Liver कमजोर होण्याआधी शरीर देतं हे संकेत, वेळीच व्हा सावध नाही तर...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2023 01:42 PM2023-01-07T13:42:45+5:302023-01-07T13:44:34+5:30
Liver Disease Symptoms: या अवयवात जराही समस्या झाली तर चांगलंच महागात पडू शकतं. त्यामुळे लिव्हरची काळजी घेणं आपली जबाबदारी आहे. त्यामुळे वेळीच यात काही समस्या असेल तर लक्षणांकडे गंभीरतेने बघावं लागेल.
Liver Disease Symptoms: लिव्हर मानवी शरीरातील सगळ्यात महत्वाच्या अवयवांपैकी एक आहे. लिव्हरद्वारे शरीरातील अनेक कामे केली जातात. ज्यात अन्न पचवण्यापासून ते पित्त तयार करणे, पोषक तत्व स्टोर करणे आणि आजारांपासून बचाव करणे यांचा समावेश आहे. या अवयवात जराही समस्या झाली तर चांगलंच महागात पडू शकतं. त्यामुळे लिव्हरची काळजी घेणं आपली जबाबदारी आहे. त्यामुळे वेळीच यात काही समस्या असेल तर लक्षणांकडे गंभीरतेने बघावं लागेल.
लिव्हरच्या समस्येची लक्षणं
त्वचा पिवळी पडणे
जेव्हाही लिव्हरमध्ये कोणती समस्या असते तेव्हा याचा प्रभाव थेट त्वचेवर पडतो. तुम्ही कधी पाहिलं असेल की, जेव्हाही जॉन्डिस किंवा पिलिया होतो तेव्हा आपल्या त्वचेचा आणि नखांचां रंग पिवळा होऊ लागतो. अशात तुम्ही वेळीच डॉक्टरांकडे जाऊन बिलीरूबिन टेस्ट करावी.
त्वचेवर खाज
जेव्हाही लिव्हर कमजोर किंवा खराब होतं तेव्हा रक्तात पित्त तयार होऊ लागतं. आणि मग त्वचेच्या खालच्या भागात ते जमा होऊ लागतं. यामुळे त्वचेवर खाज येण्याची समस्या होऊ शकते. तशी तर खाज येण्याची वेगवेगळी कारणे आहेत. पण हे लिव्हरच्या समस्येचंही एक कारण आहे.
त्वचेवर निळे डाग पडणं
अनेकदा त्वचेवर निळे चट्टे पडू लागतात आणि सहजपणे रक्तीही बाहेर येतं. ही समस्या लिव्हरच्या आजाराचा संकेत आहे. मुळात ब्लड क्लॉटिंग रोखण्यासाठी ज्या प्रोटीन्सची गरज पडते. ते लिव्हर योग्य प्रमाणात तयार करू शकत नाही. अशात वेळीच टेस्ट करावी.
त्वचेवर स्पायडर एंजियोमा तयार होणं
स्पायडर एंजियोमा असा आजार आहे जो त्वचेच्या खालच्या भागात होतो. यात शरीरात एस्ट्रोजन लेव्हल वाढते. तेव्हा त्वचेचं टेक्सच कोळीच्या जाळ्यासारखं दिसू लागतं. जर तुम्हालाही ही समस्या दिसत असेल तर समजा लिव्हरमध्ये काही समस्या आहे.