जिभेवर दिसतात लिव्हर डॅमेजची ही 4 लक्षणं, वेळीच व्हा सावध!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2024 10:15 AM2024-05-11T10:15:11+5:302024-05-11T10:15:37+5:30

Liver damage symptoms on Tongue: लिव्हर डॅमेजची लक्षण आपल्या जिभेवरही दिसतात. जिभेवर काय लक्षण दिसतात हेच आज आपण बघणार आहोत. 

Liver disease: Fissured and atrophic tongue could be signs of advanced disease | जिभेवर दिसतात लिव्हर डॅमेजची ही 4 लक्षणं, वेळीच व्हा सावध!

जिभेवर दिसतात लिव्हर डॅमेजची ही 4 लक्षणं, वेळीच व्हा सावध!

Liver damage symptoms on Tongue: आजकाल जगभरातील लोकांना लिव्हरसंबंधी वेगवेगळ्या समस्या होत आहेत. याची वेगवेगळी कारणे असतात. लिव्हरसंबंधी काही समस्या झाली किंवा लिव्हर डॅमेज होत असेल तर शरीरावर वेगवेगळी लक्षण दिसतात. लिव्हर डॅमेजची लक्षण आपल्या जिभेवरही दिसतात. जिभेवर काय लक्षण दिसतात हेच आज आपण बघणार आहोत. 

लिव्हर डॅमेजचे जिभेवर दिसणारी लक्षण

लिव्हर आपल्या शरीरातील महत्वाच्या अवयवांपैकी एक आहे. लिव्हर शरीरातील विषारी पदार्थ फिल्टर करून शरीरातून बाहेर काढतं. सोबतच अन्न पचवण्याच्या कामातही लिव्हरची महत्वाची भूमिका असते. त्यामुळे जेव्हा लिव्हर खराब होतं तेव्हा शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांवर याचा प्रभाव दिसू लागतो. 

जिभेवर भेगा

जिभेवर जर भेगा दिसत असतील तर याकडे दुर्लक्ष करणं महागात पडू शकतं. या भेगा लिव्हरसंबंधी गंभीर समस्या किंवा आजाराच्या लक्षण असू शकतात.

जिभेवर ड्रायनेस

जर तुम्ही भरपूर पाणी पित असाल तरीही तुमच्या जिभेवर ड्रायनेस राहत असेल तर ही समस्या फॅटी लिव्हर डिजीजचं एक लक्षण असू शकते.

जिभेवर पुरळ दिसणे

जिभेवर जर छोटी छोटी पुरळ आणि त्यात पाणी असण्याची समस्या जर दिसत असेल तर हा लिव्हर डॅमेजचा एक संकेत असू शकतो. लिव्हर जेव्हा शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढू शकत नाही तेव्हा शरीरात छोटे छोटे फोड आणि घाव होऊ लागतात.

जिभेवर पिवळेपणा

तोंडाच्या आरोग्याची जर पुरेशी काळजी घेतली गेली नाही तर जिभेचा रंग पिवळा दिसू लागतो. पण जर रोज ब्रश केला आणि जीभ साफ केली तरी जिभेवर पिवळा रंग दिसत असेल तर ही लिव्हरसंबंधी समस्या असू शकते. अशात वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Web Title: Liver disease: Fissured and atrophic tongue could be signs of advanced disease

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.