लाँग कोव्हिडचा त्रास महिलांना सर्वाधिक! नुकत्याच झालेल्या अभ्यासात संशोधकांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2021 05:48 PM2021-11-22T17:48:05+5:302021-11-22T17:48:15+5:30

'लॉन्ग कोविड' म्हणून ओळखली जाणारी ही स्थिती महिलांना अधिक प्रभावित करते असा दावा, मिशिगन यूनिवर्सिटीच्या संशोधकांनी जगभरातील १७ देशांमध्ये झालेल्या ४० अभ्यासांचे विश्लेषण केल्यानंतर केला आहे.

long covid likely to affect more woman says study | लाँग कोव्हिडचा त्रास महिलांना सर्वाधिक! नुकत्याच झालेल्या अभ्यासात संशोधकांचा दावा

लाँग कोव्हिडचा त्रास महिलांना सर्वाधिक! नुकत्याच झालेल्या अभ्यासात संशोधकांचा दावा

Next

कोरोना संक्रमणमुळे रुग्णालयात दाखल रुग्णांमध्ये लक्षण अधिक काळ राहण्याचा धोका ५७ टक्क्यांहून अधिक असतो. चिकित्सकीय भाषेत 'लॉन्ग कोविड' म्हणून ओळखली जाणारी ही स्थिती महिलांना अधिक प्रभावित करते असा दावा, मिशिगन यूनिवर्सिटीच्या संशोधकांनी जगभरातील १७ देशांमध्ये झालेल्या ४० अभ्यासांचे विश्लेषण केल्यानंतर केला आहे.

डब्ल्यूएचओनुसार जागतिक पातळीवर २३.७ कोटीहून अधिक लोक सार्स-कोव-2 व्हायरसला बळी पडतील असा अंदाज आहे. यापैकी १० कोटीहून अधिक लोकांमध्ये कोव्हिडमुळे समस्या अधिक काळ राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.  संशोधकांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार 'लॉन्ग कोविड'मुळे रुग्णाच्या आरोग्यावर याचा नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता अधिक आहे.

या अभ्यासात महिलांना 'लॉन्ग कोविड' होण्याची शक्यता जास्त असण्याचे नमुद करण्यात आले आहे. ४९य टक्के महिलांना कोव्हिड संबंधी समस्यां जास्त काळ त्रास देतील असा मुद्दाही या अहवालात नमुद करण्यात आला आहे. हे प्रमाण पुरुषांमध्ये ३७ टक्क्यांच्या जवळपास आहे. 'लॉन्ग कोविड' मध्ये सार्स-कोव-2 व्हायरसच्या लागण झाल्यामुळे रुग्णात चार आठवडे किंवा याहून अधिक काळापर्यंत संक्रमणाची जुनी किंवा नवीन लक्षणे दिसतात.

ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटीकडून सप्टेंबरमध्ये प्रकाशित एका अभ्यासात प्रत्येक तीनपैकी एक कोव्हिड रुग्णांना कोव्हिड बरा झाल्यानंतरही तीन ते सहा महिन्यांपर्यंत किमान एक तरी लक्षण असल्याचे जाणवते. थकवा, अशक्तपणा, श्वास घेण्यास अडचण, स्नायूंमध्ये वेदना, मळमळ, पचनाच्या समस्या ही लक्षणे दिसून येतात. हा अभ्यास 'जर्नल पीएलओएस मेडिकल' मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

Web Title: long covid likely to affect more woman says study

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.