शेजारच्याच्या कम्प्युटरमध्ये डोकावता?- तुम्हाला माफी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2017 02:24 PM2017-05-27T14:24:27+5:302017-05-27T14:24:27+5:30

आॅफिसात सतत दुसऱ्याच्या स्क्रिनवर नजर ठेवणाऱ्या भोचकांचं करायचं काय?

Look at the neighboring computer? - You are not sorry | शेजारच्याच्या कम्प्युटरमध्ये डोकावता?- तुम्हाला माफी नाही

शेजारच्याच्या कम्प्युटरमध्ये डोकावता?- तुम्हाला माफी नाही

Next

- नितांत महाजन

आॅफिस एटिकेट्स नावाचा एक प्रकार असतो, आणि तो अनेकांना माहितीच नसतो. त्यामुळे त्यांचा वेंधळेपणा, भोचकपणा हा बाकीच्या कलिग्जना आगाउपणा आणि उद्धटपणा वाटतो. आपल्या कामातला अडथळा तर वाटतोच, याशिवाय ते आपल्या प्रायव्हसीचा भंग करताहेत, आपल्या कामात नाक खुपसताहेत असं वाटतं. खरंतर हे मान्य करायला हवं की आपले कलिग्न हे आॅफिसात तरी आपले कलिग्ज, सहकारीच असतात. मित्र नसतात. मित्र असलेच तर आॅफिसच्या बाहेर. त्यामुळे आपलं काम सोडून त्यांच्या कम्प्युटरमध्ये घुसून वाचू नये. ते आपल्या स्क्रिनवर काही लिहित असतील तर आपलं कामधाम सोडून तेच वाचत बसू नये. तसं तुम्ही करत असाल तर तुमच्याविषयी नाराजी वाढतेच. तुमचा त्रास होतोच इतरांना मात्र तुमच्यासंदर्भातही काही ठोकताळे नव्या जगात लावता येवू शकतात. आणि तसंच खरंच तुमचं व्यक्तिमत्व असेल तर नव्या काळात टीममध्ये काम करणं आणि यशस्वी होणं तुम्हाला अवघड जावू शकतं.
तपासून पहा तुम्ही हे करता का?

सतत लक्ष दुसऱ्याच्या स्क्रिनकडे? तुमचं कामात लक्ष नाही..
असं काही आहे का की आपलं आपल्याच कामात लक्ष नाही. आपल्या कामात मन रमत नाही. ते काम आपल्याला धड येत नाही म्हणून मग दुसरा त्याच्या स्क्रिनवर काय लिहितो हे आपण चोरचोरुन वाचत असतो?

 



आत्मविश्वास कमी
तुमचा आत्मविश्वास कमी आहे का? आपलं काम मस्तच होतं आहे, आपलं काम वरचढ ठरणार आहे यावर तुमचाच विश्वास नसतो का? तो नसेल तरी तुम्ही याचं त्याचं काम पाहत बसता?

इनसिक्युअर्ड आहात?

तुम्हाला स्वत:लाच असुरक्षित वाटत असेल, तुम्ही आतून इनसिक्युअर्ड आणि भेदरलेले असाल तरी कामाकडे, स्वत:कडे लक्ष न देता, इतरांकडे, त्यांच्या कामाकडे, पेहरावाकडे, पोषाखाकडे, आॅफिस गॉसिपकडे तुमचं जास्त लक्ष असतं. ती इनसिक्युरिटी आहे का तुमच्या मनात, तपासा.

भोचक आहात?
भोचकपणा आणि उत्सकुता यात एक पुसटशी रेष असते. ती क्रॉस केली की भोचकपणा सुरु होतो. जो इतरांना त्रासदायक वाटतो. आणि मग लोक तुम्हाला टाळायला लागतात.

सॉफ्टस्किल्सचा अभाव

आपल्याकडे आॅफिस स्किल्स, सॉफ्ट स्किल्स यांचा अभाव आहे. कार्यालयीन कामात दुसऱ्यांना अनावश्यक प्रश्न विचारू नयेत. त्यांच्या कम्प्युटरच्या स्क्रिनकडे पाहू नये, त्यांचा मोबाईल उचलू नये, फोन कुणाचा हे पाहू नये, मोबाइलवर कुणी बोलत असेल तर ते कान देवून ऐकू नये, दुसऱ्याच्या मेलबॉक्सवर नजर ठेवू नये हे साधे नियम. पण तेच माहिती नसल्यानं, सॉफ्टस्किल्सचा अभाव असल्यानं टीमला एक चुकीचा मेसेज जातो. आणि लोक अशा भोचक, घुसखोरीकरणाऱ्या सहकाऱ्यांना टाळायला लागतात.

Web Title: Look at the neighboring computer? - You are not sorry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.