फक्त धुम्रपान नाही तर 'या' कारणांमुळे उद्भवतोय फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका; जाणून घ्या लक्षणं
By manali.bagul | Published: January 6, 2021 12:41 PM2021-01-06T12:41:01+5:302021-01-06T12:51:34+5:30
Health Tips in Marathi : फुफ्फुसांच्या कॅन्सरमुळे होत असलेल्या मृताचे प्रमाण जास्त असते. फुफ्फुसांचा कॅन्सर दोन प्रकारचा असतो .
धुम्रपान आणि खराब लाईफस्टाईलमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका उद्भवतो असा अनेकांचा समज आहे. फुफ्फुसांच्या कॅन्सरमध्ये रुग्णांना श्नसनाच्या समस्यांचा सामना करावा लागतो. यामुळे ट्यूमर सुद्धा होण्याची शक्यता असते. फुफ्फुसांची काळजी घेऊन श्वास घेण्यासाठी होणारा त्रास कमी करता येऊ शकतो. आकडेवारीनुसार कॅन्सरमुळे होत असलेल्या मृतांमध्ये फुफ्फुसांच्या कॅन्सरमुळे होत असलेल्या मृताचे प्रमाण जास्त असते. फुफ्फुसांचा कॅन्सर दोन प्रकारचा असतो . त्यातील एक नॉन स्मॉल सेल कॅन्सर आणि दुसरा स्मॉल सेल कॅन्सर असे प्रकार आहेत. आज आम्ही तुम्हाला फुफ्फुसांच्या कॅन्सरची कारणं, परिणामकारक ठरणारे काही उपाय सांगणार आहोत. ओन्ली माय हेल्थशी बोलताना पल्मोनोजीस्ट तज्ज्ञ मनिश साहू यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे.
फुफ्फुसांच्या कॅन्सरची कारणं
तंबाखू, सिगारेट अशा मादक पदार्थांचे रोज जास्त प्रमाणात सेवन केल्यानं आजार पसरण्याचा धोका वाढतो. गाड्यांमधून, फॅक्ट्रीजमधून बाहेर येत असलेल्या धुरात बेंजीन गॅस असतो. या धुरामुळे हवा प्रदुषित होते. त्यामुळे फुफ्फुसांचा कॅन्सर होण्याचा धोका असतो. तिसरं महत्वाचं कारण म्हणजे अनुवांशिकतेमुळे हा आजार उद्भवण्याची शक्यता असते. शरीरात असलेल्या जीन्समधील बदलांमुळे हा जीवघेणा आजार उद्भवतो.
फुफ्फुसांच्या कॅन्सरचे दोन प्रकार आहेत. पहिला स्मॉल सेल लंग्स कॅन्सर आणि दुसरा नॉन स्मॉल सेल लंग्स कॅन्सर. यातील स्मॉल सेल लंग्स कॅन्सर हा खूप गंभीर असतो. कारण या आजारात कॅन्सरच्या सेल्सची वाढ झपाट्यानं होते. जबकि नॉन स्मॉल सेल लंग्स कॅन्सर तुलनेनं कमी वेगाने पसरतो. पण दोन्ही प्रकारचे आजार जीवघेणे ठरू शकतात.
लक्षणं
छातीत वेदना होणं, तीव्र खोकला, श्वास घ्यायला त्रास होणं, कफ, रक्त बाहेर येणं, भूक न लागणं, फुफ्फुसांमध्ये वेदना, वजन कमी होणं.
उपाय
नेहमी सकारात्मक राहा
नेहमी सकारात्मक राहिल्यानं कोणत्याही प्रकारचा ताण तणाव येत नाही. आपली जबाबदारी, आरोग्य, यांबाबत कोणताही नकारात्मक विचार करू नका. योग्य उपचार घेतल्यास तुम्ही आजारापासून लांब राहू शकता.
चांगली झोप घ्या
रोज ७ ते ८ तास झोपल्यानं निरोगी राहण्यास मदत होते. कारण तुम्ही दिवसभरात वेगवेगळी कामं करत असता. अनेकदा औषधांचे सेवन केलं जातं. अशावेळी पुरेशी झोप झाली नाही तर शारीरिक स्थिती खराब होण्याची शक्यता असते. जर पूर्ण झोप झाली तर उत्साह वाढण्यास मदत होईल.
व्यायाम करा
ब्रिदिंग या व्यायाम प्रकारात तुम्हाला श्वसन यंत्रणेवर लक्ष केंद्रित करावं लागेल. त्यामुळे फुफ्फुसांमध्ये रक्त पुरवठा चांगल्या पद्धतीने होईल. सगळ्यात आधी ४ सेकंदापर्यंत श्वास रोखून धरा. जेणेकरून फुफ्फुसांपर्यंत ऑक्सिजन पोहोचेल. मग ४ सेकंदांनी श्वास सोडून द्या. त्यामुळे शरीराला ऑक्सिजन पुरवठा चांगला होतो.
कार्डीयो व्यायाम केल्याने शरीरातीतून घाम बाहेर पडतो शिवाय हृदयाचे ठोके नियमित होण्यास मदत होते.
कार्डियो एक्सरसाईज फुफ्फुसांसाठी देखील फायदेशीर असतं. यात साधेसोपे व्यामाम प्रकार असतात. चालणे, एकाच जागी उभं राहून उड्या मारणे, जंपिंग जॅक, चालणे, सायकलिंगचा यात समावेश असतो. यामुळे फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढण्यास मदत होते. सर्दी, खोकला, कफ अन् तापाला दूर पळवणारा खास काढा; घरी बनवा १० मिनिटांत
याशिवाय आहारही चांगला घ्यायला हवा जेणेकरून फुफ्फुसांना पोषण मिळेल, मादक पदार्थाचं सेवन करू नका. त्यामुळे कोणत्याही क्षणी तुम्हाला आजाराचं शिकार व्हायला लागू शकतं. त्यामुळे संतुलित आहार घ्या. व्हिटामीन सी असलेल्या पदार्थाचा आहारात समावेश करा. बर्ड फ्लू मध्ये हजारो पक्ष्यांना का ठार मारलं जातं? जाणून घ्या यामागचं कारण