Liver Health : सिगारेट-दारूसोबतच 'या' गोष्टींमुळेही लिव्हर होतं डॅमेज, वेळीच व्हा सावध!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2022 10:02 AM2022-03-05T10:02:46+5:302022-03-05T10:03:06+5:30
Liver Health : लिव्हर डायजेशन, मेटाबॉलिज्म योग्य करणे आणि पोषक तत्व साठवून ठेवणे हेही महत्वाची कामं करतं. त्यामुळे लिव्हर हेल्दी ठेवणं फार महत्वाचं आहे. तसं झालं नाही तर आरोग्यावर वाईट परिणाम होतो.
Liver Health : लिव्हर शरीरातील सर्वात महत्वपूर्ण अवयवांपैकी आहे. मेंदूनंतर लिव्हर शरीरातील सर्वात मोठा आणि किचकट अवयव आहे. लिव्हरचं मुख्य काम शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढणं हे आहे. त्यासोबतच लिव्हर डायजेशन, मेटाबॉलिज्म योग्य करणे आणि पोषक तत्व साठवून ठेवणे हेही महत्वाची कामं करतं. त्यामुळे लिव्हर हेल्दी ठेवणं फार महत्वाचं आहे. तसं झालं नाही तर आरोग्यावर वाईट परिणाम होतो.
काही चुकीच्या सवयींमुळे लिव्हरवर वाईट प्रभाव पडतो. ज्यामुळे लिव्हर कमजोर होतं. हेही आहे की, लिव्हर स्वत:ला ठीक करू शकतं. पण काही चुकीच्या सवयींमुळे लिव्हरची स्वत:ला रिपेअर करण्याची क्षमता कमी होते. त्यामुळे लिव्हरचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी काही सवयी बदलल्या पाहिजे.
१) साखर - फार जास्त सारख फक्त तुमच्या दातांसाठीच नाही तर तुमच्या लिव्हरसाठीही फाय नुकसानकारक आहे. फॅट बनवण्यासाठी लिव्हर फ्रक्टोज नावाच्या शुगरचा वापर करतं. जर फार जास्त प्रमाणात प्रोसेस्ड म्हणजे पांढऱ्या सारखेचं आणि हाय फॅक्टोज कॉर्न सिरपचं सेवन कराल, तर लिव्हरमध्ये समस्या निर्माण होऊ शकते.
Webmd नुसार, रिसर्चमधून सांगण्यात आलं आहे की, शुगर लिव्हरसाठी दारूसारखी नुकसानकारक होऊ शकते. भलेही तुमचं वजन जास्त नसेल तरी. यासाठी पेस्ट्री, केक, शुगर असलेले ड्रिंक्स आणि गोड पदार्थांचं सेवन कमी करा. काही लोक चहामध्येही खूप साखर टाकतात, त्याचं प्रमाण कमी करा.
२) हर्बल सप्लीमेंट - मार्केटमध्ये मिळणारे हर्बल सप्लीमेंट ज्यांवर लिहिलं असतं नैसर्गिक सप्लीमेंट. ते लिव्हर फार नुकसान पोहोचवू शकतात. Webmd नुसार, काही रिसर्चनुसार, हर्बल सप्लीमेंट लिव्हरला योग्यप्रकारे काम करण्यापासून रोखतात. यांचं सेवन केल्याने हेपेटायटिस आणि लिव्हर फेलसारख्या समस्या होऊ शकतात. याच कारणाने काही देशांनी जडी-बुटींवर बंदी घातली आहे. कोणतेही हर्बल सप्लीमेंट किंवा जडीबूटी घेण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
३) जास्त खाणं- लठ्ठपणा - शरीराचं जास्त वाढलेलं वजन किंवा जमा झालेली अतिरिक्त चरबी लिव्हरच्या कोशिकांमध्ये जमा होऊ शकते आणि नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिजीजचं कारण बनू शकते. ज्यामुळे लिव्हरवर सूज येऊ शकते. काळानुसार, लिव्हरवर आलेली सूज लिव्हरच्या टिश्यूजला कठोर बनवते. ज्याला डॉक्टरी भाषेत सिरोसिस म्हणतात. जर तुमचं वजन जास्त असेल तर सिरोसिसचा धोका असतो. त्यामुळे डाएट आणि एक्सरसाइजने वजन कमी करण्याचा प्रयत्न करा.
४) सॉफ्ट ड्रिंक - रिसर्चमधून समोर आलं आहे की, जे लोक फार जास्त सॉफ्ट ड्रिंक पितात, त्यांना नॉन अल्कोहोल फॅटी लिव्हर समस्या होण्याची शक्यता जास्त असते. पण रिसर्चमध्ये याचे पुरावे मिळाले नाही की, सॉफ्ट ड्रिंकने लिव्हर कमजोर होतं. पण जर कमी प्रमाणात सॉफ्ट ड्रिंकचं सेवन केलं तर लिव्हर सुरक्षित राहू शकतं.
५) ट्रान्स फॅट - ट्रान्स फॅट डबाबंद खाद्य पदार्थ आणि बेक केलेल्या पदार्थांमध्ये आढळतं. हे मानव निर्मित फॅट असतं. जे निश्चित तापमानावर जाऊन गोठतं. ट्रान्स फॅट असणारे फूड खाल्ले तर वजन वाढतं. ज्याने लिव्हरवर सूज येऊ शकते.