लिव्हरची समस्या दूर करण्यासाठी खास ठरतात 'हे' ज्यूस, कोलेस्ट्रॉलही होईल कमी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2024 02:12 PM2024-02-13T14:12:03+5:302024-02-13T14:13:09+5:30
Liver Health : लिव्हरसंबंधी समस्येबाबत सांगायचं तर फॅटी लिव्हर फारच कॉमन समस्या आहे. यावर उपाय करायचा असेल तर तुम्ही काही भाज्यांचे ज्यूस पिऊ शकता.
Vegetables Juice For Fatty Liver: लिव्हर आपल्या शरीरातील एक महत्वाचा अवयव आहे. कोणत्याही कारणाने जर याचं आरोग्य बिघडलं तर थेट आपल्या पचन तंत्रावर प्रभाव पडतो. मळमळ होणं, उलटी, डोळे पिवळे होणे, लघवीचा रंग पिवळा होणे अशी लक्षणं याकडे गोष्टीकडे इशारा करतात की, लिव्हरमध्ये काहीना काही समस्या आहे. एका शोधानुसार, भारतात दर 5 पैकी एक व्यक्ती लिव्हरच्या समस्येने ग्रस्त आहे. लिव्हरसंबंधी समस्येबाबत सांगायचं तर फॅटी लिव्हर फारच कॉमन समस्या आहे. यावर उपाय करायचा असेल तर तुम्ही काही भाज्यांचे ज्यूस पिऊ शकता.
ब्रोकली
लिव्हरसंबंधी समस्येपासून बचाव करण्यासाठी ब्रोकलीचा ज्यूस फार फायदेशीर मानला जातो. द जर्नल ऑफ न्यूट्रिशननुसार रोज ब्रोकलीचा ज्यूस प्यायल्याने लिव्हर डॅमेजही रोखलं जाऊ शकतं सोबतच फॅटी लिव्हरची समस्याही दूर करण्यास मदत मिळते.
गाजर
गाजरामध्ये व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात असतं. हेच कारण आहे की, याला लिव्हरसाठी हेल्दी मानलं जातं. फॅटी लिव्हरची समस्या दूर करण्यासाठी याने खूप मदत मिळते. तसेच गाजराने आपल्या शरीरातील विषारी तत्व बाहेर पडतात आणि लिव्हर डॅमेजचा धोका कमी होतो.
बीट
एका रिसर्चनुसार, बिटाचा ज्यूस लिव्हर डिटॉक्स करण्यासाठी फायदेशीर असतो. यातील व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स रक्त शुद्ध करण्यास मदत करतात. अशात याच्या नियमित सेवनाने फॅटी लिव्हरची समस्या कमी होते.
हिरव्या भाज्याने किडनी डिटॉक्स
लौकी म्हणजे भोपळ्याचा ज्यूस प्यायल्याने किडनी डिटॉक्स होण्यास मदत मिळते. या अॅंटी-ऑक्सिडेंट तत्व आढळतात. जे लिव्हरवरील सूज कमी करण्यास मदत करतात. लौकीशिवाय पालकसहीत इतरही हिरव्या पालेभाज्यांच्या ज्यूसने लिव्हर चांगलं राहू शकतं.