रात्री झोपताना दिसतात लिव्हर खराब होण्याचे 'हे' संकेत, 90 टक्के लोक याकडे करतात दुर्लक्ष!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2024 10:55 AM2024-09-13T10:55:21+5:302024-09-13T10:55:55+5:30
Liver damage symptoms : या आजारांची वेगवेगळी लक्षण दिसतात. यातील काही लक्षण रात्रीच्या वेळी दिसतात. जर तुम्ही यांकडे दुर्लक्ष केलं तर तुम्हाला हे महागात पडू शकतं.
Liver damage symptoms: आपल्या शरीरात वेगवेगळे महत्वाची अवयवं असतात. जे वेगवेगळी कामे करतात आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढतात. ज्यामुळे पचनक्रिया मजबूत होते. तसेच शरीरात ब्लड सेल्सही वाढतात. पण आजकाल चुकीच्या लाइफस्टाईलमुळे अनेकांना लिव्हरसंबंधी अनेक गंभीर आजार होत आहेत.
या आजारांची वेगवेगळी लक्षण दिसतात. यातील काही लक्षण रात्रीच्या वेळी दिसतात. जर तुम्ही यांकडे दुर्लक्ष केलं तर तुम्हाला हे महागात पडू शकतं. अशात आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, रात्री लिव्हरसंबंधी आजारांचे काय काय लक्षणं दिसतात.
रात्री दिसणारी लक्षणं
पुन्हा पुन्हा झोपमोड होणे
जर एकदा झोपल्यावर तुम्हाला पुन्हा पुन्हा जाग येत असेल, तर हा लिव्हर खराब झाल्याचा संकेत असू शकतो. लिव्हर खराब झाल्यावर झोपेसंबंधी वेगवेगळ्या समस्या होतात.
खाज
रात्रीच्या वेळी शरीरात खाज येणे हा लिव्हर खराब झाल्याचा संकेत असू शकतो. जेव्हा जेव्हा लिव्हर योग्यपणे काम करत नाही तेव्हा पित्ताचं प्रमाण वाढतं, ज्यामुळे त्वचेवर खाजेची समस्या होते.
सूज
लिव्हर खराब झाल्यावर पाय आणि टाचांवर सूज येऊ शकते. ही सूज सामान्यपणे रात्रीच्या वेळी जास्त दिसू शकते.
मळमळ आणि उलटी
जर तुम्हाला रात्री जास्त मळमळ आणि उलटीची समस्या होत असेल तर हा लिव्हर खराब झाल्याचा संकेत असू शकतो.
लघवीचा रंग पिवळा होणे
लिव्हर खराब होत असेल तर लघवीचा रंग सामान्यापेक्षा जास्त पिवळा दिसतो. हे शरीरात बिलारूबिन वाढल्यामुळे होतं. जे लिव्हरद्वारे तयार केलं जाणारं एक द्रव्य आहे.
या लक्षणांकडे दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात
ही लक्षण सामान्य असू शकतात, त्यामुळे लोक याकडे दुर्लक्ष करू शकतात. पण जर तुम्हाला ही लक्षण नेहमीच दिसत असतील तर तुम्ही वेळीच डॉक्टरांना दाखवा.
लिव्हरच्या आजाराची कारणं...
- जास्त मद्यसेवन करणे
- वायरल हेपेटायटिस
- लठ्ठपणा
- डायबिटीस
- हाय ब्लड प्रेशर
- काही औषधांचं सेवन
लिव्हर हेल्दी ठेवण्याचे उपाय
- संतुलित आणि पौष्टिक आहार
- मद्यसेवन कमी करा
- नियमितपणे व्यायाम करा
- वजन कमी ठेवा
- तणावापासून दूर रहा