Lung Cancer Awareness Month 2018 : फुफ्फुसाच्या कर्करोगाची लक्षणे, चुकूनही करु नका दुर्लक्ष!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2018 10:38 AM2018-11-06T10:38:01+5:302018-11-06T10:38:52+5:30

नोव्हेंबर महिना हा 'लंग कॅन्सर अवेअरनेस' म्हणजेच फुफ्फुसाच्या कर्करोगाबाबत जनजागृतीचा महिना म्हणून पाळला जातो.

Lung Cancer Awareness Month 2018 : Do not ignore these symptoms | Lung Cancer Awareness Month 2018 : फुफ्फुसाच्या कर्करोगाची लक्षणे, चुकूनही करु नका दुर्लक्ष!

Lung Cancer Awareness Month 2018 : फुफ्फुसाच्या कर्करोगाची लक्षणे, चुकूनही करु नका दुर्लक्ष!

Next

नोव्हेंबर महिना हा 'लंग कॅन्सर अवेअरनेस' म्हणजेच फुफ्फुसाच्या कर्करोगाबाबत जनजागृतीचा महिना म्हणून पाळला जातो. फुफ्फुसाचा कर्करोग हा एक गंभीर आजार असून याने दिवसेंदिवस यांचं प्रमाण वाढताना दिसत आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या एका आकडेवारीनुसार, साधारण ७.६ मिलियन लोकांचा मृत्यू फुफ्फुसाचा कर्करोग झाल्याने होतो. 

फुफ्फुसाचा कर्करोग होण्याची वेगवेगळी कारणे आहेत. त्यात प्रमुख कारण हे खोकला सांगितलं जातं. सतत येणाऱ्या खोकल्यावर वेळेवर उपचार केल्यावरही वेळीच आराम मिळत नसेल तर त्वरीत टेस्ट करावी. धुम्रपान करणारे, तंबाखू खाणाऱ्या लोकांना फुफ्फुसाचा कर्करोग होण्याचा धोका अधिक असतो. तसेच इतरही काही कारणांनी हा आजार होऊ शकतो. फुफ्फुसाचा कर्करोग झाला असेल तर सुरुवातीला याची लक्षणे दिसून येत नाहीत. काही लक्षणे दिसून आल्यावर वेळीच त्यावर उपाय केल्यास फुफ्फुसाच्या कर्करोगापासून बचाव केला जाऊ शकतो. चला जाणून घेऊ काही लक्षणे...

या लक्षणांकडे करु नका दुर्लक्ष

- श्वास घेत असताना तुम्हाला शिटी वाजल्यासारखा किंवा कोणत्याही प्रकारचा आवाज होत असेल तर वेळीच डॉक्टरांना संपर्क करा. हा आवाज आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्यांचं लक्षण आहे. यातच फुफ्फुसाशी संबंधित समस्याही आहे.

- जर तुम्हाला मोठा श्वास घेण्यास अडचण येत असेल तर वेळीच सावध व्हा. कारण ही समस्या छातीत तरळ पदार्थ जमा झाल्यने होऊ शकते, जे फुफ्फुसाच्या कर्करोगाचं कारण ठरु शकतं.

- चेहरा आणि गळ्यावर सूज येणे हा सुद्धा फुफ्फुसाचा कर्करोग झाल्याचा संकेत असू शकतो. जर अचानकपणे गळ्यात आणि चेहऱ्यावर सूज किंवा काही बदल दिसेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

- कर्करोग वाढल्यावर सांधेदुखी, पाठ, कंबरदुखी आणि शरीराच्या इतरही भागांमध्ये वेदना होतात. अनेकदा हाडांमध्ये फ्रॅक्चरही होऊ शकतो. 

- जर तुम्हाला छातीसोबतच पाठ आणि खांद्यामध्ये वेदना होत असेल, तर ही बाब गंभीरतेने घ्यावी. भलेही तुम्हाला फिट असल्यासारखे वाटत असले तरी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

- जर छातीमध्ये कफ झाला असेल आणि ही समस्या २-३ आठवड्यांपेक्षा जास्त असेल तर हे संक्रमण असू शकतं. जर कफ किंवा थूंकीतून रक्त येत असेल तर वेळीच तपासणी करावी.

- फुफ्फुसाच्या कर्करोगाचा प्रभाव वाढल्यावर मेंदूवरही प्रभाव पडतो. अशा स्थितीत सतत  डोकेदुखी होऊ शकते. कधी-कधी ट्यूमर व्दारे रक्तसंचार करणाऱ्या नसांवरही याचा दबाव पडतो. 

- अनेकजा शरीरात कॅल्शिअमचं प्रमाण अधिक होतं, याने रक्त गोठणं सुरु होतं. हेही फुफ्फुसाच्या कर्करोगाचं एक कारण असू शकतं.
 

Web Title: Lung Cancer Awareness Month 2018 : Do not ignore these symptoms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.