खुशखबर! मोफत कोरोना लस वितरणाची देशात जय्यत तयारी; सरकारकडून यादी बनवण्याचं काम सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2020 12:10 PM2020-11-11T12:10:38+5:302020-11-11T12:13:47+5:30

CoronaVirus News & Latest Updates: सगळ्यात आधी लस ही आरोग्यक्षेत्रात कार्यरत असलेल्या लोकांना दिली जाणार असून त्यासाठी यादी तयार करण्यात येत आहे.

listing of health workers to give free corona vaccine vigorous preparations for storage and supply | खुशखबर! मोफत कोरोना लस वितरणाची देशात जय्यत तयारी; सरकारकडून यादी बनवण्याचं काम सुरू

खुशखबर! मोफत कोरोना लस वितरणाची देशात जय्यत तयारी; सरकारकडून यादी बनवण्याचं काम सुरू

googlenewsNext

 जगभरासह देशात कोरोना लसीची साठवणूक आणि वितरण यांवर वेगाने काम सरू आहे. भारतातही केंद्र सरकारने दिलेल्या निर्देशानुसार अनेक राज्यात लसीच्या वितरणासाठी तयारी सुरू करण्यात आली आहे.  सगळ्यात आधी लस ही आरोग्यक्षेत्रात कार्यरत असलेल्या लोकांना दिली जाणार असून त्यासाठी यादी तयार करण्यात येत आहे. यासाठी एक अॅप्लिकेशन तयार करण्यात आलं आहे. तज्ज्ञ साठवणूक आणि वितरणासाठी भारतातील सीमा आणि समस्यांवर अधिक लक्ष देत आहेत.

भारतात कोरोना लसीच्या साठवणूकीची व्यापक स्वरूपात तयारी केली जात आहे. केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार अनेक राज्यांमध्ये कोल्ड स्टोरेजची व्यवस्था पाहिली जात आहे. यासाठी केंद्र सरकारला राज्याकडूनही मदत मिळत आहे. राज्य सरकारने दिलेल्या माहितीनसार केंद्राकडून फिरते रिफ्रेजरेटर, कूलर आणि मोठे  रेफ्रिजेरेटर याशिवाय  150 डीप फ्रीजरर्सची व्यवस्था केली आहे. राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांवर मोठ्या प्रमाणात रेफ्रिजरेटर तयार केले जात आहेत. याशिवाय मेंटेनेसचं कामही केलं जात आहे. 

फायजरने दिलेल्या माहितीनुसार कोरोनाच्या लसीला -75°C±15°C स्टोरेजची आवश्यकता  भासेल.  कंपनीच्या प्रवक्त्यांनी द इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या माहितीनुसार,  कोट्यावधी डोस -90°C  ते -60°C च्या जवळपास तापमानात साठवणूक करण्यासाठी फ्रिजरची क्षमता असायला हवी. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार यासाठी जगभरातील कोणताही  देशाने तयारी केलेली नाही. कोरोनाची लस माहगडी असून त्याची साठवणूक व्यवस्था हे एक मोठं आव्हान ठरलं आहे. 

भारतात सद्यस्थितीत  कोल्ड स्टोरेजची क्षमता ४ ते ५ कोटी लसींची आहे. साधारणपणे भारतात पोलिओ लसीच्या वितरणासाठी कोल्ड स्टोरेज तयार करण्यात आली होती. पोलियोच्या लसीच्या साठवणूकीसाठी -20°C तापमानचा गरज असते. तसंच 2°C से 8°C तापमानात वितरण केलं  जातं. फक्त रेफ्रिजेशनची क्षमता वाढवून चालणार नाही तर त्यासाठी मोठ्या प्रमाणात वीजेचीही आवश्यकता असते. लॉजिस्टिक, तसंच कोल्ड स्टोरेजच्या समस्येचा सामना करावा लागता कामा नये. फायजर कंपनीने पश्चिमेकडील काही देशांमध्ये लस वितरण करण्याची व्यवस्था केली आहे. साधारणपणे आशिया, आफ्रिकेतील जास्तीत जास्त कोल्ड स्टोरेज करता येईल अशा देशांचा शोध घेतला जात आहे. 

..म्हणून भारतात सर्वाधिक किशोरवयीन मुलांची उंची राहते कमी, अभ्यासातून समोर आला असा निष्कर्ष

दोन कंपन्या फायजर आणि बायोएनटेक यांनी दिलेल्या माहितीनुसार या वर्षाच्या शेवटापर्यंत  ५ कोटी लसीचे डोस पुरवले जातील तसंच  २०२१ च्या शेवटापर्यंत १.३ अरब डोसचा पुरवठा केला जाणार आहे. प्रत्येक व्यक्तीला दोन डोस देण्याची गरज असेल. म्हणजेच यावर्षी २.५ कोटी लोकांना तर पुढच्यावर्षी  ६५ कोटी लोकांना कोरोनाची लस घेता येईल. 

व्हिटामीन्सच्या कमतरतेमुळे ८० % लोक साथीच्या आजारांना पडताहेत बळी; वेळीच आहारात 'या' पदार्थांचा करा समावेश

भारत सरकारच्या आदेशानुसार इंडियन मेडिकल असोशियेशन अशा  डॉक्टरांची यादी तयार करत आहेत. ज्यांना लस दिली जायलाच हवी. असोशियेशनने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात ऐलोपेथी, होमिओपेथी, आयुर्वेदातील  जवळपास  २.५० डॉक्टरांचा या यादीत समावेश आहे. या सर्वच डॉक्टरांचे मोफत लसीकरण केले जाणार आहे. खासगी क्षेत्रात कार्यरत असलेल्या डॉक्टरांना  १२ नोव्हेंबरपर्यंत आपली संपूर्ण माहिती द्यायची आहे. 

Web Title: listing of health workers to give free corona vaccine vigorous preparations for storage and supply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.