फोनवर मोठ्या आवाजात गाणी ऐकणं धोकादायक, मग किती वेळ हेडफोन वापरणं योग्य?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2019 11:23 AM2019-02-15T11:23:08+5:302019-02-15T11:51:28+5:30

रस्त्यावर चालताना, गाडी चालवताना किंवा बस-ट्रेनमध्ये प्रवास करताना अलिकडे सगळेच मोबाइलवर हेडफोन लावून गाणी ऐकताना बघायला मिळतात.

Listening to music on loud sound is dangerous, do not use headphone for more than 4 minutes | फोनवर मोठ्या आवाजात गाणी ऐकणं धोकादायक, मग किती वेळ हेडफोन वापरणं योग्य?

फोनवर मोठ्या आवाजात गाणी ऐकणं धोकादायक, मग किती वेळ हेडफोन वापरणं योग्य?

Next

(Image Credit : Angie's List)

रस्त्यावर चालताना, गाडी चालवताना किंवा बस-ट्रेनमध्ये प्रवास करताना अलिकडे सगळेच मोबाइलवर हेडफोन लावून गाणी ऐकताना बघायला मिळतात. एकदा का हेडफोन लावले की, जगाशी त्या व्यक्तींचा संपर्कच तुटतो. मोबाइलवर छोटे किंवा मोठे हेडफोन लावणं हे जरी कूल वाटत असलं तरी तितकं ते नाहीये. तुम्हालाही स्मार्टफोनवर हेडफोनने मोठ्या आवाजात गाणी ऐकण्याची सवय असेल तर तुम्ही वेळीच सावध व्हावे. याआधीही अनेक रिसर्चमधून हेडफोन वापरण्याच्या तोट्यांबाबत सांगण्यात आले आहेत. पण आता एका रिपोर्टनुसार, याचा जगभरातील कोट्यवधी लोकांना मोठा फटका बसणार आहे. या अभ्यासानुसार केवळ ४ मिनिटेच हेडफोन वापरणे योग्य आहे. 

यूनायटेड नेशन्सच्या एजन्सी रिपोर्टनुसार सांगण्यात आलं आहे की, स्मार्टफोनमध्ये संगीत ऐकणं आणि सतत मोठ्या आवाजाच्या संपर्कात राहिल्याने जगभरातील साधारण १ अरबपेक्षा जास्त लोकांना बहिरेपणाचा धोका आहे. ही समस्या दूर करण्यासाठी त्यांनी काही नवीन गाइड लाइन्सही जाहीर केल्या आहे. 

१२ ते ३५ वयोगटातील लोकांना अधिक धोका

यूएनच्या रिपोर्टनुसार, १२ ते ३५ वयोगटातील लोकांना ही समस्या होण्याचा धोका अधिक आहे. हेल्थ ऑर्गनायझेशन WHO ने सांगितले की, हिअरिंग लॉसच्या समस्येमुळे जगभरात ७५० मिलियन डॉलर खर्च होण्याचा अंदाज आहे. WHO च्या तांत्रिक अधिकारी शेली चढ्ढा यांच्यानुसार, जगभरातील एक अरबपेक्षा अधिक तरूणांना स्मार्टफोनवर मोठ्या आवाजात गाणी ऐकायला पसंत असतं. ते यासाठी इअरफोन किंवा हेडफोनचा वापर करतात. पण यामुळे ते बहिरेपणाचे शिकार होत आहेत. त्यांची ऐकण्याची शक्ती कमी होत आहे. 

४ वर्ष केला गेला अभ्यास

शेली चड्ढा यांच्यानुसार, ही आकडेवारी त्यांच्या एका अभ्यासावर आधारित आहे. हा अभ्यास साधारण ४ वर्ष करण्यात आला. यात तरूणांची ऐकण्याची सवय आणि किती मोठ्या आवाजात ते गाणी ऐकतात या दोन गोष्टींवर फोकस करण्यात आला होता. या अभ्यासातून तरूणांचा बहिरेपणापासून बचाव करण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टीही समोर आल्या आहेत. प्रयत्न हाच केला जात आहे की, यूजरला सशक्तआणि जागरूक केलं जावं, जेणेकरून ते योग्य ऐकू शकतील आणि निर्णय घेऊ शकतील. 

फोनमध्ये व्हॉल्यूम कंट्रोल वापरा

चड्ढा यांनी सांगितलं की, आपणा सर्वांच्या स्मार्टफोनमध्ये एक साउंड कंट्रोलिंग सिस्टीम असते, त्यावरून हे कळतं की, आवाज किती प्रमाणात आहे. तसेच आवाज प्रमाणापेक्षा जास्त होत आहे हेही दाखवलं जातं. अशात जर बहिरेपणा टाळायचा असेल तर स्मार्टफोनमध्ये देण्यात आलेली गाइडलाइन्स आवर्जून फॉलो करा. त्यासोबतच बहिरेपणाचा त्रास कमी करण्यासाठी ऑटोमॅटिक व्हॉल्यूम डिवाइसचा वापरही करू शकता. याने कानात होणारा आवाज आपोआप कमी होईल. 
 

Web Title: Listening to music on loud sound is dangerous, do not use headphone for more than 4 minutes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.