Liver failure : हे ५ संकेत सांगतात की योग्यप्रकारे काम करत नाही तुमचं लिव्हर, दुर्लक्ष करणं पडेल महागात
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2022 12:23 PM2022-04-15T12:23:35+5:302022-04-15T12:23:58+5:30
Liver failure symptoms: जर या संकेतांकडे लक्ष दिलं नाही तर लिव्हर फेल होऊ शकतं, ऑर्गन ट्रान्सप्लांटेशनची वेळ येऊ शकते. इतकंच काय तर मृत्यूही होऊ शकतो.
Liver failure symptoms: रक्तातून विषारी पदार्थ काढण्यापासून ते पचनक्रिया चांगली करण्याचं काम लिव्हर करतं. याने मेटाबॉलिज्मपासून ते शरीराच्या वेगवेगळ्या क्रिया संतुलित ठेवण्याचं काम लिव्हरमुळे केलं जातं. लिव्हरमध्ये जराही गडबड झाली तर याचा प्रभाव पूर्ण शरीरावर पडतो. याचे अनेक संकेत सतत मिळत असतात. जर या संकेतांकडे लक्ष दिलं नाही तर लिव्हर फेल होऊ शकतं, ऑर्गन ट्रान्सप्लांटेशनची वेळ येऊ शकते. इतकंच काय तर मृत्यूही होऊ शकतो. चला जाणून घेऊ अशाच काही संकेतांबाबत ज्यात लिव्हर योग्यप्रकारे काम करत नाही.
काविळ - काविळीत त्वचा आणि डोळ्याच्या पांढऱ्या रंगाचा रंग पिवळा होतो. इतकंच काय तर लघवी सुद्धा गर्द पिवळ्या रंगाची येते. हा लिव्हर खराब होण्याचा स्पष्ट संकेत आहे. काविळ तेव्हा होतो जेव्हा लिव्हर लाल रक्तपेशींना योग्यप्रकारे संचालित करू शकत नाही आणि यामुळे बिलीरूबिन तयार होतं. निरोगी लिव्हर ते असतं जे बिलीरूबिनला शोषूण घेतलं आणि त्याला पित्तात बदलतं. याने पचनात मदत मिळते.
त्वचेवर खाज - लिव्हरमध्ये कोणत्याही प्रकारची समस्या झाली तर त्वचेच्या आत मोठ्या प्रमाणात पित्त जमा होऊ लागतं. याने त्वचेवर एक थर जमा होऊ लागतो आणि खाजही येते. त्वचेसंबंधी अनेक समस्या जास्तीत जास्त लिव्हरशी संबंधित असतात. मात्र, त्वचेवर खाज येण्याची समस्या प्रत्येकवेळी पित्ताचं जास्त प्रमाण हेच नसते. यामागे आणखीही काही कारण असू शकतं.
भूक न लागणे - लिव्हर एकप्रकारचा पित्त रस बनवतो जो अन्न पचनात मदत करतो. जेव्हा लिव्हर योग्यप्रकारे काम करत नाही तेव्हा याचं फंक्शन पूर्णपणे बिघडतं. ज्यामुळे भूक कमी लागते. याने वजन कमी होतं, पोटात दुखतं आणि मळमळही होऊ लागतं.
ब्लीडिंग आणि जखमा होणे - जर तुम्हाला नेहमीच जखमा होत असेल किंवा तुमच्या जखमा भरण्यात जास्त वेळ लागत असेल तर, वेळीच डॉक्टरांना संपर्क करा. ही लिव्हरशी संबंधित समस्या असू शकते. जखम झाल्यानंतर ब्लीडिंग न थांबणे हे एका आवश्यक प्रोटीनच्या कमतरतेमुळे होतं. हे प्रोटीन बनवण्याचं काम लिव्हरच करतं. लिव्हर योग्यप्रकारे काम करत नसल्याने प्रोटीनही तयार होत नाही. काही केसेसमध्ये लिव्हरच्या समस्येने पीडित लोकांना शौच किंवा उलटीतून रक्तही येतं.
एकाग्रतेची समस्या - जेव्हा लिव्हर रक्तातील विषारी पदार्थ फिल्टर करून शकत नाही. तेव्हा याने शरीरातील इतर क्रियांमध्ये अडथळा निर्माण होतो. टॉक्सिन तयार होण्याचा प्रभाव स्मरणशक्ती आणि मानसिक आरोग्यावर पडू लागतो. यामुळे एकाग्रतेची कमतरता, भ्रम, मेमरी लॉस, मूड स्वींग्स आणि व्यक्तित्वात बदल होऊ लागतो.