साखर खाणं सोडलं तर शरीराला होतील हे फायदे, वाचाल तर लगेच साखरचं सेवन बंद कराल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2022 12:10 PM2022-09-29T12:10:10+5:302022-09-29T12:10:55+5:30

Pubmed नुसार, जास्त साखर खाल्ल्याने कॅलरी वाढते. पोषणाचं सांगायचं तर यातून अजिबात काहीच मिळत नाही.

Lovneet Batra shared 6 reasons to stop eating too much sugar | साखर खाणं सोडलं तर शरीराला होतील हे फायदे, वाचाल तर लगेच साखरचं सेवन बंद कराल

साखर खाणं सोडलं तर शरीराला होतील हे फायदे, वाचाल तर लगेच साखरचं सेवन बंद कराल

googlenewsNext

भारतात जेवणानंतर काहीतरी गोड खाण्याची पद्धत आहे. फक्त टेस्टचा विषय असेल तर खरंच हा अनुभव मजेदार होऊ शकतो. पण जर विषय आरोग्याचा असेल तर गोड खाण्याची वेळ आणि प्रमाणाची काळजी घेणं फार गरजेचं असतं. मेडिकल भाषेत साखरेला स्वीट पॉयजन म्हणून ओळखलं जातं.

Pubmed नुसार, जास्त साखर खाल्ल्याने कॅलरी वाढते. पोषणाचं सांगायचं तर यातून अजिबात काहीच मिळत नाही. साखर असलेल्या फूड्समध्ये कॅलरी जास्त असतात. ज्यामुळे लठ्ठपणा वाढतो आणि अनेक आजार होतात. 

न्यूट्रिशनिस्ट लवनीत बत्रा ( Nutritionist Lovneet Batra) यांनी सांगितलं की, जेव्हा आरोग्याचा विषय येतो तेव्हा साखर एका स्वीट पॉयजनसारखं काम करते. बरेच लोक काहीच विचार न करता याच अधिक सेवन करतात. फळं आणि भाज्यांमध्येही शुगर असते, पण ते नॅच्युरल असल्याने आरोग्यावर वाईट परिणाम होत नाही. समस्या तेव्हा सुरू होते जेव्हा तुम्ही खाद्य पदार्थ आणि पेयांमध्ये वेगळी साखर टाकता. साखर किंवा साखरेचा फूड्स खाणं बंद करणं एक अवघड काम आहे. पण हे केलं जाऊ शकतं. आणि याचे अनेक फायदेही आहेत.

साखर खाणं सोडलं तर काय होतात फायदे

साखर आतड्यात इंफ्लेमेंटरी प्रोफाइल वाढवतं. सोबतच माइक्रोबायोमला नुकसान पोहोचवते. याचा अर्थ हा की, चांगल्या बॅक्टेरियांची कमतरता आणि बॅड बॅक्टेरियाचं प्रमाण वाढतं. अशात साखरेचं सेवन कमी करावं, ज्यामुळे आतड्या चांगल्या राहतात. 

ऊर्जा वाढते

जास्त साखर असलेले फूड्स खाल्ले तर ब्लड शुगर लेव्हल वाढते. ज्यामुळे तुम्हाला लवकर जास्त तरतरी जाणवते. पण हा अनुभव फार कमी वेळासाठी असतो. यामुळे शरीराला जास्त थकवा जाणवू लागतो

त्वचेवर चमकदारपणा राहतो

रिफाइंड कार्ब्स आणि साखरेचं जास्त सेवन केल्याने त्वचेवर वाढत्या वयाचा प्रभाव दिसू लागतो. अशात जर तुम्हाला जास्त काळ तरूण दिसायचं असेल, जास्त साखरेचं सेवन कमी करा.

लिव्हर राहतं हेल्दी

आपलं लिव्हर अल्कोहोलसारखं शुगरलाही मेटाबोलाइज करतं. आणि डायटरी कार्बोहाइड्रेट्सला फॅटमध्ये बदलतं. फार जास्त साखर खाल्ल्याने NAFLD होऊ शकतो. ही एक अशी स्थिती आहे ज्यात लिव्हरमध्ये जास्त फॅट जमा होतं. ही स्थिती जीवघेणीही होऊ शकते.

Web Title: Lovneet Batra shared 6 reasons to stop eating too much sugar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.