ही लक्षणे दिसल्यास त्वरित व्हा सावध! असू शकतात फुफ्फुसाच्या 'या' गंभीर आजाराचे संकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2021 03:31 PM2021-12-07T15:31:22+5:302021-12-07T15:37:17+5:30
फुफ्फुसात कोणत्याही प्रकारची समस्या निर्माण झाल्यामुळे श्वासोच्छवासाचा त्रास होण्याचा धोका असतो. फुफ्फुसांशी संबंधित कोणतीही आरोग्य स्थिती दर्शविणारी सौम्य लक्षणे क्वचितच दिसून येतात, ज्यामुळे नंतर स्थिती गंभीर बनते.
आपल्यापैकी अनेकजण आरोग्याच्या समस्या गंभीर होत नाहीत तोवर त्याकडे दुर्लक्ष करतात. फुफ्फुसाच्या आजारांच्या बाबतीतही अनेकदा असे होते. फुफ्फुस हा मानवी शरीराचा एक महत्त्वाचा भाग आहे. त्याच्याद्वारे रक्तवाहिन्यांपर्यंत रक्त पोहोचवण्याचे काम होते. परंतु बहुतेक लोकांना फुफ्फुसांच्या आरोग्याबाबत माहिती नसते. फुफ्फुसात कोणत्याही प्रकारची समस्या निर्माण झाल्यामुळे श्वासोच्छवासाचा त्रास होण्याचा धोका असतो.
पोषणतज्ञ लवनीत बत्रा यांनी IndianExpress.com मधील बातमीत म्हटले आहे की, फुफ्फुसांशी संबंधित कोणतीही आरोग्य स्थिती दर्शविणारी सौम्य लक्षणे क्वचितच दिसून येतात, ज्यामुळे नंतर स्थिती गंभीर बनते. अशी परिस्थिती टाळण्यासाठी फुफ्फुसाच्या आजाराची लक्षणे (वॉर्निंग सायन्स) जाणून घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
छातीत दुखणे
अचानक छातीत दुखण्याचा त्रास महिनाभर सतत जाणवत असेल किंवा त्याहून अधिक काळ टिकत असेल - विशेषत: श्वास घेताना किंवा खोकताना तीव्र दुखत असल्यास हे फुफ्फुसातील बिघाडाचे लक्षण आहे.
जास्त श्लेष्मा
श्लेष्मा, ज्याला कफ देखील म्हणतात. त्याचा जाड थर फुफ्फुसाच्या आत खोलवर उत्सर्जित होतो. तोंडाच्या किंवा घशाच्या आतील पातळ थुंकी नव्हे. श्लेष्मा रोगग्रस्त फुफ्फुस, पवननलिका आणि वरच्या श्वसनमार्गामध्ये हवेच्या हालचालीशी संबंधित आहे. जर तुम्हाला एक महिन्यापेक्षा जास्त काळ श्लेष्मासह खोकला असेल तर ते फुफ्फुसाच्या आजाराचे लक्षण असू शकते.
अचानक वजन कमी होणे
पोषणतज्ज्ञ लवनीत बत्रा सांगतात की, जर कोणत्याही आहार योजना किंवा व्यायामाशिवाय तुमच्या वजनात लक्षणीय घट होत असेल तर तुमच्या शरीरात आत एक ट्यूमर वाढत असल्याची लक्षणे आहेत.
श्वासोच्छवासात बदल
जर तुम्हाला श्वास घेण्यास त्रास होत असेल तर ते फुफ्फुसाच्या आजाराचे लक्षण असू शकते. फुफ्फुसातील ट्यूमर किंवा कार्सिनोमामधून द्रव जमा झाल्यामुळे हवेचा मार्ग अवरोधित होतो, ज्यामुळे श्वासोच्छवासाचा त्रास होतो.
रक्तासह सतत खोकला
आठ आठवडे किंवा त्याहून अधिक काळ खोकल्यातून रक्त येणे हे एक जुनाट आणि महत्त्वाचे प्रारंभिक लक्षण मानले जाते, जे तुमच्या श्वसन प्रणालीमध्ये काहीतरी बिघाड झाल्याचे दर्शवते. पोषणतज्ञ लवनीत बत्रा सांगतात की, या सर्व लक्षणांवर लक्ष ठेवा. त्यांना हलक्यात घेऊ नका आणि भविष्यात समस्या टाळण्यासाठी या गोष्टी तपासणे केव्हाही चांगले.