Weight loss tips: आळशी आहात, पण वजन कमी करायचंय? मग झोपेतच करा 'ही' पाच कामं

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2022 04:48 PM2022-03-03T16:48:57+5:302022-03-03T16:50:03+5:30

काही लोक आळशी असतात जे या दोन्ही गोष्टींपासून दूर पळतात. ज्यांना वजन तर कमी करायचं असतं पण मेहनत करायची नसते. अशावेळी प्रश्न पडतो की जिम आणि डाएटशिवाय वजन कमी करण्याचे साधेसोपे साधन काय असू शकते?

loose weight while you sleep with this five tricks | Weight loss tips: आळशी आहात, पण वजन कमी करायचंय? मग झोपेतच करा 'ही' पाच कामं

Weight loss tips: आळशी आहात, पण वजन कमी करायचंय? मग झोपेतच करा 'ही' पाच कामं

googlenewsNext

वजन कमी करणे सोपे काम नाही. यासाठी मेहनत घ्यावी लागते. कोणाच्याही जीवनातील वजन कमी करण्याच्या प्रवासावर एक नजर टाका, प्रत्येकाने जिममध्ये खूप घाम गाळलेला असेल. दुसरे म्हणजे, वजन कमी करण्यात आहार महत्त्वाची भूमिका बजावतो. अर्थात, जिममध्ये तासनतास घाम गाळण्याबरोबरच महागडा डाएट प्लॅन फॉलो करणं प्रत्येकाला जमणारं काम नसतं. काही लोक आळशी असतात जे या दोन्ही गोष्टींपासून दूर पळतात. ज्यांना वजन तर कमी करायचं असतं पण मेहनत करायची नसते. अशावेळी प्रश्न पडतो की जिम आणि डाएटशिवाय वजन कमी करण्याचे साधेसोपे साधन काय असू शकते?

जर तुम्ही देखील या आळशी लोकांपैकी एक असाल आणि वजन कमी करू इच्छित असाल तर आम्ही तुम्हाला काही सोपे आणि प्रभावी मार्ग सांगणार आहोत ज्याची तुम्हाला फिट राहण्यास आणि कॅलरी बर्न करण्यात नक्कीच मदत होईल. सगळ्यात उत्तम म्हणजे यासाठी तुम्हाला जिममध्ये जाण्याची गरज नाही. तुम्ही झोपूनही हे करू शकता आणि ते उपाय झोपेतही कॅलरी जलद बर्न करू शकतात. 

पांघरूण न घेता झोपा
जेव्हा आपण थंड तापमानात झोपतो तेव्हा आपले मेटाबॉलिज्म वाढते आणि विश्रांती घेत असताना जास्त कॅलरी बर्न होतात. एका संशोधनानुसार, रात्रीच्या वेळी थंडी लागल्याने हेल्दी ब्राउट फॅटचे प्रमाण वाढते, ज्यामुळे शरीराला एकस्ट्रा ब्लड शुगरपासून मुक्ती मिळवण्यास आणि अधिक कॅलरी बर्न करण्यास मदत होते.

जास्त वेळ झोपा
एका अभ्यासात असे दिसून आले आहे की दररोज रात्री फक्त एक जास्तीचा तास झोप घेतल्याने तुम्हाला जास्त प्रयत्न न करता दररोज 270 कॅलरीज कमी खाण्यास मदत होते. हे एका वर्षात 9 पौंड वजन कमी करण्यासारखे आहे.

झोपण्याआधी प्रोटीन शेक घ्या
रिकाम्या पोटी झोपायला गेलात तर रात्रीचे निद्रानाशाला बळी पडू शकता आणि पुरेशी झोप न मिळाल्याने तुमचे वजन वाढू शकते. झोपण्यापूर्वी तुम्ही प्रोटीन शेक घेऊ शकता. कारण प्रोटीन कार्ब्स किंवा फॅटपेक्षा अधिक थर्मोजेनिक असतात, त्यामुळे तुमच्या शरीरात गेल्यावर ते पचताना जास्त वेळ लागतो आणि भरपूर कॅलरीज बर्न होतात.

स्लीप मास्क घाला
एका संशोधनानुसार, अंधारात झोपणाऱ्या लोकांमध्ये प्रकाशात झोपणाऱ्या लोकांपेक्षा लठ्ठ होण्याची शक्यता 21% कमी असते. जर तुम्हाला तुमच्या खोलीत अंधार करायचा नसेल तर स्लीप मास्क घालून झोपा.

रिकाम्या पोटी झोपू नका
कमी कॅलरी खाल्ल्याने वजन कमी व्हायला हवेच पण रात्रीचे जेवण न खाणे उलट काम करू शकते. जेव्हा तुम्ही तुमच्या कॅलरीजचे सेवन अचानक कमी करता तेव्हा तुमचे शरीर स्वतःच उपासमारीच्या अवस्थेत जाते आणि कॅलरी वाचवण्यासाठी तुमची चयापचय क्रिया कमी करते.

Web Title: loose weight while you sleep with this five tricks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.