचे, ताणतणावाचे झाले आहे. त्यातूनच सतत चिंता करणे, भीती यामुळे स्मृतिभ्रंश होण्याचा धोका संभवतो. साधारणपणे स्मृतिभ्रंश वृद्धांमध्ये जास्त प्रमाणात दिसून येतो.

Listen to the song, avoid dementia! | गाणे ऐका, स्मृतिभ्रंश टाळा !

गाणे ऐका, स्मृतिभ्रंश टाळा !

Next
प्रत्येकाचे आयुष्य धकाधकीचे, ताणतणावाचे झाले आहे. त्यातूनच सतत चिंता करणे, भीती यामुळे स्मृतिभ्रंश होण्याचा धोका संभवतो. साधारणपणे स्मृतिभ्रंश वृद्धांमध्ये जास्त प्रमाणात दिसून येतो. एका संशोधनाद्वारे स्मृतिभ्रंश झालेल्यांनी टॅबलेट किंवा इतर माध्यमाद्वारे गाणे ऐकण्यामुळे मोठा फायदा होत सकारात्मक परिणाम होत असल्याचे निदर्शनास आले आहे. गाणे ऐकणे ही एक सुरक्षित आणि उपयुक्त अशी उपचारपद्धती असल्याचे अमेरिकेतील मॅकलिन रुग्णालयातील लिप्सीत वाहिया यांनी देखील म्हटले आहे.
 
टॅबलेटवर गाणे ऐकण्याबरोबरच मानसिक मानसिक आरोग्यावरील उपचारासाठी आवश्यक असणाऱ्या विविध अ‍ॅपचा वापर केल्यास त्याचा रुग्णांवर सकारात्मक परिणाम होत असल्याचे दिसून आले. हे अ‍ॅप विकसित करणाऱ्या विकासकांनी  लोकांसाठी अधिक विकसित तंत्रज्ञान आणण्याची गरज असल्याचे या संशोधनाचे प्रमुख असलेल्या वाहिया यांनी म्हटले आहे.

स्मृतिभ्रंश मध्ये बऱ्याचदा औषधोपचारही केला जातो. मात्र, त्याऐवजी विविध कला, गाणे ऐकणे आणि इतर समांतर उपचारपद्धतींमुळे रुग्णांमध्ये सुधारणा दिसून आल्याचे त्यांनी सांगितले. टॅबलेटचा वापर गाण्याबरोबरच रुग्णांना संगणकीय ज्ञान वाढवण्यासाठीही होत असल्याचे यातून दिसून आले. टॅबलेटमध्ये संशोधकांनी अभ्यास करण्यासाठी सुमारे ७१ पेक्षा अधिक अ‍ॅपचा समावेश केला होता. यामध्ये मानसिक सुधारणा होण्यासाठी फोटो काढणे ते सुडोकू कोडी यांसारख्या अनेक अ‍ॅपचा समावेश करण्यात आला होता.

टॅबलेट हा या रुग्णांसाठी सर्वात सुरक्षित असल्याचे अभ्यासात दिसून आले. तसेच त्यांना या वेळी ते कसे वापरायचे याचे प्रशिक्षणही देण्यात येत होते. उदा. काही रुग्णांना यूटूबवर व्हिडीओ दाखविण्यात आले, त्याचा रुग्णांवर सकारात्मक प्रभाव पडल्याचे वाहिया यांनी सांगितले. हे संशोधन अमेरिकेच्या मनोदोषचिकित्सा नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे.

Web Title: Listen to the song, avoid dementia!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.