बेली फॅट्स असो वा वाढलेलं वजन; 'ही' 2 मिनिटांची एक्सरसाइज करेल मदत
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2019 03:47 PM2019-09-28T15:47:17+5:302019-09-28T15:47:46+5:30
दिर्घायुषी राहण्यासाठी आणि सुंदर दिसण्यासाठी वजन कंट्रोलमध्ये ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. वाढलेलं वजन फक्त तुमच्या लूकवरच परिणाम करत नाही. तर वाढलेल्या वजनामुळे ब्लड शुगर, हाय ब्लड प्रेशर आमि हृदयाशी निगडीत आजारांचा सामना करावा लागतो.
दिर्घायुषी राहण्यासाठी आणि सुंदर दिसण्यासाठी वजन कंट्रोलमध्ये ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. वाढलेलं वजन फक्त तुमच्या लूकवरच परिणाम करत नाही. तर वाढलेल्या वजनामुळे ब्लड शुगर, हाय ब्लड प्रेशर आमि हृदयाशी निगडीत आजारांचा सामना करावा लागतो. खासकरून जेव्हा हे फॅट्स तुमच्या पोटाच्या आजूबाजूला असतात. जर तुम्ही आपल्या बेली फॅट्स किंवा वाढलेल्या वजनाने त्रस्त असाल तर आज आम्ही तुम्हाला एका अशा एक्सरसाइजबाबत सांगणार आहोत. जिच्या मदतीने तुम्ही काही दिवसांमध्येच आपल्या वाढलेल्या वजनापासून सुटका होणं शक्य होईल.
लॉन्ग ब्रिथ डाएट एक्सरसाइज (Long Breath Diet Exercise)
ही एक्सरसाइज करण्यासाठी एका शांत ठिकाणी उभे राहा. त्यानंतर जवळपास 3 सेकंदांसाठी श्वास आतमध्ये रोखून ठेवा आणि श्वास सोडताना स्वतःला 7 सेकंदांसाठी कंट्रोल करा. असं केल्याने सर्वाधिक फायदा तुमच्या वाढलेल्या पोटाला होइल. वजन कमी करण्याच्या या पद्धतीला यूरोपियन डॉक्टरांनीही दुजोरा दिला आहे. असं मानलं जातं की, ऑक्सिजन, कार्बन आणि हायड्रोजनमुळे शरीरामध्ये फॅट्स जमा होतात. जेव्हा तुम्ही Long Breath Diet Exercise ची प्रॅक्टिस करता तेव्हा, ऑक्सिजन फॅट्सपर्यंत जाऊन त्यांचं रूपांतर पाणी आणि कार्बनमध्ये करतात. त्यामुळे तुम्हाला फिट अन् फाइन होण्यास मदत मिळते.
जपानमधून सुरू झाली ही पद्धत
जपानमधील प्रसिद्ध अभिनेते माइक रोसुके यांनी या एक्सरसाइजचा शोध लावला. या एक्सरसाइजच्या मदतीने माइकने काही आठवड्यांमध्ये आपलं वजन 13 किलोंपर्यंत कमी केलं. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, माइक यांनी या एक्सरसाइजच्या मदतीने फक्त वजनच कमी केलं नाहीतर अनेक वर्षांपासून सुरू असलेलं पाठीचं दुखणं कमी केलं.
एक्सरसाइज करण्याची पद्धत :
सर्वात आधी सरळ उभे राहा. एक पाय पुढे आणि दुसरा मागे ठेवा. वेस्टपासून संपूर्ण लोअर बॉडी पूर्णपणे स्ट्रेच करा. आता हळूहळू आपले हात सरळ करा. त्यानंतर हळूहळू 3 सेकंदांसाठी श्वास घ्या. पुन्हा 7 सेकंदांसाठी लगेच श्वास सोडा. आपल्या शरीराच्या सर्व मांसपेशींना तणाव द्या. ही एक्सरसाइज जेवढं शक्य असेल तेवढ्या वेळा पुन्हा करा. पोटाची चरबी लगेच कमी करण्यासाठी मदत करण्याव्यतिरिक्त शरीराच्या मांसपेशी मजबुत करण्यासाठी सर्वात उत्तम उपाय आहे.
अन्य फायदे...
- हृदयाचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी
- फुफ्फुसांचं आरोग्य ठरतं फायदेशीर
- अस्थमाच्या रूग्णांसाठी उत्तम
- त्वचेच्या समस्यांवर घरगुती उपाय
- ब्लड प्रेशर ठेवा कंट्रोलमध्ये
(टिप : वरील सर्व समस्या आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.)