Long Life Secret : 'या' ६ पद्धतीने तुम्ही वाढवू शकता तुमचं ७ वर्ष अधिक आयुष्य, एक्सपर्ट्सने सांगितलं सीक्रेट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2022 01:09 PM2022-03-21T13:09:32+5:302022-03-21T13:12:25+5:30

Live longer secret :आपलं पुस्तक 'द रॅबिट इफेक्ट' मध्ये डॉ. हार्डिंग यांनी दावा केला की, मनुष्याच्या दयाळू स्वभावाने त्याच्या इम्यून सिस्टीम आणि ब्लड प्रेशरवर चांगला प्रभाव पडतो.

Long Life Secret : Ways to add seven years more in your life | Long Life Secret : 'या' ६ पद्धतीने तुम्ही वाढवू शकता तुमचं ७ वर्ष अधिक आयुष्य, एक्सपर्ट्सने सांगितलं सीक्रेट

Long Life Secret : 'या' ६ पद्धतीने तुम्ही वाढवू शकता तुमचं ७ वर्ष अधिक आयुष्य, एक्सपर्ट्सने सांगितलं सीक्रेट

Next

(Image Credit : lifeberrys.com)

Live longer secret : चांगली झोप, चांगला आहार आणि नियमित एक्सरसाइज करून आयुष्य वाढतं असं सांगितलं जातं. पण अनेकांना हे माहीत नाही की, एकमेकांप्रति व्यक्तीचा चांगला व्यवहारही लोकांचं आयुष्य वाढवू शकतो. कोलंबिया यूनिव्हर्सिटीमधील सर्टिफाइड मनोचिकित्सक डॉ. कॅली हार्डिंग म्हणाले की, चांगलं व्यक्तीत्व आणि दुसऱ्यांप्रति दयाळू ठेवल्याने शरीरात हॅपी हार्मोन्स प्रभावित होतात ज्याने मनुष्याचं आयुष्य ७ वर्षाने अधिक वाढू शकतं.

आपलं पुस्तक 'द रॅबिट इफेक्ट' मध्ये डॉ. हार्डिंग यांनी दावा केला की, मनुष्याच्या दयाळू स्वभावाने त्याच्या इम्यून सिस्टीम आणि ब्लड प्रेशरवर चांगला प्रभाव पडतो. अशात लोक एका चांगल्या आणि जास्त आयुष्याचा आनंद घेऊ शकतात. जेम्स एलिस न्यूट्रिशनच्या हेल्थ कोच जेम्स एलिस यांचंही असंच मत आहे. हेल्थ एक्सपर्टचं मत आहे की, चांगला व्यवहार केल्याने आपलं ब्लड प्रेशर आणि स्ट्रेस लेव्हल घटतं ज्याने वय वाढतं. रिपोर्टमध्ये मनुष्याचं वय वाढण्याचे आणखीही काही सीक्रेट सांगण्यात आले आहेत.

चांगले मित्र बनवा - चांगले मित्र आपल्या आरोग्यासाठी चांगले असतात. अनेक रिसर्चमधून समोर आलं आहे की, मजबूत नाती आणि सोशल सपोर्टसोबत एखाद्या व्यक्तीची जिवंत राहण्याची शक्यता कमी कनेक्शन असलेल्या लोकांच्या तुलनेत २२ टक्के जास्त असते. मित्र केवळ आनंदातच नाहीतर वाईट काळातही मदतीसाठी पुढे येतात. घटस्फोट किंवा गंभीर आजारा दरम्यान तणाव कमी करण्याचा ते प्रयत्न करतात.

चांगला व्यवहार - अमेरिकेत वैज्ञानिकांना आढळलं की, दुसऱ्यांची मदत करणे आणि त्यांना वेळ दिल्याने आपल्या आरोग्यावर चांगला परिणाम होतो. २०१३ मध्ये ८४६ लोकांवर पाच वर्ष एक रिसर्च करण्यात आला. त्यातून याचे निष्कर्ष समोर आले.

भरपूर हसा - हसल्याने केवळ आपला मेंदूच बूस्ट होत नाही तर कोर्टिसोल आणि एंड्रोफिन्स सारखे हार्मोन्स रिलीज झाल्याने इम्यून सिस्टीम आणि ब्लड प्रेशरही कंट्रोलमध्ये राहतं. २०१० मध्ये मिशिगन यूनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी केलेल्या रिसर्चनुसार, भरपूर हसणारे लोक सरासरी ७९.९ वर्ष जगतात. तर त्यांच्यापेक्षा थोडं कमी हसणारे लोक सरासरी ७५ वर्षे जगतात. तसेच अजिबातच न हसणारे लोक सर्वात कमी ७२.९ वर्ष जगतात.

याही गोष्टी ठेवा लक्षात - दुसऱ्यांच्या मदतीसाठी नेहमी पुढे रहा, चांगलं ऐकल्यानेही मनुष्याच्या वयावर आणि आरोग्यावर प्रभाव पडतो. बॉस्टन स्कूल ऑफ मेडिसिन द्वारे २०१९ मध्ये करण्यात आलेल्या रिसर्चनुसार, एक पॉझिटिव्ह मेंटल अॅटिट्यूड आपलं जीवन सरासरी ११ ते १५ टक्के वाढवू शकतो.

Web Title: Long Life Secret : Ways to add seven years more in your life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.