रात्री उशिरापर्यंत जागे राहता? असं पडू शकतं महागात!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2018 02:45 PM2018-10-01T14:45:52+5:302018-10-01T14:46:36+5:30

अनेक लोकांचा असा समज असतो की, कमी खाल्याने आणि व्यायाम केल्याने वजन कमी होतं. किंवा काही लोकांना असं वाटतं की, दिवसभरामध्ये जितकी धावपळ करतो तेवढंच वजन कमी होतं.

loose weight while sleeping study reveal | रात्री उशिरापर्यंत जागे राहता? असं पडू शकतं महागात!

रात्री उशिरापर्यंत जागे राहता? असं पडू शकतं महागात!

Next

अनेक लोकांचा असा समज असतो की, कमी खाल्याने आणि व्यायाम केल्याने वजन कमी होतं. किंवा काही लोकांना असं वाटतं की, दिवसभरामध्ये जितकी धावपळ करतो तेवढंच वजन कमी होतं. पण हा समज चुकीचा आहे. 

यूनिवर्सिटी ऑफ पिट्सबर्गचे फिजिकल अॅक्टिव्हीटी अॅन्ड वेट मॅनेजमेंट रिसर्च सेंटरच्या अभ्यासकांनी सांगितल्यानुसार, ज्या व्यक्ती रात्री व्यवस्थित झोपत नाहीत, त्यांच्यामध्ये लठ्ठपणा येण्याची शक्यता इतर व्यक्तिंच्या तुलनेत अधिक असते. संशोधकांच्या म्हणण्यानुसार, व्यवस्थित झोप न घेतल्याने शरीरामध्ये काही हार्मोन बदल होतात आणि त्यामुळे वजन वाढते. 

संशोधक Jakicic यांच्या म्हणण्यानुसार, जर एखादी व्यक्ती रात्री उशीरापर्यंत जागत असेल तर त्या काहीना काही खात राहतात. ज्यामुळे वजन वाढण्याची शक्यता वाढते. 2013मध्ये करण्यात आलेल्या एका संशोधनात सिद्ध झाल्यानुसार, ज्या व्यक्तींना रात्री शांत झोप लागत नाही, त्यांनाच जास्त भूक लागते. कारण जागं राहण्यासाठी शरीराला एक्सट्रा एनर्जीची आवश्यकता असते. 

हेल्थ एक्सपर्ट्सनी सांगितल्यानुसार, लेप्टिन आणि ग्रेहलीन यांसारखे हार्मोन्स भूक लागण्यासाठी जबाबदार असतात. आपण ज्यावेळी झोपतो त्यावेळी आपल्या शरीरात हे हार्मोन्स तयार होत असतात. त्यामुळे झोप पूर्ण न झाल्यामुळे शरीराचं संपूर्ण चक्र बिघडतं. 

संशोधकांच्या मते, जेव्हा एखादी व्यक्ती झोपते त्यावेळी शरीरातील मांसपेशीं रिपेअर होत असतात. त्यामुळे तुम्ही पूर्ण झोप घेतली नाही तर तुमच्या मांसपेशी व्यवस्थित रिपेअर होत नाहीत. कमी झोपल्याने मेटाबॉलिज्म कमी होतं आणि शरीरातील कॅलरी बर्न होत नाहीत. परिणामी वजन वाढते. परंतु जर तुम्ही व्यवस्थित डाएट आणि झोप घेतली तर तुम्ही सहज वजन कमी करू शकता.

Web Title: loose weight while sleeping study reveal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.