तुम्हीही रात्री डोक्याखाली जाड उशी घेऊन झोपता का? होऊ शकतात या समस्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2023 11:24 AM2023-07-18T11:24:27+5:302023-07-18T11:24:52+5:30
Pain after using pillow: काही लोक झोपताना एक मोठी चूक करतात. जी महागात पडू शकते. ती म्हणजे काही लोकांना झोपताना जाड उशी घेण्याची सवय असते. जे पूर्णपणे चुकीचं आहे.
Pain after using pillow: निरोगी जीवनासाठी आपल्या आयुष्यात झोप फार महत्वाची असते. पुरेशी झोप घेतली नाही तर शरीराचा बॅलन्स बिघडतो. अशात चांगली आणि पुरेशी झोप घेणं फार महत्वाचं ठरतं. बरेच लोक हे फॉलोही करतात. पण काही लोक झोपताना एक मोठी चूक करतात. जी महागात पडू शकते. ती म्हणजे काही लोकांना झोपताना जाड उशी घेण्याची सवय असते. जे पूर्णपणे चुकीचं आहे. अनेकांना तर याची कल्पनाही नसते की, असं केल्याने त्यांना काय समस्या होणार आहेत. चला जाणून घेऊ जाड उशी घेण्याचे नुकसान.
मानदुखी - रात्री झोपताना जाड किंवा दोन उश्या घेतल्याने तुम्ही अनेक आजारांचे शिकार होऊ शकता. असं केल्याने नेहमीच मानदुखीची समस्या होऊ शकते. हे दुखणं पुढे वाढू शकतं. त्यामुळे झोपताना कधीही नरम किंवा लहान उशी घ्यावी.
मणका दुखणे - झोपताना डोक्याखाली जाड उशी घेणाऱ्या लोकांच्या मणक्यात वेदना होऊ लागतात. जाड उशी घेतल्याने मणका सरळ रेषेत राहत नाही. त्याची स्थिती खालीवर होते. ज्यामुळे पाठदुखीची समस्या होऊ शकते.
मेंदुचा रक्तसंचार प्रभावित होतो - जर तुम्ही मोठी उशी घेऊन झोपत असाल तर ही सवय लगेच सोडा. असं केल्याने मेंदुपर्यंत योग्य पद्धतीने रक्त पोहोचत नाही. याने मेंदुचं काम प्रभावित होतं. तसेच केसांनाही पोषण मिळत नाही. ज्यामुळे केसगळतीची समस्या होते.
खांदे आणि हात दुखणे - जास्तीत जास्त लोक सकाळी झोपेतून उठल्यावर खांदे आणि हात दुखत असल्याची तक्रार करतात. याचं एक मोठं कारण म्हणजे जाड उशी घेऊन झोपणे. बरेच लोक जाड उशी घेतात किंवा दोन उश्या घेतात. यामुळे खांदे व्यवस्थित राहत नाही, ज्यामुळे खांदे दुखण्याची समस्या होते.
मानसिक समस्या - ज्या लोकांना रात्री झोपताना मोठी उशी घेण्याची सवय असते ते नीट झोपू शकत नाहीत. त्यांची झोप खराब होते. यामुळे यांची स्ट्रेस लेव्हलही वाढते.