Lockdown मध्ये पुरूषांपेक्षा जास्त लठ्ठ होत आहेत महिला, 'हे' सााइड इफेक्ट येत आहेत समोर...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2020 11:34 AM2020-06-27T11:34:33+5:302020-06-27T11:37:48+5:30

आपण रोज कोरोना व्हायरसच्या वाढत्या रूग्णांबाबत वाचत-ऐकत असतो. पण कोरोना व्हायरसमुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनचे दुसरे साइड इफेक्टही समोर येऊ लागले आहेत.

Lockdown : Almost 50 per cent women reported having gained weight compared to men | Lockdown मध्ये पुरूषांपेक्षा जास्त लठ्ठ होत आहेत महिला, 'हे' सााइड इफेक्ट येत आहेत समोर...

Lockdown मध्ये पुरूषांपेक्षा जास्त लठ्ठ होत आहेत महिला, 'हे' सााइड इफेक्ट येत आहेत समोर...

Next

जगभरात अजूनही कोरोना व्हायरस वेगाने पसरत आहे. जगभरात लाखो लोक याने संक्रमित झालेत आणि अनेकांचा जीव या व्हायरसने घेतला. या व्हायरसचं संक्रमण रोखण्यासाठी जगभरातील वैज्ञानिक वॅक्सीन शोधण्यात बिझी आहेत. पण अजूनही त्यांना पूर्णपणे यश मिळालेलं नाही. अशात आता जगाने महामारीच्या चिंताजनक स्थितीत प्रवेश केलाय.

आपण रोज कोरोना व्हायरसच्या वाढत्या रूग्णांबाबत वाचत-ऐकत असतो. पण कोरोना व्हायरसमुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनचे दुसरे साइड इफेक्टही समोर येऊ लागले आहेत. जगभरातील जास्तीत जास्त देशांनी कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊन लागू केला होता. याने लोकांच्या लाइफस्टाईल आणि दैनंदिन जीवनावर झालेले दुष्परिणाम समोर आले. लॉकडाऊनमुळे लोकांचा लठ्ठपणा वेगाने वाढत आहे.

लॉकडाऊनमुळे वाढतंय वजन

WebMD द्वारा करण्यात आलेल्या एका पोलनुसार, लॉकडाऊनमध्ये लावण्यात आलेल्या प्रतिबंधामुळे अमेरिकेत मोठ्या प्रमाणात लठ्ठपणा वाढत आहे. लोक आपल्या घरात बंद झाले आहेत, ज्यामुळे त्यांचं रोजचं हेल्दी रूटीन प्रभावित झालं आहे. त्यामुळे अनेक लोकांचं वजन वेगाने वाढत आहे. रिसर्चमधून समोर आलं आहे की, 22 टक्के पुरूष तर 47 टक्के महिलांचं वजन वाढलं आहे.

जेव्हा लोकांना प्रश्न विचारण्यात आला तेव्हा 60 टक्के लोकांनी वाढता तणाव आणि खराब लाइफस्टाईलला वजन वाढण्यासाठी जबाबदार ठरवलं आहे. तर 21 टक्के लोकांनी सांगितले की, लॉकडाऊन दरम्यान अधिक दारू प्यायल्याने त्यांचं वजन वाढत आहे.

लॉकडाऊनचा तणाव

लॉकडाऊन दरम्यान जास्तीत जास्त लोक वर्क फ्रॉम होम करत आहेत. अशात अनेक लोक तणाव दूर करण्यासाठी आणि मूड रिफ्रेश करण्यासाठी जास्तीत जास्त पॅकट बंद फूड खातात. त्यासोबतच महामारीमुळे लोक घरात बंद झाले आहेत. त्यामुळे ते ना ते एक्सरसाइज करू शकत आहेत ना हेल्दी फूड खाऊ शकत आहेत. हेही कारण आहे की, लॉकडाऊन दरम्यान लोकांचं वजन वाढत आहे. 

काय सांगतो रिसर्च?

रिसर्चनुसार, लॉकडाऊन दरम्यान 75 टक्के लोकांचं वजन 0.4 ते 4 किलोपर्यंत वाढलं. तर 21 टक्के लोकांचं असं मत आहे की, त्यांचं वजन 5 ते 8 किलो वाढलं आहे. त्यासोबतच 4 टक्के लोक म्हणाले की, क्वारंटाइन पिरिअड दरम्यान त्यांचं वजन जवळपास 10 किलो वाढलं.

मुळात हा रिसर्च केवळ अमेरिकेत केला गेला असला तरी हा जगभरातील देशांना लागू पडतो. कारण अमेरिकेप्रमाणे सगळीकडे लॉकडाऊन आहे. सगळीकडे लोकांना घरात रहावं लागत आहे आणि त्यांची लाइफस्टाईल पूर्णपणे बदलली आहे.

Coronavirus : चिंताजनक! 'या' लोकांना रिकव्हरीनंतरही पुन्हा होऊ शकते कोरोनाची लागण, वाचा कारण...

कफ पातळ करून शरीर निरोगी ठेवण्यासाठी फायदेशीर अडुळसा; संक्रमणापासून राहता येईल दूर

Web Title: Lockdown : Almost 50 per cent women reported having gained weight compared to men

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.