मेंदूच्या आरोग्यासाठी घातक ठरते 'ही' समस्या, जास्तीत जास्त लोक याकडे करतात दुर्लक्ष!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2019 10:19 AM2019-09-12T10:19:52+5:302019-09-12T10:27:25+5:30

वय तुमचं वय ३५ क्रॉस झालं असेल तर तुम्हाला तुमच्या आरोग्याप्रति अधिक जागरूक राहणं गरजेचं आहे.

Low blood pressure can be fatal for brain health | मेंदूच्या आरोग्यासाठी घातक ठरते 'ही' समस्या, जास्तीत जास्त लोक याकडे करतात दुर्लक्ष!

मेंदूच्या आरोग्यासाठी घातक ठरते 'ही' समस्या, जास्तीत जास्त लोक याकडे करतात दुर्लक्ष!

googlenewsNext

(Image Credit : wellteq.co)

आपण नेहमीच हाय ब्लड प्रेशरबाबत अधिक चर्चा केली जात असल्याचं बघतो. मात्र, हाय ब्लड प्रेशर आणि लो ब्लड प्रेशर दोन्हीही समस्या आरोग्यासाठी फार घातक आहेत. पण अजूनही लोक लो ब्लड प्रेशरला फार गंभीरतेने घेत नाहीत. त्याकडे दुर्लक्ष करतात. मात्र, रक्तप्रवाह सतत कमी राहणं मेंदूच्या आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकतं.

लाइफस्टाईलशी संबंधित समस्या

(Image Credit : healthline.com)

लाइफस्टाईल बदलण्यासोबतच काही नवे आजारही जीवनात आले आहेत. हाय आणि लो ब्लड प्रेशरची समस्या ही लाइफस्टाईलमुळे होणाऱ्या आजारांच्या यादीत आहे. एका आकडेवारीनुसार, सध्या देशात साधारण ७ कोटींपेक्षा अधिक बीपीच्या समस्येशी लढत आहेत. यात लो आणि हाय ब्लड प्रेशर दोन्हींचाही समावेश आहे. मात्र, वास्तव हे आहे की, ६ कोटींपेक्षा लोकांना हे माहितच नाही की, ते या आजाराच्या जाळ्यात अडकले आहेत.

गरजेची आहे तपासणी

वय तुमचं वय ३५ क्रॉस झालं असेल तर तुम्हाला तुमच्या आरोग्याप्रति अधिक जागरूक राहणं गरजेचं आहे. या आजारापासून बचाव करण्यासाठी तज्ज्ञ तरूणांना सल्ला देतात की, ३५ वयानंतर त्यांनी नियमित ब्लड प्रेशरची तपासणी करावी. जर रिपोर्टमध्ये ब्लड प्रेशर वाढलेलं किंवा कमी असेल तर वेळीच यावर उपचार घ्यावेत.

मेंदूच्या आरोग्यासाठी घातक

(Image Credit : teoshealthylifestyle.com)

लो ब्लड प्रेशरमुळे ऑक्सिजन आणि पोषक तत्व मेंदूपर्यंत पोहोचण्यास रोखले जातात. त्यामुळे याकडे दुर्लक्ष करू नका. ब्लड प्रेशर(९०-६०) ला डॉक्टरी भाषेत हायपो टेन्शन म्हणतात. जगभरातील मोठा वर्ग या समस्येने ग्रस्त आहेत. पण अनेकदा लोकांना हे माहितीच नसतं की, ते लो ब्लड प्रेशरने पीडित आहेत. तसा लो ब्लड प्रेशर हा काही आजार नाही. पण यामुळे इतर आजारांचा धोका वाढू शकतो. जसे की, हृदयरोग, मेंदसंबंधी समस्या.

लो बीपीचे संकेत

छातीत वेदना होणे, धाप लागणे, हृदयाचे ठोके अनियमित होणे, जास्त ताप येणे, मान दुखणे, जर तुम्हाला जास्त काळापासून लो ब्लड प्रेशरची समस्या असेल तर उलटी आणि डायरिया सुद्धा होऊ शकतो. 

लो ब्लड प्रेशरची कारणे

- शरीराला आवश्यक व्हिटॅमिन बी -१२ आणि आयर्नची कमतरता असेल तर एनीमियाची समस्या होते. ही समस्या लो ब्लड प्रेशरमध्ये रूपांतरित होऊ शकते.

- गर्भावस्था, हार्मोन असंतुलन जसे की, थायरॉइडची सक्रियता कमी होणे.

- डायबिटीस किंवा लो ब्लड शुगर, औषधांचा प्रभाव, हृदयाचे ठोके असामान्य, हार्ट फेल्युअल, रक्तवाहिन्या पसरट होणे.

काय करू शकता उपाय?

(Image Credit : healthline.com)

सर्वातआधी तर ब्लड प्रेशर नियमित चेक करा आणि समस्या अधिक असेल तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. लो ब्लड प्रेशरची समस्या होऊ नये यासाठी तुम्ही नियमित हिरव्या भाज्या, फळं, गर्द रंगाचे खाद्य पदार्थ, काळी द्राक्षे, खजूर, आलू बुखारा, ड्राय फ्रूट्स, कडधान्य आणि लसणाचा आहारा समावेश करावा. यात प्रोटीन, व्हिटॅमिन आणि फायबर भरपूर प्रमाणात असतं. याने बीपी लेव्हलमध्ये राहण्यास मदत होऊ शकते. तसेच भरपूर पाणी प्यावे. 

Web Title: Low blood pressure can be fatal for brain health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.