वजन कमी करताना गैरसमज ठेवा दूर, या 3 टिप्स वापरून वजन करा कमी!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2019 10:37 AM2019-04-06T10:37:39+5:302019-04-06T10:48:10+5:30

सध्या जाडेपणा ही जगभरात मोठ्याप्रमाणात भेडसावणारी समस्या झाली आहे. वजन वाढवणं तर फार सोपं आहे, पण वजन कमी करणं तेवढं सोपं नाही.

Lose weight fast with these three things and avoid these weight loss myhts | वजन कमी करताना गैरसमज ठेवा दूर, या 3 टिप्स वापरून वजन करा कमी!

वजन कमी करताना गैरसमज ठेवा दूर, या 3 टिप्स वापरून वजन करा कमी!

Next

(Image Credit : Live Science)

सध्या जाडेपणा ही जगभरात मोठ्याप्रमाणात भेडसावणारी समस्या झाली आहे. वजन वाढवणं तर फार सोपं आहे, पण वजन कमी करणं तेवढं सोपं नाही. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी घरगुती उपायांपासून ते वेगवेगळ्या एक्सरसाइज केल्या जातात. आम्हीही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत ज्यांच्या मदतीने तुम्ही वजन कमी करू शकाल. सोबतच वजन नियंत्रणात ठेवू शकता आणि आरोग्यही चांगलं ठेवू शकता.

सकाळी उठून बॉडी करा हायड्रेट

रात्रभर शरीर डिहायड्रेट असतं. यादरम्यान शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होतं. जाडेपणा कमी करण्यासाठी पाण्याचं महत्त्वाचं योगदान असतं. पाण्यामुळे वेगवेगळे पोषक तत्त्व रक्तापर्यंत पोहोचतात. तसेच शरीराचे सर्वच ऑर्गन योग्यप्रकारे काम करण्यासही याने मदत होते. पाण्यात कॅलरी, फॅट, कार्बोहायड्रेट नसतात. तसेच याने शरीर मेटाबोलाइज करण्यास मदत मिळते. 

त्यासोबतच पाण्यामुळे किडनी आणि लिव्हर निरोगी राहतात. लिव्हरचं काम शरीरात जमा फॅटला मेटाबोलाइज करावं लागतं. जर तुम्ही कमी पाणी पित असाल तर किडनीच्या कामाचा भार लिव्हरवर वाढतो. अशा स्थितीत लिव्हर फॅटला मेटाबोलाइज करत नाही. म्हणजे ते एनर्जी म्हणून पाण्याचा वापर करू शकत नाही. त्यामुळे रोज सकाळी उठून कमीत कमी ४ ते ५ ग्लास पाणी पिण्याची सवय पाडावी. 

एक्सरसाइजआधी कॅफिनचं सेवन?

बाजारात फॅट लॉसचे जितकेही सप्लीमेंट्स विकले जातात, त्या सर्वांमध्येच कॅफिन असतं. जाडेपणा कमी करण्यात कॅफिनची महत्त्वपूर्ण भूमिका असते. याने आपलं सेंट्रल नर्वस सिस्टीम जास्त अलर्ट होतं. यादरम्यान आपलं शरीर सामान्य शरीराच्या तुलनेत एक्सरसाइज अधिक चांगल्याप्रकारे करू शकतं. याने पेशींमध्ये जमा फॅटला एनर्जी रूपात बर्न करण्याचा संकेत मिळतो. हे याचं मुख्य कार्य असतं. 

(Image Credit : The Independent)

एक्सरसाइजच्या १५ मिनिटेआधी १ कप कोमट ब्लॅक कॉफी सेवन करावी. कॅफिनने शरीराचा मेटाबॉलिज्म रेट वाढतो. सोबतच याने रेस्टिंग मेटाबॉलिक रेट वाढण्यासही मदत मिळते. आरएमआर एक अशी स्थिती आहे, ज्यात आराम करताना शरीर एनर्जीच्या रूपाने कॅलरी बर्न करतं. म्हणजे याचा अर्थ हा होतो की, आऱाम करत असतानाही आपलं शरीर कॅलरी बर्न करत असतं. 

हिरव्या भाज्या

जाडेपणा कमी करण्यासाठी हिरव्या भाज्या महत्त्वाच्या ठरतात. अशात वजन कमी करायचं असेल तर जास्तीत जास्त हिरव्या भाज्या खाव्यात. यात वेगवेगळे पोषक तत्त्व असतात. प्रोटीन, कार्बोहायड्रेट सोबतच व्हिटॅमिन्स, कॅल्शिअम, झिंकसारखे तत्त्व वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतात. हिरव्या भाज्यांमध्ये कमी प्रमाणात कॅलरी असतात. फॅट लॉसदरम्यान भाज्या खाल्ल्या तर जास्त भूक लागत नाही. 

एक्सरसाइज विसरू नका

(Image Credit : www.self.com)

तुमच्यासाठी हे जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे की, तुम्ही रोज किती कॅलरी घेत आहात आणि किती कॅलरी बर्न करत आहात. दोघांचं संतुलन ठेवणं गरजेचं आहे. जर तुम्ही जास्त कॅलरी घेत असाल आणि कमी बर्न करत असाल तर वजन वाढणारंच. फॅट लॉस करत असताना सामान्यपणे तुम्ही जितक्या कॅलरी घेताहेत त्यातील ५०० कॅलरी कमी करणे म्हणजेच बर्न करणे गरजेचं असतं. 

(टिप - या लेखात सुचवण्यात आलेल्या टिप्स आणि सल्ले केवळ तुमच्या माहितीसाठी आहेत. याकडे तुम्ही प्रोफेशनल सल्ला या रूपाने बघू शकत नाहीत. कोणत्याही प्रकारचं फिटनेस प्रोग्राम सुरू करण्यापूर्वी किंवा डाएटमध्ये कोणत्याही प्रकारचं बदल करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा.)

Web Title: Lose weight fast with these three things and avoid these weight loss myhts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.