चुकूनही 'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्षं; होऊ शकतो फुफ्फुसाचा कॅन्सर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2019 02:52 PM2019-11-04T14:52:12+5:302019-11-04T14:54:54+5:30
नोव्हेंबर हा महिना 'लंग कॅन्सर अवेअरनेस मंथ' (Lung Cancer Awareness Month) म्हणून साजरा केला जातो. लंग कॅन्सर म्हणजेच फुफ्फुसांचा कॅन्सर, हा एक जीवघेणा आजार आहे.
नोव्हेंबर हा महिना 'लंग कॅन्सर अवेअरनेस मंथ' (Lung Cancer Awareness Month) म्हणून साजरा केला जातो. लंग कॅन्सर म्हणजेच फुफ्फुसांचा कॅन्सर, हा एक जीवघेणा आजार आहे. विश्व स्वास्थ्य संस्थेने केलेल्या एका सर्वेनुसार, जवळपास 7.6 मिलियन लोकांचा मृत्यू फुफ्फुसांच्या कॅन्सरमुळे होतो. हा कॅन्सर झाल्यामुळे अनेक लक्षणं दिसू लागतात. ज्यांपैकी प्रमुख लक्षण म्हणजे खोकला. जर खोकल्यावर योग्य उपचार केले नाही किंवा उपचारानंतरही आराम मिळाला नाही तर डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य उपचार करणं आवश्यक असतं.
धुम्रपान करणारे आणि तंबाखू खाण्याऱ्या लोकांना फुफ्फुसांचा कॅन्सर होण्याचा धोका अधिक असतो. दरम्यान, हा घातक आजार इतर कारणांमुळेही होऊ शकतो. फुफ्फुसांमध्ये होणारा कॅन्सर सुरुवातीला ओळखणं अत्यंत अवघड असतं. कारण सुरुवातीच्या स्टेजमध्ये याची लक्षणं दिसून येत नाहीत. काही लक्षणं समोर आल्यानंतर त्यावर योग्य ते उपाय करून फुफ्फुसांच्या कॅन्सरपासून बचाव केला जाऊ शकतो. जाणून घेऊया काही लक्षणांबाबत...
या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका
1. जेव्हा तुम्ही श्वास घेता, त्यावेळी शिटी वाजल्याप्रमाणे आवाज येत असेल तर त्वरित आपल्या डॉक्टरांशी संपर्क करा. हा आवाज आरोग्याच्या अनेक समस्यांकडे लक्ष वेधते.
2. जर तुम्हाला मोठ्या श्वास घेण्यास त्रास असेल तर छातीमध्ये तरल पदार्थ तयार झाल्यामुळे ही समस्या उद्भवते. यामुळेही फुफ्फुसांचा कॅन्सर होऊ शकतो.
3. चेहरा आणि गळ्यामध्ये सूज येणं हेदेखील फुफ्फुसांच्या कॅन्सरचं लक्षण आहे. जर अचानक गळा आणि चेहऱ्यावर सूज आली किंवा इतर काही बदल दिसून आले तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.
4. कॅन्सर वाढल्याने सांधेदुखी, पाठ, कंबर आणि शरीराच्या इतर भागांमध्ये वेदना होऊ शकतात. अनेकदा हाडं फ्रॅक्चरही होऊ शकतात.
5. जर तुम्हाला छाती, पाठ आणि खांद्यांमध्येही वेदना होत असतील तर या गोष्टींकडे गांभिर्याने घ्या. डॉक्टरांचा सल्ला घ्या.
6. छातीमध्ये कफ झाला असेल आणि ही समस्या 2 ते 3 आठवड्यांहून अधिक वेळ ही समस्या असेल तर हे इन्फेक्शन असू शकतं. त्यामुळे त्वरिक चेकअप करून घ्या.
7. फुफ्फुसांचा कॅन्सर वाढल्याने त्याचा परिणाम मेंदूवरही होऊ शकतो. अशा परिस्थितीमध्ये सतत डोकेदुखी होणं. कधीकधी ट्यूमर द्वारे त्या शिरांमध्येही दबाव जाणवतो. ज्या मेंदूपर्यंत रक्तप्रवाह करत असतात.
8. अनेकदा शरीरात कॅल्शिअमचे प्रमाण अधिक होतं. ज्यामुळे रक्त जमा होण्यास सुरुवात होते. हेदेखील फुफ्फुसांच्या कॅन्सरचं एक लक्षण असू शकतं.
(टिप : वरील सर्व समस्या आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाती शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणत्याही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.)