काळजी वाढली! महाराष्ट्रातील 'हा' भाग बनतोय कोरोनाचं केंद्र; तज्ज्ञांचा धोक्याचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2021 03:30 PM2021-02-25T15:30:30+5:302021-02-25T15:49:40+5:30
CoronaVirus News & Latest Updates : गेल्या २४ तासात महाराष्ट्रात जवळपास ८ हजार नवीन कोरोनाची प्रकरणं समोर आली आहेत. मागच्या चार महिन्यात एका दिवसात सर्वाधिक केसेस समोर आल्याचे दिसून आलं आहे.
भारतभरासह महाराष्ट्रातही कोरोनाचा प्रसार वेगानं होताना पाहायला मिळत आहे. विदर्भ कोरोनाचे केंद्र बनत असल्याचा दावा महाराष्ट्राचे तांत्रिक सल्लाकार डॉ. सुभाष सांळुखे यांनी केला आहे. त्यांनी सांगितले की, ''विदर्भापासून संक्रमण मुंबई आणि पुण्यासारख्या इतर ठिकाणी पसरत आहे. जर संक्रमणावर नियंत्रण ठेवण्यात आलं नाही तर देशाच्या इतर भागातही कोरोनाचा प्रसार होऊ शकतो. गेल्या २४ तासात महाराष्ट्रात जवळपास ८ हजार नवीन कोरोनाची प्रकरणं समोर आली आहेत. मागच्या चार महिन्यात एका दिवसात सर्वाधिक केसेस समोर आल्याचे दिसून आलं आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात आता कोरोनाचे २१, २१११९ केसेस समोर आल्या आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोनाची दुसरी लाट येणार की नाही हे सांगणं कठीण आहे. विदर्भाप्रमाणेच नागपूर, अमरावतीपासून औरंगाबाद कोरोनाचे केंद्र बनलं आहे. वेळीच कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात आलं नाही तर इतर राज्यात कोरोना पसरू शकतो.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार विदर्भातील काही जिल्ह्यात कोरोना पसरण्याची तीन कारणं समोर आली आहेत. व्हायरसची संरचना, उत्परिवर्तन क्षमता. दुसरी संक्रमित व्यक्ती जी इतरांना संक्रमित करू सकते. तिसरं पर्यावरण आणि संरचना, प्रदूषण.
सुभाष साळुंखेंनी सांगितले की, ''व्हायरसाचा आलेख चढचा उतरता पाहायला मिळतो. कोरोना व्हायरसच्या बाबतीतही असाच प्रकार दिसून येत आहे. दरम्यान कोरोना व्हायरस म्यूटेट होत आहे किंवा नाही हे आयसीएमआरकडून स्पष्ट करण्यात आलेलं नाही.''
पुण्यातील नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ वायरोलॉजी आणि नॅशनल सेंटर फॉर डिजीज कंट्रोलनं दिल्लीत विदर्भातील आठ जिल्ह्यांतील नमुने पाठवले आहेत.'' अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या स्थितीपासून बचाव करण्यासाठी नवीन योजना आखावी लागणार आहे. सध्याच्या काळात लॉकडाऊन हा अंतीम उपाय दिसून येत आहे. संपर्क, ट्रेसिंग, चाचण्यांमध्ये वाढ आणि रुग्णांना क्वारंटाईन करणं हा मुख्य मार्ग आहे. ज्यामुळे व्हायरसचा प्रसार रोखता येऊ शकतो. चिंताजनक! देशात समोर आला कोरोनाचा नवा स्ट्रेन; व्हायरसच्या जुन्या रुपापेक्षा वेगळी आहेत ७ लक्षणं
दरम्यान सरकारनं बुधवारी घेतलेल्या निर्णयानुसार ६० वयापेक्षा जास्त वय असलेल्यांना आणि कोणत्याही आजारानंग्रस्त असलेल्या 45 वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्यांना 1 मार्चपासून कोरोना लस (Coronavirus Vaccine) मोफत दिली जाणार आहे. मात्र खासगी केंद्रावर लसीकरणासाठी गेल्यास शुल्क भरावे लागणार आहे. याशिवाय गंभीर आजाराने ग्रस्त 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना यासाठी स्वाक्षरीकृत वैद्यकीय प्रमाणपत्र आवश्यक असेल. पुढील काही दिवसात एक यादी तयार करण्यात येणार आहे. त्यात गंभीर आजार असलेल्या व्यक्तीचा समावेश केला जाणार आहे. High Blood Pressure: हाय ब्लड प्रेशरच्या २ वॉर्निंग साइन; डोळे आणि चेहऱ्यावरील निशाणाकडे करू नका दुर्लक्ष!