गळ्यावर काळपटपणा आणि चामखीळ लिव्हरच्या 'या' आजाराचा संकेत, जाणून घ्या लक्षणं....
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2024 04:43 PM2024-08-19T16:43:50+5:302024-08-19T16:48:22+5:30
Dark Neck Cause : तुम्हाला सुद्धा ही समस्या असेल तर हा लिव्हरच्या आजाराचा संकेत असू शकतो. तसेच हा प्रीडायबिटीसचा देखील संकेत असू शकतो.
Dark Neck Cause : काही लोकांच्या मानेवर काळे डाग आणि चामखीळ असतात. जास्तीत जास्त लोक या काळ्या डागांना मळ समजून याकडे दुर्लक्ष करतात. तर काही लोक हे डाग दूर करण्यासाठी काही केमिकल्स किंवा घरगुती उपायांचा वापर करतात. पण हा गळ्यावरील काळपटपणा काही दूर होत नाही. तुम्हाला सुद्धा ही समस्या असेल तर हा लिव्हरच्या आजाराचा संकेत असू शकतो. तसेच हा प्रीडायबिटीसचा देखील संकेत असू शकतो. चला जाणून याबाबत आणखी सविस्तर...
डायबिटीस लिव्हरसंबंधी एक आजार आहे आणि हा चुकीची लाइफस्टाईल आणि खाण्या-पिण्यामुळे होतो. ब्लडमध्ये इन्सुलिनचं प्रमाण खूप जास्त वाढतं ज्यामुळे गळ्यावर काळपटपणा दिसू लागतो. एकॅन्थोसिस नायग्रिकन्स त्वचेवर काळे डाग येण्याचं कारण असतं. जर तुम्हालाही गळ्यावर काळे डाग दिसत असतील तर लगेच ब्लड टेस्ट करावी किंवा शुगर टेस्ट करून घ्यावी. कारण चामखीळ हे डायबिटीसचा संकेत असू शकतात.
त्वचेवर चामखीळ ब्लडमध्ये हाय ट्रायग्लिसराइड्समुळेही होते, जे डायबिटीसचं कारण आहे. रिसर्चनुसार, तुम्हाला इन्सुलिन रेजिस्टेंस किंवा हायपर ट्राइग्लिसराइडिमिया सारखी समस्या झाल्यावर त्वचेवर ही समस्या दिसू लागते.
कसा कराल बचाव
गळ्यावरील काळे डाग दूर करण्यासाठी आपल्या लाइफस्टाईलमध्ये बदल करा. यासाठी आहार चांगला घ्या, नियमितपणे व्यायाम करा, स्ट्रेस कमी घ्या आणि पुरेशी झोप घ्या. आपली लाइफस्टाईल चांगली ठेवून तुम्ही या समस्या दूर करू शकता.
चामखीळ एकप्रकारचं स्कीन इन्फेक्शन असतं. जेव्हा शरीरात कोणत्याही प्रकारडी गडबड होत असले तर याप्रकारचं संक्रमण शरीरावर दिसू लागतं. खास प्रकारच्या इन्फेक्शनमुळे त्वचेवर लाल आणि काळे डाग दिसू लागतात.