'केवळ १६ मिनिटांची कमी झोप तुमचा दिवस करु शकते खराब'
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2019 10:42 AM2019-04-25T10:42:12+5:302019-04-25T10:46:39+5:30
ऑफिसमध्ये एकतर तुमचा दिवस चांगला जाईल आणि तुम्ही क्लिअर डोक्याने सर्व काम करु शकाल किंवा दिवसभर तणाव आणि व्याकुळतेमुळे तुमचा दिवस खराब जाईल.
(Image Credit : RDLounge.com)
ऑफिसमध्ये एकतर तुमचा दिवस चांगला जाईल आणि तुम्ही क्लिअर डोक्याने सर्व काम करु शकाल किंवा दिवसभर तणाव आणि व्याकुळतेमुळे तुमचा दिवस खराब जाईल. या दोन्ही स्थितींमध्ये केवळ १६ मिनिटांच्या झोपेचं अंतर असतं. हे आम्ही नाही सांगत तर संशोधकांच्या एका रिसर्चमधून सांगण्यात आलं आहे.
(Image Credit : Verywell Health)
स्लीप हेल्थ नावाच्या जर्नलमध्ये प्रकाशित या रिसर्चमध्ये सांगण्यात आलं आहे की, जर तुम्ही वर्किंग डे दरम्यान तुम्ही तुमच्या झोपेच्या तासांमध्ये जराही कमतरता आणली तर याचा तुमच्या जॉब परफॉर्मन्सवर नकारात्मक प्रभाव पडतो. यूनिव्हर्सिटी ऑफ साउथ फ्लॉरिडाच्या संशोधकांनी १३० हेल्दी कर्मचाऱ्यांवर एक सर्व्हे केला. हे कर्मचारी आयटी सेक्टरमध्ये काम करत होते आणि यांना शाळेत जाणारं कमीत कमी एक मुलही होतं.
(Image Credit : CNN.com)
सर्व्हेमध्ये सहभागी लोकांनी सांगितले की, ज्या दिवशी ते त्यांच्या इतर दिवसाच्या झोपेच्या वेळेपेक्षा १६ मिनिटे कमी झोप घेतात किंवा त्यांच्या रात्रीच्या झोपेची क्वॉलिटी खराब असेल तर त्यांना दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये काम करण्यात अडचण येत होती. झोपेच्या कमतरतेमुळे त्यांचा स्ट्रेल लेव्हल वाढतो. खासकरुन वर्क-लाइफ बॅलन्स ठेवण्याच्या मुद्द्यांवर. या सर्व कारणांमुळे अनेकदा त्यांना थकवा जाणवतो आणि ते वेळेआधीच झोपेतून उठतात.
(Image Credit : Best Health Magazine Canada)
यूनिव्हर्सिटी ऑफ साउथ फ्लॉरिडाचे असिस्टंट प्रोफेसर सूमी ली सांगतात की, 'याप्रकारच्या गोष्टींमुळे हे दिसतं की, दररोज कामात येणाऱ्या अडचणीमुळे कर्मचाऱ्यांच्या झोपेवर वाईट प्रभाव पडतो. आणि याने कर्मचाऱ्यांना तणावपूर्ण अनुभवांचा अधिक जास्त सामना करावा लागतो. या रिसर्चचे निष्कर्ष हे सांगतात की, वर्कप्लेसमध्ये कर्मचाऱ्यांच्या झोपेला प्रोत्साहित करण्याची गरज आहे. कारण ज्या लोकांची झोप चांगली होते त्यांचा ऑफिसमधील परफॉर्मन्स चांगला होतो. ते कामावर अधिक फोकस करु शकतात आणि त्यांच्या कामात चुका होत नाहीत'.