तळपायांमध्ये होत असेल ही समस्या तर समजून घ्या डॅमेज होत आहे तुमचं लिव्हर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2022 01:11 PM2022-10-03T13:11:12+5:302022-10-03T13:11:31+5:30
Liver disease signs and symptoms : लिव्हर डिजीजचे संकेत आपल्या पायांवरही दिसून येतात. हे संकेत तुम्हाला दिसले तर समजून घ्या तुम्हाला लिव्हरसंबंधी समस्या आहे.
Liver disease signs and symptoms : लिव्हर आपल्या शरीरात वेगवेगळी कामं करतो. लिव्हर शरीरातील विषारी पदार्थ तोडणं, बाइलचं उत्पादन करणं यांसारखी अनेक काम करतं. गेल्या काही वर्षात मोठ्या संख्येने लोकांना लिव्हरच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. लिव्हर डॅमेज होण्यामागे अनेक कारणे असू शकतात. एक चांगली बाब ही आहे की, लिव्हरसंबंधी आजारांना ठीक केलं जाऊ शकतं. पण यासाठी गरजेचं आहे की, तुम्ही याच्या सुरूवातीच्या संकेतांना आणि लक्षणांना ओळखा. लिव्हरमध्ये काही समस्या झाली तर आपलं शरीर अनेक संकेत देतं. लिव्हर डिजीजचे संकेत आपल्या पायांवरही दिसून येतात. हे संकेत तुम्हाला दिसले तर समजून घ्या तुम्हाला लिव्हरसंबंधी समस्या आहे.
पायांवर दिसतात हे संकेत
सूज - एक्सपर्ट सांगतात की, जर तुमच्या पायांवर, तळपायांवर सूज असेल तर हा लिव्हरसंबंधी अनेक समस्यांचा संकेत असू शकतो. जसे की, हेपेटायटिस बी, हेपेटायटिस सी, सिरोसिस, फॅटी लिव्हर डिजीज आणि इतकंच नाही तर लिव्हर कॅन्सर.
एक्सपर्ट सांगतात की, जर तुम्हाला हेपेटायटिस बी किंवा हेपेटायटिस सी असेल तर लिव्हरच्या कॅन्सरचा धोका फार जास्त वाढतो. कारण या आजारांनी नेहमीच सिरोसिसचा धोका वाढतो. कोणत्याही कारणाने लिव्हर डिजीज, सिरोसिसमध्ये बदलू शकतो. ज्यामुळे लिव्हर कॅन्सरचा धोका वाढतो. जर तुम्हाला पायांवर सूज दिसत असेल तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.
तळपायांवर खाज - हेपेटायटिसच्या अॅडव्हांस केसमध्ये काही रूग्णांच्या हात आणि तळपायांवर खाजेची समस्या होते. हे pruritus नावाच्या समस्येमुळे होतं. ज्यामुळे तुमच्या त्वचेवर जास्त खा होऊ लागते. pruritus शिवाय लिव्हर डिजीज झाल्याने तुमची हात आणि पायांची त्वचा जास्त कोरडी होते. ज्यामुळे जास्त खाज होते. अशात हात-पायांवर मॉइश्चरायजर लावा.
तळपायांमध्ये वेदना - लिव्हर डिजीजमुळे तळपायांमध्ये वेदनेची समस्या होऊ शकते. जेव्हा लिव्हर योग्यपणे काम करत नाही तेव्हा इडिमामध्ये फ्लूइड जमा होणं सुरू होतं. पायांमध्ये पेरिफेरल न्यूरोपॅथीलाही क्रॉनिक लिव्हर डिजीजसोबत जोळून बघितलं जातं. लिव्हर डिजीजचं सगळ्यात कॉमन कारण हेपेटायटिस आहे. लिव्हर डिजीजच्या इतर टाइप्समध्ये सिरोसिस, फॅटी लिव्हर डिजीज आणि नॉन अल्कोहोलिक लिव्हरचा समावेश आहे. लिव्हरची समस्या झाल्यावर तळपायांमध्ये वेदना आणि सूज येण्याची समस्या होऊ शकते.
झिणझिण्या आणि पाय सुन्न होणं - लिव्हरच्या समस्येने पीडित लोकांना हेपेटायटिस सी इन्फेक्शन किंवा अल्कोहोलिक लिव्हर डिजीजमुळे पाय सुन्न होणे किंवा झिणझिण्या येणे ही समस्या होते. या दोन्ही समस्या डायबिटीसच्या रूग्णांमध्येही बघायला मिळते. जी लिव्हरच्या समस्येने पीडित लोकांमध्ये दिसणं फार कॉमन आहे. कारण लिव्हर ग्लूकोज लेव्हर कंट्रोल करण्यात मदत करतो.
कोणत्या कारणांनी होते लिव्हर डिजीज समस्या
- एखाद्या औषधाचा साइड इफेक्ट होणं
- डाएटमध्ये साखरेचा जास्त वापर करणे
- जास्त प्रमाणात प्रोसेस्ड फूडचं सेवन करणे
- भाज्या न खाणे
- दारूचं जास्त सेवन करणे
- डाएटमध्ये प्रोटीनचा जास्त समावेश करणे