कौशल्य जगण्याचे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2017 05:51 PM2017-08-09T17:51:25+5:302017-08-09T17:51:53+5:30

माझ्या कार्य शाळेत मी बरेचदा एक प्रश्न विचारते ..  तुमच्या मते जीवन म्हणजे काय ? या प्रश्नावर विविध उत्तरे मिळतात ….     कोणी म्हणतो  जीवन एक संघर्ष आहे       कोणाला जीवन एक प्रवास वाटतो. 

To Live Skill | कौशल्य जगण्याचे 

कौशल्य जगण्याचे 

googlenewsNext

- डाॅ.अरुणा तिजारे 

माझ्या कार्य शाळेत मी बरेचदा एक प्रश्न विचारते ..
 तुमच्या मते जीवन म्हणजे काय ?
या प्रश्नावर विविध उत्तरे मिळतात ….   
 कोणी म्हणतो  जीवन एक संघर्ष आहे     
 कोणाला जीवन एक प्रवास वाटतो. 
तर कोणाला ते एक न  सुटणारं कोडं वाटतं   
    खरंच जीवनाची अशी एखादी व्याख्या आहे का? 
चार आंधळ्यांनी केलेल्या हत्तीच्या वर्णनासारख्याच आपल्या ह्या कल्पना आहेत . आणि आपण प्रत्येक जण आपापापल्या कल्पने प्रमाणे जगत  असतो . 
मला जीवन एका महासागरासारखे वाटते . आणि या महासागरातून सुखरूप  आपल्या  ध्येयापर्यंत पोहचायला कौशल्याची गरज आहे .
कौशल्य - सतत समतोल राखण्याचं!
कसं जगणं तोलाचं ? .... यशाचं का शांतीचं ?
कसं जगणं मोलाचं ?.... धनाचं का समाधानाचं ?
कसं  जगणं सुखाचं ?.... ध्येयाचं का मुक्तीचं ?
कसं जगणं युक्तीचं ?.... महात्वाकांक्षेमागे धावण्याचं का आंतरिक गाभा मिळवण्याचं ? 
प्रश्न! प्रश्न !! प्रश्न !!! अनंत प्रश्न आणि अनंत उत्तरं !
एका  तागडीत या जगातील यश, समृद्धी तर दुसऱ्या तागडीत आनंद, समाधान, शांती. 
कसं जगणं तेलाचं ? आणि तोलणार  कोण? या दोन्हीचा समतोल शक्य आहे का? आपण सगळेच सतत हा समतोल साधायची कसरत करत असतो पण हे कौशल्य मात्र काही जणांनाच जमतं .
दाही दिशांनी वेगवेगळ्या अपेक्षा आपल्याला ओढत असतात . एकीकडे कुटुंबियांच्या अपेक्षा, नातेसंबंधांची भावनिक गुंतागुंत , दुसरीकडे आपल्या स्वतः कडून असलेल्या अपेक्षा, आणि ह्या अपेक्षा ज्या समाजात पूर्ण करायच्या आहेत त्या समाजाच्या अपेक्षा . एकीकडे समाजातील जीवघेणी स्पर्धा - मुलांचं मार्कांसाठी धावणं , नोकरी करणाऱ्यांची बढतीसाठी शर्यत आणि धडपड, गृहिणींची घर, मुलं, नवरा सांभाळतांना उडणारी तारांबळ. ह्या सगळ्यात भर म्हणून मानसिक गोंधळ - पैश्याच्या मागे लागणं वाईट पण पैसा तर मिळवायलाच हवा - मग तो अगदी न आवडणारी नोकरी करून मिळवावा लागला तरी महत्वाकांक्षा जास्त ठेवली तर नातेसंबंध नाराज होतात . 
एक जीव करणार तरी काय काय?... त्यात हा तोल सांभाळतांना येणारा ताणतणाव जर नियंत्रित नाही केला तर शारीरिक आणि मानसिक आजारपणांना आमंत्रण . 
मानसोपचार तज्ञ म्हणतात ,९०% आजारपणं ताणामुळे उद्भवतात . वोट्सअप वर सुविचार, ज्ञानाचे पाठ पुढे ढकलणं,  फॉरवर्ड करणं सोपं आहे हो, पण प्रत्यक्षात आचारायला  केव्ह्ढ्या तरी अडचणी !!!
मग या कोषातून बाहेर पडण्याचा मार्गच नाही कां ? यश, संपत्ती बरोबरच आनंद, समाधान, शांती शक्य आहे का? हो आहे ! तेच तर कौशल्य, कसरत आहे . हे कौशल्य कोणालाही  शिकता  येतं आणि सरावाने त्यात प्रावीण्य सुद्धा मिळवता येतं
या कोषातून बाहेर पडण्यासाठी 'मी ' च ज्ञान घेणं आवश्यक आहे. आपला समाज असतो मी म्हणजे मला आरश्यात दिसते तेव्हडीच मी- माझे गुण , अवगुण ,इच्छा आकांक्षा !!! आणि मग याच मी कडून आपण सगळीकडे पुरे पडण्याचा प्रयत्न करतो . पण खऱ्या अर्थानी मी हा थ्री डिमेंशनल आहे . माझं शरीर, माझं मन , आणि माझा आत्मा . मन आणि आत्मा दिसत नसले तरी ते दोन मिळून ९९% व्यक्तिमत्व घडत असतं आणि जोपर्यंत आपण ह्या तिन्हींची सतत समप्रमाणात प्रगती ( डेव्हलपमेंट ) करत नाही तोपर्यंत यश, समृद्धी + आनंद , समाधान याच गणित काही सुटत नाही . या तिन्हींची सतत प्रगती म्हणजे काय आणि ती कशी करायची? 
शरीराची (निगा) प्रगती -योग्य आहार, योग्य व्यायाम, आणि योग्य आराम यांनी होते तर
 मनाची प्रगती- नवीन ज्ञान मिळवुन , वाचन, मनन, चिंतनानी होते 
आत्मिक प्रगतीसाठी -ध्यान , धारणा, स्वः जागरूकता ( सेल्फ अवेरनेस ), सतत जाणीव पूर्वक जगण्या मुळे होते. 
या तिन्हींचा कुठेही समतोल ढळला तरी त्याचे परिणाम जीवनात आजारपण, अपयश, निराशा ह्या रूपात दिसतात . तेव्हा आजच ठरवून टाका कि ह्या थ्री डिमेन्शनल मी ची प्रगती मी जीवनावर न सोपवता  माझ्या हातात घेणार .

Web Title: To Live Skill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.