दारूच नाहीतर या गोष्टींमुळेही सडतं लिव्हर, मेडिकल एक्सपर्टने दिला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2023 11:07 AM2023-08-24T11:07:47+5:302023-08-24T11:08:46+5:30
Health Tips : द गट हेल्थ क्लीनिकच्या क्लीनिकल डायरेक्टर जो कनिंघम यांनी एका मुलाखतीत सांगितलं की, मद्यसेवनाशिवाय आणखी कोणत्या कारणाने व्यक्तीचं लिव्हर खराब होत आहे.
Health Tips : लिव्हर आपल्या शरीतातील महत्वाचा अवयव आहे. आजकाल सगळ्याच वयाच्या लोकांना लिव्हरची समस्या होते. लिव्हरचा आजार लिव्हर आणि आजूबाजूच्या अवयवांना प्रभावित करू शकतो. लिव्हर डॅमेजचं एक मुख्य कारण मद्यसेवन मानलं जातं. पण त्याशिवायही अशी अनेक कारणे आहेत ज्यामुळे लिव्हर खराब होतं. द गट हेल्थ क्लीनिकच्या क्लीनिकल डायरेक्टर जो कनिंघम यांनी एका मुलाखतीत सांगितलं की, मद्यसेवनाशिवाय आणखी कोणत्या कारणाने व्यक्तीचं लिव्हर खराब होत आहे.
लिव्हर खराब होण्याची कारणं
नॅशनल हेल्थ सर्विसनुसार, अनेक लोक मार्केटमधून व्हिटॅमिन्स सप्लीमेंट घेतात ज्यामुळे लिव्हर डॅमेज होतं. जास्तीत जास्त लोकांना सप्लीमेंट्सची गरज नसते. हे लोक बॅलन्स डाएटने व्हिटॅमिन्सची कमरता पूर्ण करू शकतात. जो कनिंघम यांच्यानुसार, हर्बल चहा आणि सप्लीमेंट लिव्हर फेल होण्याचं कारण बनू शकतात. सगळ्यात घातक बॉडी बिल्डींग बनवणारे आणि वजन कमी करणारे सप्लीमेंट्स आहेत. ज्यामुळे पीलिया म्हणजे काविळ होऊ शकतो.
रिसर्चनुसार, गेल्या काही वर्षात मेडिसिन किंवा केमिकलने लिव्हर डॅमेज होण्याच्या अनेक केसेस समोर आल्या आहेत. ज्याला हेपेटोटॉक्सिसिटी म्हटलं जातं. जर कुणी जास्त सप्लीमेंट घेतले तर समस्या अधिक वाढू शकते.
जो कनिंघन यांनी सांगितलं की, जर एखाद्या सप्लीमेंटवर नॅच्युरल लिहिलं असेल तर ते सुरक्षित आहेत. हे लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे की, जास्त डोजमुळे लिव्हरला धोका होऊ शकतो.
जास्त सप्लीमेंट्सची खुराक घेतल्याने लिव्हर डॅमेज होण्यासोबतच वजनही वाढतं, डोकेदुखी, मळमळ आणि बद्धकोष्ठतेच समस्याही होते. सगळे हाच विचार करून गोळी घेतात की, केवळ व्हिटॅमिनची गोळी आहे. पण याचा विचार कुणी करत नाही की, याने समस्या होऊ शकते.
लोकांनी सप्लीमेंट्सची खुराक घेताना विशेष काळजी घेतली पाहिजे. जर तुम्ही सूक्ष्म पोषक तत्व घेत असाल तर रोज प्रमाणात घ्या. मिनरल्स आणि फॅटमध्ये मिक्स होणाऱ्या व्हिटॅमिन्स अधिक प्रमाणात घेतल्याने शरीरात टॉक्सिन्स वाढू शकतात.