पोटात वेदना होण्याचं कारण ठरू शकतो हेपेटायटिस ए आजार, ही लक्षण दिसताच वेळीच व्हा सावध
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2023 10:01 AM2023-03-02T10:01:51+5:302023-03-02T10:02:16+5:30
Hepatitis A Symptoms: हा हेपेटायटिस ए व्हायरसमुळे होणारं एक लिव्हर इन्फेक्शन आहे. व्हायरसमुळे लिव्हरवर सूज येते आणि याने लिव्हरची काम करण्याची क्षमताही कमी होते.
Hepatitis A Symptoms: निरोगी आणि फीट शरीर ठेवण्यासाठी लिव्हरचं मोठं योगदान असतं. लिव्हर शरीरातील विषारी पदार्थ ओळखून त्यांना शरीरात पसरण्यापासून रोखतं. पण जर शरीरातील हा महत्वाचा अवयवच बिघडला तर अनेक प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. हेपेटायटिस ए लिव्हरचा एक आजार आहे. हा हेपेटायटिस ए व्हायरसमुळे होणारं एक लिव्हर इन्फेक्शन आहे. व्हायरसमुळे लिव्हरवर सूज येते आणि याने लिव्हरची काम करण्याची क्षमताही कमी होते.
मेयो क्लीनिकनुसार, दूषित आहार किंवा पाण्यामुळे किंवा याने संक्रमित व्यक्ती वा वस्तुजवळ गेल्याने हेपेटायटिस ए होण्याचा धोका अधिक असतो. हेपेटायटिसच्या हलक्या केसेसमध्ये उपचारांची गरज नसते. जास्तीत जास्त रूग्ण जे संक्रमित असतात ते विना उपचार ठीक होतात. पुन्हा पुन्हा हात धुण्याची सवय इथे फायदेशीर ठरू शकते. हेपेटायटिस ए आजार रोखण्यासाठी याची लसही दिली जाते.
हेपेटायटिस ए ची लक्षण
हेपेटायटिस ए ची लक्षण सामान्यपणे व्हायरसची लागण झाल्यानंतर काही आठवड्यांनी दिसू लागतात. पण हेपेटायटिस ए असलेल्या सगळ्या लोकांमध्ये लक्षण विकसित होत नाहीत. चला जाणून घेऊ याची मुख्य लक्षण.
1) असामान्य थकवा आणि कमजोरी
2) अचानक मळमळ, उलटी आणि लूज मोशन
3) पोटदुखी, अस्वस्थता, खासकरून छातीच्या खालच्या भागात वेदना
4) माती किंवा भुरक्या रंगाची विष्ठा
5) भूक कमी लागणे
6) हलका ताप येणे
7) डार्क रंगाची लघवी
8) जॉईंट्समध्ये वेदना
9) त्वचा पिवळी पडणे आणि डोळे पांढरे होणे
10) त्वचेवर खाज येणे
हेपेटायटिस ए ची लक्षण अपेक्षेपेक्षा हलकी असू शकतात आणि काही आठवड्यांमध्ये निघून जातात. पण कधी कधी यामुळे गंभीर आजार होतो. जो अनेक महिने चालतो. त्यामुळे ही लक्षण दिसली तर लगेच डॉक्टरांना भेटा.
हेपेटायटिस ए ची ओळख पटवण्यासाठी ब्लड टेस्ट केली जाते. त्याशिवाय लिव्हर फंक्शन टेस्ट आणि अल्ट्रासाउंडच्या माध्यमातूनही टेस्ट केली जाते. त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्या.