मोठा दिलासा! कोरोनाच्या नव्या स्ट्रेनला टक्कर देणार 'मेड इन इंडिया' लस; कंपनीची महत्वाची माहिती

By Manali.bagul | Published: December 31, 2020 01:53 PM2020-12-31T13:53:11+5:302020-12-31T14:03:40+5:30

CoronaVirus News & Latest Updates : अचानक ब्रिटनमधील व्हायरसच्या नव्या स्ट्रेनने मान वर काढल्यामुळे पुन्हा चिंताजनक वातावरण तयार झालं. कोरोनाचा हा नवीन स्ट्रेन अधिक संक्रामक असल्याचे अनेक तज्ज्ञांकडून  सांगितले जात आहे.

Made in india corona vaccine covaxin effective against new coronavirus strain said bharat biotech | मोठा दिलासा! कोरोनाच्या नव्या स्ट्रेनला टक्कर देणार 'मेड इन इंडिया' लस; कंपनीची महत्वाची माहिती

मोठा दिलासा! कोरोनाच्या नव्या स्ट्रेनला टक्कर देणार 'मेड इन इंडिया' लस; कंपनीची महत्वाची माहिती

googlenewsNext

गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाच्या लसीबाबत सकारात्मक माहिती समोर येत आहे. तसंच जगभरातील काही देशांमध्ये लसीकरणाला सुरूवात झाल्यामुळे लोकांमधील भीतीचं वातावरण कमी झालं होतं. अश्यात अचानक ब्रिटनमधील व्हायरसच्या नव्या स्ट्रेनने मान वर काढल्यामुळे पुन्हा चिंताजनक वातावरण तयार झालं. कोरोनाचा हा नवीन स्ट्रेन अधिक संक्रामक असल्याचे अनेक तज्ज्ञांकडून  सांगितले जात आहे.

कोरोनाच्या नव्या स्ट्रेनवर जगभरात तयार केल्या जात असलेल्या कोरोनाच्या लसी परिणामरकारक ठरणार का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.  ब्रिटनमधील या कोरोनाचा सामना स्वदेशी लस (made in india corona vaccine) करू शकणार, असा  दिलासा भारत बायोटेकनं (Bharat Biotech) दिला आहे.कोरोनाच्या नव्या स्ट्रेनविरोधात कोवॅक्सिन (Covaxin)  म्हणजेच BBV152 लस प्रभावी आहे, अशी माहिती ही लस तयार करणाऱ्या हैदराबादमधील भारत बायोटेकनं दिली आहे. कंपनीनं याआधीच या लशीला आपात्कालीन वापरासाठी मंजुरी मिळावी यासाठी केंद्र सरकारकडे अर्ज केला  होता.

भारत बायोटेकआयसीएमआर, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने ही लस तयार केली आहे. कोवाक्सिन SARS-Cov-2 ची इनअॅक्टिव्हेटेड स्‍ट्रेनमधून तयार केली आहे. या लशीचं तिसऱ्या टप्प्यातील वैद्यकिय चाचणी सुरू आहे. कंपनीनं याआधी पहिल्या आणि  दुसऱ्या टप्प्यातील चाचणीचा अहवाल दिला होता.

भारत बायोटेकची लस 6 ते 12 महिने सुरक्षा देऊ शकते, असं कंपनीनं म्हटलं होतं. कंपनीच्या चाचण्यांचा हा परिणाम काही दिवसांपूर्वीच medRxiv वर प्रसिद्ध करण्यात आला होता. आता कोरोनाच्या नव्या स्ट्रेनवरही  लस प्रभावी असल्याचं कंपनीनं सांगितलं आहे. याशिवाय केंद्रानंदेखील आतापर्यंत तयार करण्यात आलेल्या कोरोना लसी कोरोनाच्या नव्या रूपाविरोधात परिणामकारक असल्याचं मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं होतं. आधीपेक्षा जास्त जीवघेणा ठरणार कोरोनाचा नवा स्ट्रेन? संशोधनातून समोर आली महत्वाची माहिती

दरम्यान केंद्र सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार प्राध्यापक के. विजय राघवन यांनी सांगितलं होतं की, "कोरोनावरील सध्या उपलब्ध असलेल्या लसी यूके आणि आफ्रिकेतील नव्या कोरोनाशी लढण्यास सक्षम आहेत. या लशी नव्या कोरोनापासून संरक्षण देऊ शकत नाही असा कोणताही पुरावा नाही." Coronavirus: भारतात कोरोनाचा आणखी एक गंभीर साइड इफेक्ट आला समोर, डॉक्टरांनी दिला इशारा....

Web Title: Made in india corona vaccine covaxin effective against new coronavirus strain said bharat biotech

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.