चेहऱ्यावर दिसत असतील ही लक्षणं तर समजा खराब होत आहे लिव्हर, लगेच करा हे काम
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2023 09:21 AM2023-09-27T09:21:33+5:302023-09-27T09:22:16+5:30
Liver Disease : सामान्यपणे फॅटी लिव्हर दोन प्रकारचे असतात, एक अल्कोहोलिक फॅटी आणि दुसरं म्हणजे नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर.
फॅटी लिव्हरची समस्या फारच कॉमन झाली आहे. या समस्येचा सामना तेव्हा करावा लागतो जेव्हा लिव्हरवर जास्त फॅट जमा होतं. लिव्हर आपल्या शरीरातील सगळ्यात महत्वाच्या अवयवांपैकी एक आहे. लिव्हरमध्ये काहीही समस्या झाली तर त्याचा परिणाम पूर्ण शरीरावर बघायला मिळतो. लिव्हर अन्न पचवण्यासोबतच आपल्या शरीरातून टॉक्सिन बाहेर काढण्यासही मदत करतं.
सामान्यपणे फॅटी लिव्हर दोन प्रकारचे असतात, एक अल्कोहोलिक फॅटी आणि दुसरं म्हणजे नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर. अल्कोहोलिक फॅटी लिव्हर आजाराची समस्या फार जास्त दारूचं सेवन केल्यामुळे होते. तर नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हरची समस्या लठ्ठपणा, हाय ब्लड प्रेशर आणि रक्तात फॅटचं प्रमाण वाढल्यावर होते. ही समस्या मुख्यपणे खराब लाइफस्टाईलमुळे होते.
लिव्हरसंबंधी आजाराची लक्षणं सुरूवातीला दिसत नाहीत. याची लक्षणं तेव्हा दिसणं सुरू होतात जेव्हा लिव्हर काम करणं बंद करतं. याची लक्षण माहीत असणं यासाठीही गरजेचं आहे जेणेकरून तुम्ही यावर लगेच उपाय करू शकाल.
चेहऱ्यावर दिसणारी लक्षणं
त्वचा आणि डोळ्यांचा रंग पिवळा होणे
त्वचा लाल होणे
बारीक त्वचेवर दिसू लागणे
चेहऱ्यावर लाल पुरळ येणे
चेहऱ्यावर का दिसतात ही लक्षणं
हेल्थ एक्सपर्टनुसार, ही लक्षणं तेव्हा दिसू लागतात जेव्हा तुमचं लिव्हर खराब होऊ लागतं आणि हा संकेत आहे की, तुमचं शरीर वेगवेगळ्या प्रकारचे अपशिष्ट पदार्थ साफ करण्याचा प्रयत्न करत आहे. जेव्हा लिव्हर काम करणं बंद करतं तेव्हा बिलीरूबिन तत्व ठीकपणे रिलीज होत नाही. बिलीरूबिनची लेव्हल वाढली तर त्वचा आणि डोळ्यांचा रंग पिवळा पडू शकतो. ज्याला काविळही म्हटलं जातं.
जर तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर यातील कोणतंही लक्षण दिसलं तर जराही उशीर न करता वेळीच डॉक्टरांना दाखवा. लिव्हरची समस्या जास्त वाढली तर डोळ्यांमध्ये याची लक्षणं दिसणं सुरू होतात.
लिव्हर कसं ठेवावं हेल्दी?
लिव्हर हेल्दी ठेवण्यासाठी गरजेचं आहे की, तुम्ही एक हेल्दी डाएट घ्या आणि दारूचं सेवन अजिबात करू नये किंवा कमी प्रमाणात करावं. सोबतच गरजेचं आहे की, तुम्ही रोज एक्सरसाइज करावी.