फक्त 7 दिवसांमध्ये 3 किलो वजन करा कमी; फॉलो करा हा डाएट प्लॅन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2019 04:30 PM2019-04-02T16:30:48+5:302019-04-02T16:32:35+5:30

वाढलेलं वजन कमी करण्यासाठी प्रत्येकजण सतत प्रयत्नशील असतात. पण हे वाढलेलं वजन कमी करणं फारसं सोपं काम नसतं. त्यामुळे मुली एखाद्या खास फंक्शनसाठी डाएटिंग आण एक्सट्रा वर्कआउट करणं सुरू करतात.

Lose upto 3 kg weight in 7 days by following special diet plan | फक्त 7 दिवसांमध्ये 3 किलो वजन करा कमी; फॉलो करा हा डाएट प्लॅन

फक्त 7 दिवसांमध्ये 3 किलो वजन करा कमी; फॉलो करा हा डाएट प्लॅन

googlenewsNext

(Image Credit : coreevolutionpb.com)

वाढलेलं वजन कमी करण्यासाठी प्रत्येकजण सतत प्रयत्नशील असतात. पण हे वाढलेलं वजन कमी करणं फारसं सोपं काम नसतं. त्यामुळे मुली एखाद्या खास फंक्शनसाठी डाएटिंग आण एक्सट्रा वर्कआउट करणं सुरू करतात. जेणेकरून आपल्या ड्रेसमध्ये त्या सुंदर दिसतील. वभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, जर तुम्हालाही लवकर वजन कमी करायचं असेल तर सात दिवस हा डाएट प्लॅन फॉलो करा. त्यामुळे तुम्हाला 3 किलो वजन कमी करणं शक्य होईल. 

सात दिवसांपर्यंत एकाच प्रकारचा डाएट प्लॅन फॉलो केल्यामुळे कंटाळा येतो. त्यामुळे दोन प्रकारचे डाएट प्लॅन फॉलो करू शकता. 

डाएट प्लान 1 

  • सकाळी उठल्यानंतर एक ग्लास कोमट पाणी प्या. यामुळे पोट साफ होण्यासोबतच चरबी कमी करण्यासाठी मदत होइल. 
  • नाश्त्यामध्ये एक ग्लास दूध आणि दोन टेबलस्पून ओट्स किंवा कॉर्नफ्लॅक्स खा. 
  • दुपारच्या जेवणामध्ये दोन छोट्या वाट्या भाज्या असलेला दलिया खा. भाज्या आणि दलियामध्ये अस्तित्वात असणारं फायबर खाल्याने पोट बराच वेळ भरल्याप्रमाणे वाटते. 
  • चहा पिण्याची इच्छा झाली तर ग्रीन टी प्या.
  • रात्रीच्या जेवणामध्ये दूध आणि दलिया खा. 

 

डाएट प्लान 2 

  • दिवसाची सुरूवात एक ग्लास पाण्याने करा. त्यानंतर तुम्ही गरम ब्लॅक टी किंवा ग्रीन टी घेऊ शकता. 
  • नाश्त्यामध्ये मोठा बाउलमधये सूप पिउ शकता ज्यामध्ये भाज्या असतील. 
  • दुपारच्या जेवणामध्ये व्हिट ब्रेडच्या दोन स्लाइस खा. त्यासोबत एक कप सूप घेऊ शकता. 
  • संध्याकाळी ग्रीन टी पिउ शकता. चहा किंवा कॉफ शक्यतो अवॉइड करा. 
  • रात्रीच्या जेवणामध्ये भाज्यांपासून तयार करण्यात आलेलं सॅन्डविच खा. ब्रेड ओट्स किंवा व्हिट ब्रेड असेल तर उत्तम ठरतं. 
  • हा डाएट प्लॅन फॉलो करण्यासाठी दररोज जवळपास 30 मिनिटांसाठी व्यायाम करा. ब्रेकफास्ट अजिबात स्किप करू नका. तसेच कोणत्याही पदार्थामध्ये साखरेचा जास्त वापर करणं टाळा. 

 

टिप : एक गोष्ट लक्षात ठेवा की, सर्वांचं शरीर समान नसतं. वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं. 

Web Title: Lose upto 3 kg weight in 7 days by following special diet plan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.