फुफ्फुसं निरोगी ठेवण्यासाठी रोज करा 'या' ५ एक्सरसाइज!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2019 11:38 AM2019-03-12T11:38:12+5:302019-03-12T11:39:17+5:30

शरीराच्या इतर अवयवांप्रमाणेच फुफ्फुसांना निरोगी ठेवणंही गरजेचं असतं. याने तुमची श्वास घेण्याची प्रक्रिया सोपी होण्यास मदत मिळते.

Lungs will be healthy when you will practice these 5 exercises every day | फुफ्फुसं निरोगी ठेवण्यासाठी रोज करा 'या' ५ एक्सरसाइज!

फुफ्फुसं निरोगी ठेवण्यासाठी रोज करा 'या' ५ एक्सरसाइज!

Next

(Image Credit : Rush University Medical Center)

शरीराच्या इतर अवयवांप्रमाणेच फुफ्फुसांना निरोगी ठेवणंही गरजेचं असतं. याने तुमची श्वास घेण्याची प्रक्रिया सोपी होण्यास मदत मिळते. फुफ्फुसाच्या मदतीने शरीरातील रक्तात ऑक्सिजन पोहोचतं. त्यामुळे फुफ्फुसं मजबूत असणं गरजेचं असतं. कारण जेव्हा आपण श्वास घेतो तेव्हा ऑक्सिजनसोबत काही प्रदूषित कण शरीरात जातात जे फुफ्फुसांना प्रभावित करतात. फुफ्फुस प्रभावित होऊ नये यासाठी त्यांची काळजी घेणे महत्त्वाचं काम आहे. फुफ्फुसं मजबूत करण्यासाठी काही एक्सरसाइज करायला हव्यात. 

फुफ्फुसांसाठी एक्सरसाइज

ब्रीदिंग - ही एक्सरसाइज करण्यासाठी तुम्हाला श्वासावर फोकस करावा लागतो, ज्यामुळे मेंदू शांत आणि रिलॅक्स होतो. ही एक्सरसाइज करण्यासाठी ४ सेंकदापर्यंत श्वास घ्या, जेणेकरून फुफ्फुसं ऑक्सिजनने भरले जातील. त्यानंतर पुढच्या ४ सेकंदात श्वास सोडा. ही एक्सरसाइज रो ५ मिनिटे करा. 

योगाभ्यास - फुफ्फुसांना मजबूत करण्यासाठी योगाभ्यासही फार फायदेशीर ठरतो. योगाभ्यास करताना जेव्हा तुम्ही मोठा श्वास घेता तेव्हा याने रक्तप्रवाह चांगला होतो. ज्यामुळे फुफ्फुसामध्ये ऑक्सिजन जास्त राहतं. फुफ्फुसांसोबतच डायफ्रामसाठीही योगाभ्यास चांगला असतो. 

स्वीमिंग - पाण्यात श्वास रोखून ठेवल्याने तुमच्या फुफ्फुसांची क्षमता वाढते. त्यासोबत पाणी श्वसन मांसपेशींवर दबाव टाकून त्यांना मजबूत करतं. स्वीमिंग फुफ्फुसांसाठी एक फायदेशीर एक्सरसाइज आहे. 

कार्डिओ - रनिंगसारखी सोपी एक्सरसाइजही फुफ्फुसांसाठी फायद्याची ठरते. कारण आपल्या शरीराला एक्सरसाइज करताना ऑक्सिजनची गरज असते. त्यामुळे आपल्या फुफ्फुसांना अधिक काम करावं लागतं. शारीरिक हालचाल नसे तर याने फुफ्फुसांचं नुकसान होतं. त्यामुळे जॉगिंग, जुम्बासारखे वर्कआउट करत राहिलं पाहिजे.

वॉटर स्प्लॅश - चेहऱ्यावर पाणी टाकल्याने फुफ्फुसाची क्षमता वाढते. याने आपले हार्ट रेट कमी करून मोठा श्वास घेणे सहजपणे शक्य होतं. त्यामुळे ब्रीदिंग एक्सरसाइज करण्याआधी चेहऱ्यावर थंड पाणी नक्की टाका. 

(टिप - वरील कोणतीही एक्सरसाइज तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय करू नका. तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच या एक्सरसाइज करा. असे न केल्यास नुकसानकारक ठरू शकतात. वरील एक्सरसाइज केवळ माहिती म्हणून तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची शरीर रचन वेगळी असते त्यामुळे प्रत्येकाला वरील एक्सरसाइज फायदेशीर ठरतील असा दावाही आम्ही करत नाही.)

Web Title: Lungs will be healthy when you will practice these 5 exercises every day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.