भूक न लागणं असू शकत गंभीर आजारांचं लक्षणं, आजच 'या' घरगुती उपायांनी भूक वाढवा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2021 04:24 PM2021-08-03T16:24:16+5:302021-08-03T16:30:23+5:30
भूक नं लागणं ही साधी गोष्ट नक्कीच नाही. यासाठीच जाणून घ्या भूक वाढवण्यासाठी घरगुती उपाय...
भूक न लागणं ही एक गंभीर समस्या आहे.म्हणूनच जर काही दिवसांपासून तुम्हाला भूकच लागत नसेल अथवा काहीच खाण्याची इच्छा होत नसेल तर यामुळे तुमचे वजन कमी होऊ शकतं अथवा तुम्ही अशक्त होऊ शकता. कधी कधी पुरेसे पोषण न झाल्यामुळे चक्कर येणे, चिडचिड होणे आणि थकल्यासारखे वाटू लागते. भूक न लागण्यामागे अनेक कारणं असू शकतात. मात्र याचा संबध तुमच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थाशी नक्कीच निगडीत असू शकतो. खाण्याची इच्छा जाणं ही साधी गोष्ट नक्कीच नाही. यासाठीच जाणून घ्या भूक वाढवण्यासाठी घरगुती उपाय...
त्रिफळा चूर्ण
त्रिफळा चूर्ण हा अनेक घरगुती उपायांमध्ये पोटासाठी रामबाण उपाय आहे. बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर, उपयोगी ठरतो. वेळेवर भूक लागण्यासाठी त्रिफळा चूर्ण पावडर एक ग्लास कोमट दुधात घ्या. नियमित घेतल्यास भूक वाढायला लागते.
ग्रीन टी
भूक वाढवण्यासाठी ग्रीन टी हा चांगला घरगुती उपाय मानला जातो. नियमित घेतल्यास भूक वाढतेच शिवाय अनेक आजारात आराम मिळतो. सकाळी आणि संध्याकाळी चहा घेण्यऐवजी ग्रीन टी घेऊ शकता. शक्यतो लोक हिवाळ्यात जास्त ग्रीन टी पितात पण, रोज प्यायल्यानेही फायदा होतो.
लिंबू पाणी
भुक वाढण्यासाठी गरम पाण्यात लिंबू सरबत करून हे सरबत थोडया थोडया वेळाने प्याववे. यामुळे पचन सुधारते व भूक लागण्यास मदत होते.
ओवा
घरगुती उपाय म्हणून पोटाशी संबंधित अनेक समस्यांवर ओवा वापराल जातो. यामुळे अपचन किंवा भूक न लागण्याच्या समस्येत फायदा होतो. यामुळे पोट साफ राहतं. ओवा शक्यतो थोडा भाजून त्याला मीठ लावून खावा. भूक लागत नसेल तर, दिवसातून एक ते दोन वेळा नक्की खा.
ज्युस
भूक लागत नसेल किंवा जेवण जात नसेल तर, जेवणाऐवजी फळांचे रस प्यायला सुरूवात करा. पण, बाजारात मिळणारे प्रोसेस केलेले ज्युस वापरू नका. घरी फळांचा ताजा रस काढा सैंधव मीठ किंवा साधं मीठ आणि काळी मिरी पावरडर घाला. शक्यतो साखर घालू नका. यामुळे पोट साफ होईल आणि भूकही लागेल.